Phule Amrutkal App : मोबाईलवर पशुसल्ला मिळवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे फुले अमृतकाळ ॲप डाउनलोड करा !
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रांतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्यावतीने विकसित करण्यात आलेल्या देशातल्या पहिल्या ‘फुले अमृतकाळ’ (Phule Amrutkal App) या पशुसल्ला मोबाईल प्रणालीचे (ॲप) लोकार्पण झाले असून, आता आपण ते मोबाईल मध्ये इंस्टाल करून मोबाईलवर पशुसल्ला घेऊ शकतो.
मोबाईलवर पशुसल्ला मिळवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे फुले अमृतकाळ ॲप डाउनलोड करा ! (Phule Amrutkal App):
भारतातील पशुधन शेतीवर हवामान बदलाचा परिणाम होतो व वातावरणीय बदलामुळे पावसाने दिलेली ओढ, अतिवृष्टी, ढगफुटी, वाढते तापमान, उष्माघात व पावसाचा अकल्पित लहरीपणा अशा गोष्टी वारंवार घडत आहेत. त्यामुळे पशुधनास चारा व पाणी पुरविण्यावर तर परिणाम होतच आहे, पण पशुधनाच्या आरोग्यावर देखील गंभीर परिणाम होत आहे.
संकरीत गाई व म्हशींमध्ये दुग्ध उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. दुभत्या गाईचे दुध उत्पादन ५ ते २० टक्क्यांपर्यंत घटल्याचे आढळून आले आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी हे ॲप महत्वाची भूमिका पार पाडेल.
या ॲपचाद्वारे शेतकऱ्यांना जनावरांचा उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी गोठ्यातील तापमान घटविण्याकरिता व योग्य आर्द्रता राखण्याकरिता सावलीची सोय करणे, योग्य वायु विजन राखणे, पिण्याकरिता थंड पाणी उपलब्ध करून देणे, फॅन किंवा फॉगर यंत्रणा स्वयंचलित पद्धतीने सुरू करणे तसेच संतुलित आहार नियोजन इत्यादी उपाय योजना करण्यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या जातील.
फुले अमृतकाळ ॲप डाउनलोड : (Phule Amrutkal App Download) :
फुले अमृतकाळ ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा किंवा गुगल प्ले स्टोअर वर “Phule Amrutkal” सर्च करून हे ॲप डाऊनलोड करावे.
फुले अमृतकाळ ॲपचा वापर असा करावा? (How to use Phule Amrutkal App?)
१) फुले अमृतकाळ ॲप डाउनलोड व इन्स्टॉल केल्या नंतर आपण नोंदणी करून आपला मोबाईल नंबर टाकावा.
२) ओटीपी मिळाल्यानंतर आपला पत्ता व लोकेशन टाकून ॲप चालू करावे.
३) आपणास हव्या असलेल्या गाईंच्या गोठ्याचे किंवा स्थळाचे लोकेशन घेऊन त्या ठिकाणीचे तापमान आद्रता निर्देशांक मिळतो. त्याद्वारे गाईंचा ताण ओळखून सल्ला मिळू शकतो.
हे ॲपचा ओपन सोर्स हवामान माहितीच्या बरोबरीनेच रिअल-टाइम तापमान ( real-time temperature) व आर्द्रतेचे सेन्सर्स डेटा (humidity sensors data) वापरून मिळणाऱ्या प्रत्यक्ष माहितीच्या माध्यमातून तापमान आर्द्रता निर्देशांकाच्या आधारे शेतकऱ्यांना पशुधनाच्या आराम आणि उत्पादकतेनुसार व्यक्तिगत सल्ला व सूचना पुरवते.
हेही वाचा – पशुस्वास्थ्य व रोग नियंत्रण योजना – Livestock Health and Disease Control
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!