वृत्त विशेष

People’s Court Week : प्रलंबित, तडजोडपात्र प्रकरणासाठी विशेष लोकअदालत सप्ताह

लोकअदालतीद्वारे पक्षकारांना जलद गतीने मिळणारा दिलासा लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडे प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी विशेष लोकअदालत सप्ताहाचे (People’s Court Week )आयोजन केले आहे. ही विशेष लोकअदालत दिनांक २९ जुलै २०२४ ते ३ ऑगस्ट २०२४ या दरम्यान होणार आहे.

लोकअदालतीमध्ये तडजोडीद्वारे निकाली निघालेल्या प्रकरणांमुळे प्रकरणातील पक्षकारांसोबत शासन आणि समाज या दोन्ही घटकांना मोठा लाभ प्राप्त झाला आहे. लोकअदालतीमुळे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. न्यायालयातील तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे आपसी सामंजस्यातून तडजोडीद्वारे निकाली काढण्याकरिता लोकअदालत हे प्रभावी माध्यम म्हणून समोर आलेले आहे. यामुळे विशेष लोकअदालती मार्फत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे लोकअदालतीच्या माध्यमातून निकाली काढण्यात येणार आहेत.

मा. सर्वोच्च न्यायालयाने लोकअदालतमध्ये (People’s Court Week ) ठेवलेल्या प्रकरणांची यादी https://legalservices.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/MAHARASHTRA.pdf  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी ज्यांची प्रकरणे या यादीमध्ये असतील त्यांनी स्वतः अथवा वकीलांमार्फत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई किंवा संबंधीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधून याचा लाभ पक्षकारांनी घ्यावा, असे आवाहन सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी केले आहे.

संपर्कासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे संपर्क क्रमांक (कंसात) पुढीलप्रमाणे : अकोला (८५९१९०३९३०), बीड (८५९१९०३६२३), चंद्रपूर (८५९१९०३९३४), गोंदिया (८५९१९०३९३५), कोल्हापूर (८५९१९०३६०९), नांदेड (८५९१९०३६२६), उस्मानाबाद (८५९१९०३६२५), रायगड (८५९१९०३६०६), सातारा (८५९१९०३६११), ठाणे (८५९१९०३६०४), यवतमाळ (८५९१९०३६२९), अहमदनगर (८५९१९०३६१६), अमरावती (८५९१९०३६२७), भंडारा (८५९१९०३९३६), धुळे (८५९१९०३६१८), जळगाव (८५९१९०३६१९), लातूर (८५९१९०३६२४), नंदूरबार (८५९१९०३९३९), , परभणी (८५९१९०३६२२), रत्नागिरी (८५९१९०३६०८), सोलापूर (८५९१९०३६१३), वर्धा (८५९१९०३९३२), मुंबई (८५९१९०३६०१), औरंगाबाद (८५९१९०३६२०), बुलढाणा (८५९१९०३६२८), गडचिरोली (८५९१९०३९३३), जालना (८५९१९०३६२१), नागपूर (८५९१९०३९३१), नाशिक (८५९१९०३६१५), पुणे (८५९१९०३६१२), सांगली (८५९१९०३६१०), सिंधुदूर्ग (८५९१९०३६०७), वाशिम (८५९१९०३९३७) आणि मुंबई उपनगर (८५९१९०३६०२).

हेही वाचा – PM Kisan Yojana 17th Installment Update : शेतकऱ्यांच्या खात्यात १८ जून २०२४ रोजी पीएम किसान योजनेचा १७वा हप्ता जमा होणार !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.