सिंचन विहीर ५ लाख रुपयांच्या अनुदानासाठी असा करा ऑनलाईन अर्ज!
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहिर (Sinchan Vihir Yojana) खोदण्यासाठी ५ लाख रुपये एवढं अनुदान दिलं जाणार आहे. विहिरीसाठी (Sinchan Vihir Yojana) अनुदान मिळवायचं असेल तर यासाठीची पात्रता काय आहे, यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा, याचीच सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
सिंचन विहीर अनुदान योजना – Sinchan Vihir Yojana:
ग्रामपंचायतीमध्ये योजनेअंतर्गत साधारणतः प्रती वर्षी किती मजूर फुटकळ कामाची मागणी करतात, त्यातून किती मनुष्य दिवस निर्माण झाले याचा अभ्यास करून पुढील वर्षांचे नियोजन प्रस्तावित करून मंजुर करावे. विहिरीच्या कामांमध्ये मजूरी खर्चाच्या तुलनेत साहित्याचा खर्च जास्त आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीने विहिरीच्या कामांसोबत मजूरीप्रधान कामे उदा. भूसुधार, वृक्ष लागवड. फळबाग लागवड इत्यादी कामे घ्यावीत, जेणेकरून ग्रामपंचायतीच्या स्तरावर मजूरी व साहित्याचे ६०:४० प्रमाण राखणे शक्य होईल. त्याचप्रमाणे
- विहिरीसाठी लाभधारक निवड करताना गावपातळीवर एका आर्थिक वर्षात मजूरी व साहित्याचे प्रमाण ६०:४० राखण्यात यावे.
- अधिक विहिरींची मागणी असल्यास सुरु असलेल्या विहिरींचे कार्य पूर्ण होत जातील तसतसे पुढील नवीन विहिरींना मान्यता देण्यात यावी.
- या सदराखालील सर्व बाबींची पूर्तता होत असल्यास कोणत्या ग्रामपंचायतीत एकाच वेळी कितीही विहिरींचे कामे सुरु असू शकतात. यासंदर्भात लोकसंख्येनुसार विहीर मंजूरीची अट रद्द करण्यात येत आहे.
लाभधारकाची निवड :-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट १ कलम १ (४) मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा म्हणून (Sinchan Vihir Yojana) विहिरीची कामे अनुज्ञेय आहेत.
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- भटक्या जमाती
- निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)
- दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
- स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे
- शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
- जमीन सुधारणांचे लाभार्थी
- इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी
- अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियन २००६ (२००७ चा २) खालील लाभार्थी
- सिमांत शेतकरी (२.५ एकर पर्यंत भूधारणा)
- अल्प भूधारक (५ एकर पर्यंत भूधारणा)
लाभधारकाची पात्रता:
(अ) लाभधारकाकडे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र सलग असावे.
(च) महाराष्ट्र भुजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम १९९३ च्या कलम ३ नुसार अस्तित्वातील पेयजल खोताच्या ५०० मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल खोताच्या ५०० मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये,
क) दोन सिंचन (Sinchan Vihir Yojana) विहिरींमधील १५० मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.
- दोन सिंचन (Sinchan Vihir Yojana) विहिरीमधील किमान १५० मीटर अंतराची अट ही Run off Zone तसेच, अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येऊ नये.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून १५० मी. अंतराची अट लागू राहणार नाही.
ङ) लाभधारकाच्या ७/१२ वर याआधीच विहीरीची नोंद असू नये.
ई) लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा. (Online)
फ) एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमीनीचे क्षेत्र ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असावे.
(ग) ज्या लाभार्थ्यांना (Sinchan Vihir Yojana) विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :-
- ७/१२ चा ऑनलाईन उतारा.
- ८ अ चा ऑनलाईन उतारा.
- जॉबकार्ड ची प्रत.
- सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून ०.४० हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन असल्याचा पंचनामा.
- सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र.
