Pink E Rickshaw Yojana : महिलांना रिक्षा व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणारी पिंक ई-रिक्षा योजना !
महिलांनी स्वावलंबी बनून स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठीही या अर्थसंकल्पामध्ये अनेक प्रकारे तरतूद करण्यात आल्याचं समोर आलं आहे. राज्यातील महिलांना पिंक ई रिक्षासाठी (Pink E Rickshaw Yojana) अर्थसहाय्य दिलं जाईल. राज्य सरकारकडून 17 शहरांतल्या 10 हजार महिलांना ई रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. त्यासाठी 80 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
महिलांना रिक्षा व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणारी पिंक ई-रिक्षा योजना ! Pink E Rickshaw Yojana :
‘पिंक रिक्षा’ नावाची ही योजना (Pink E Rickshaw Yojana) केवळ मेट्रो शहरांमधील गरीब महिलांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणार नाही, तर महिलांसाठी सुरक्षित वाहतुकीच्या साधनांची गरजही पूर्ण करेल, असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि नागपूरसह महाराष्ट्रातील 10 शहरांमध्ये लवकरच महिलांसाठी गुलाबी ई-रिक्षा उपलब्ध होतील. महिला व बाल विभागाने उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे याबाबतचा एक आराखडा सादर केला होता, ज्यामध्ये बेरोजगार महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी सरकार 20% अनुदान देईल; अर्जदारांना 10% खर्च सहन करावा लागेल, तर उर्वरित 70% बँक कर्जाद्वारे कव्हर केले जाईल.
विभागाने गुलाबी रिक्षा (Pink E Rickshaw Yojana) योजनेत ई-रिक्षा प्रस्तावित केल्या आहेत कारण त्या पर्यावरणास अनुकूल आहेत आणि त्यांची कमी देखभाल देखील आवश्यक आहे.
महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय (Pink Rickshaw Yojana GR PDF):
- राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी (Pink Rickshaw Yojana) पिंक (गुलाबी) ई-रिक्षा उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय (08-07-2024) पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय (13-09-2024) पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा – महिलांना महिन्याला १५०० हजार मिळणार, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ जुलै पासून अर्ज सुरु !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!