पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना – Pandit Dindayal Land Purchase yojana
शासनाच्या विविध घरकुल लाभाच्या योजनांअंतर्गत प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा असणे आवश्यक आहे. अशावेळी स्वतःची जागा नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्याकरीता राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरु केली आहे.
पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना – Pandit Dindayal Land Purchase Yojana:
योजनेचे स्वरुप:
ही योजना केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेतील घरकुल पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभधारकांना लागू राहील.
योजनेच्या अटी :
1) जिल्हाधिकारी वा शासनाकडून उपलब्ध झालेल्या शासकीय, संपादित जागा किंवा ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण हद्दीत येणारी व गावठाण हद्दीबाहेरील निवासी प्रयोजनासाठी सक्षम नियोजन प्राधिकरणाने मंजुरी दिलेल्या जागा उपलब्ध करून देण्यात येतील.
2) निवडलेल्या जागेस लाभार्थ्यांची सहमत असावी.
3) घरकुल बांधकामासाठी ५०० चौ. फुटापर्यंत जागा खरेदी करण्यास मान्यता असेल.
4) जागेची किंमत प्रती लाभार्थी ५० हजार पेक्षा जास्त असल्यास त्यावरील रक्कम लाभार्थ्यांने भरणे बंधनकारक आहे.
5) लाभार्थ्यांने जागेची निवड केल्यानंतर जागा हस्तांतरण योग्य व जागेची किंमत याची शहानिशा समिती करेल.
6) लाभार्थी जागा मालकाबरोबर विक्री करार करेल.
7) जागेसाठी देय निधी लाभार्थ्यांच्या बँक/पोस्ट खात्यात जमा करण्यापूर्वी लाभार्थ्यांने प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे. त्यानंतरच देय निधी खात्यामध्ये जमा करण्यात येईल.
8) जागेची नोंद लाभधारकाच्या पत्नीच्या नावे किंवा संयुक्त नावाने घेण्यात येईल.
योजनेअंतर्गत लाभ :
लाभार्थ्यास ५० हजार रुपयेच्या मर्यादेत म्हणजेच जागेची प्रत्यक्ष किंमत व रुपये ५० हजारापेक्षा जे कमी असेल त्याप्रमाणे निधी उपलब्ध करून दिला जाईल. यामध्ये स्टॅम्प डयूटी व जागा हस्तांतरणासाठी नियमाप्रमाणे येणारा खर्च समाविष्ट असेल.
अधिक माहितीसाठी- पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा.
शासन निर्णय: पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय योजना सुरू करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
जीआर पाठवा ना 🙏
पोस्ट मध्ये gr लिंक दिली आहे डाउनलोड करा.