पीएम-केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सुरु !
महिला आणि बालविकास मंत्रालयाने, ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’ या योजनेअंतर्गत अर्ज पाठविणे,सहाय्य करण्यासाठी त्या मुलांची ओळख पटविणे आणि त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ करणे, सुनिश्चित करण्यासाठी PM CARES for Children हे वेब आधारित पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर बालकांची नोंदणी आणि लाभार्थ्यांची ओळख पटवण्याचे मोड्यूल कार्यान्वित केले आहे. पोर्टलवर नियमितपणे आवश्यक असलेली माहिती आणि मोड्यूल अद्ययावत केली जातील.
केंद्र सरकारने, ज्या बालकांचे आई-वडील, हयात असलेले एकमेव पालक, कायदेशीर पालक अथवा दत्तक पालक कोविड-19 महामारीत म्रुत्यूमुखी पडले आहेत, अशा बालकांना सहाय्य करण्यासाठी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन (PM CARES for children) या योजनेची घोषणा केली होती. ज्या बालकांनी आपल्या पालकांना कोविड महामारीमुळे गमावले आहे, अशा सर्व मुलांची सर्वतोपरी काळजी आणि संरक्षणाची हमी सातत्याने घेणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. आरोग्य विम्याद्वारे त्यांचे कल्याण करणे, शिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करणे आणि वयाच्या 23 व्या वर्षी स्वतःच्या अस्तित्वाला उपयुक्त ठरेल अशाप्रकारे 10 लाख रुपयांचे अर्थसहाय्य करणे, या गोष्टींचा या योजनेत अंतर्भाव आहे.
15 जुलै 2021 रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील एसीएस/प्रधान सचिव/महिला आणि बालविकास विभागाचे सचिव/सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग यांचे सचिव यांच्यासाठी या योजनेचे सादरीकरण पोर्टलवर करण्यात आले होते. महिला आणि बाल विकास विभाग/सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग (जे योग्य असेल त्याप्रमाणे) यांना पाठविण्याच्या विनंतीसह, जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा बाल संरक्षण युनिट आणि बाल कल्याण अधिकारी यांचे लॉगिन आयडी आणि संकेतशब्द देखील संबंधित अधिकाऱ्यांसोबत सामायिक केले गेले आहेत.
महिला आणि बालविकास मंत्रालयाने दिनांक 22 जुलै 2021 रोजी सर्व केंद्र शासित प्रदेशांच्या प्रशासकांना आणि राज्यांच्या मुख्य सचिवांना त्यांच्या त्यांच्या राज्यातील जिल्हा दंडाधिका-यांना PM CARES for Children योजनेअंतर्गत सहाय्य मिळविण्यासाठी पात्र असलेल्या मुलांची ओळख पटवून माहिती द्यावी, असे निर्देश दिले आहेत. तसेच अशा मुलांना या योजनेत समाविष्ट करण्यासाठी आणि त्यांना तातडीने मदत करण्यासाठी पात्र मुलांच्या तपशीलांसह PM CARES for Children पोर्टलवर ते प्रसिध्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांना अशा मुलांची नोंदणी करण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे काम पुढील 15 दिवसात पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी एक समर्पित मदत डेस्क स्थापन करण्यात आले आहे, ज्यावर दूरध्वनीद्वारे 011-23388074 या क्रमांकावर किंवा pmcares-children.wcd@nic.in या ई-मेलद्वारे संपर्क करता येईल.
मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांना तसेच राज्यांच्या मुख्य सचिवांना या पोर्टलवरील डेटा एन्ट्रीच्या प्रगतीवर व्यक्तिगतपणे लक्ष ठेवण्याची विनंती केली आहे.
मुलांसाठी पंतप्रधान केअर अंतर्गत सहाय्यासाठी पात्र मुलांची ओळख पटविणे:
पात्रता: अशी सर्व मुले ज्यांनी,
- दोन्ही पालक गमावले आहेत
- एक पालक हयात असलेली
- कायदेशीर पालक/दत्तक पालक कोविड महामारीमुळे गमावलेली
अशी सर्व बालके या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असतील.
पीएम-केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज – (PM CARES for Children Scheme):
पीएम-केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील PM CARES for Children पोर्टलला भेट द्या.
पीएम-केअर्स फॉर चिल्ड्रेन पोर्टल ओपन झाल्यानंतर ‘Child Registration‘ बटणावर क्लिक करून बाल नोंदणीची प्रक्रिया सुरू करा.
`’Child Registration` बटणावर क्लिक केल्यावर, एक फॉर्म उघडा होईल. फॉर्ममध्ये, माहिती देणाऱ्याला त्याचा/तिचा मोबाइल नंबर पडताळणीच्या उद्देशाने टाकावा लागतो.
‘ Send OTP‘ बटणावर क्लिक करा, मोबाइलवर एक ओटीपी पाठवला जाईल. पुढे दिलेल्या फॉर्ममध्ये OTP टाकावा लागेल.
Verify बटणावर क्लिक करा, बाल नोंदणी फॉर्म उघडेल, तो फॉर्म पूर्ण भरून सबमिट करा आणि अप्लिकेशन आयडी सेव्ह करा. आपण नोंदणीकृत अर्जाची स्थिती ‘View Status of Application‘ वर क्लिक करून ट्रॅक करू शकता.
हेही वाचा – पीएम-केअर्स फॉर चिल्ड्रेन योजना
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!