सिंचन विहीर ५ लाख रुपयांच्या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस – Online Apply for Sinchan Vihir yojana:
मनरेगा योजनेअंतर्गत जास्ती जास्त नागरिकांनी सिंचन विहिरी (Sinchan Vihir Yojana) व बागायत लागवडच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना सुलभरीत्या अर्ज करता यावा याकरिता महा ईजीएस हॉर्टिकल्चर वेल मोबाईल ॲप्लिकेशन (MAHA EGS Horticulture Well App) सुरु करण्यात आले आहे.
सिंचन विहीर (Sinchan Vihir yojana) ५ लाख रुपयांच्या अनुदानासाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम MAHA – EGS Horticulture /Well App हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करा.
अर्जासाठी मोबाईल ॲप (MAHA EGS Horticulture Well App):
महा ईजीएस हॉर्टिकल्चर वेल (MAHA EGS Horticulture Well App) मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महा ईजीएस हॉर्टिकल्चर वेल (MAHA EGS Horticulture Well App) हे ॲप डाउनलोड केल्यानंतर दोन पर्याय दिसतील लाभार्थी लॉगिन आणि विभागाचे लॉगिन त्यामधील लाभार्थी लॉगिन हा पर्याय निवडा.
लाभार्थी लॉगिन हा पर्याय निवडल्यानंतर पुढे विहीर अर्ज हा पर्याय निवडा.
यानंतर अर्जदार लाभार्थी तपशील या पेजवर आपली सर्व माहिती भरायची आहे यामध्ये अर्जदाराचे नाव, मोबाइल नंबर, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, गावाचे नाव, मनरेगा जॉब कार्ड क्रमांक, मनरेगा जॉब कार्ड अपलोड करणे, जातीचा प्रवर्ग निवडा, एकूण जमीन धारणा, विहिरीचा भूमापन क्रमांक, धारण क्षेत्र व त्याचा सातबारा अपलोड करा, व सिंचन (Sinchan Vihir Yojana) विहिरीच्या बांधकामासाठी प्रस्तावित मजुरांचा जॉब कार्ड क्रमांक टाकायचा आहे, व पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
यानंतर प्रपत्र अ मध्ये आपण भरलेली सर्व माहिती दाखवली जाईल ती वाचून पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
यानंतर प्रपत्र ब मध्ये आपल्याला योजनेच्या संदर्भातील सर्व अटी, शर्थी व निकष दाखवले जातील ते वाचून पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
यानंतर आपल्या मोबाईल वरती एक ओटीपी पाठवला जाईल तो टाकायचा आहे व प्रस्तुत करा वरती क्लिक करा. त्यानंतर अर्ज सबमिट झाल्याचा मेसेज आपल्या मोबाईल मध्ये येईल.
अर्ज सबमिट झाल्याचा मेसेज आपल्या मोबाईल मध्ये आल्यानंतर आपल्याला पुन्हा अर्जाची स्थिती या पर्यायावर क्लिक करायच आहे व त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून प्रस्तुत करा वरती क्लिक करून आपण भरलेल्या अर्जाची स्थिती येथे पाहू शकता व अर्जामध्ये काही चुका झाल्यास Edit सुद्धा करू शकता.
या मोबाईल (MAHA EGS Horticulture Well App) ॲप्लिकेशनचा वापर करून जास्तीत जास्त लोकांनी मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर व बागायत लागवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर अनुदान योजना ऑफलाईन नमुना अर्ज – Sinchan Vihir Yojana PDF Form:
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट्र अंतर्गत सिंचन (Sinchan Vihir Yojana) सुविधा म्हणून वैयक्तिक लाभाची सिंचन विहीर मंजूर करणेसाठी ऑफलाईन नमुना अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
खालील लेख देखील वाचा !
- मनरेगा संबंधित तक्रार आणि सुचना ऑनलाईन नोंदवा ! Register MNREGA related complaints and suggestions online!.
- नवीन विहीर योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा!
- विहीर पुनर्भरण योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा!
- मनरेगा अंतर्गत शेततळे अनुदान योजना!
- मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर अनुदान योजना
- प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना; सौर कृषी पंपांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु !
- पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु !
- मागेल त्याला सौर कृषी पंप योजना; असा करा ऑनलाईन अर्ज!
- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४; आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज!
- कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी सुरु; असा करा ऑनलाईन अर्ज ! – Kusum Solar Pump Yojana Online Registration
- सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!