सरकारी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेष

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु (गाई /म्हशी, शेळ्या, मेंढ्या, व कुक्कूट पक्षी वाटप योजना)

राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असून पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

अधिकाधिक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेता यावा यासाठी सविस्तर माहिती देऊन शेवटच्या घटकापर्यंत वैयक्तिक लाभाच्या योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक / शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे. आता याबरोबरच जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सदर संगणक प्रणाली लागू करण्यात येत आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी पुढील 5 वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा मिळेल, हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.

नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२२-२३ या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे. त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.

योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील वरील संकेतस्थळावर तसेच मोबाईल अँपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जातील. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वतःचे मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये.

अर्ज करावयाचा कालावधी: 

जिल्हाचालु दिनांकसमाप्त दिनांक
अर्ज करावयाचा कालावधी०९.११.२०२३१८.१२.२०२३

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या विविध योजना:

१) दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे:

संकरित गाय – एच.एफ. / जर्सी म्हैस – मुऱ्हा / जाफराबादी देशी गाय – गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी.

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने)

१. महिला बचत गट (अ.क्र. २ ते ३ मधील).

२. अल्प भूधारक (१ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक).

३. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले).

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील:

Table of Contents

अ.क्र.
बाब
२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात )
अ.क्र.
बाब
२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात )
संकरित गाई चा गट – प्रति गाय रु. ७०,०००/- प्रमाणे
१,४०,०००
म्हशी चा गट – प्रति म्हैस रु. ८०,०००/- प्रमाणे
१,६०,०००
जनावरांसाठी गोठा
जनावरांसाठी गोठा
स्वयंचलित चारा कटाई यंत्र
स्वयंचलित चारा कटाई यंत्र
खाद्य साठविण्यासाठी शेड
खाद्य साठविण्यासाठी शेड
१०.२० टक्के (अधिक १८ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा
१६,८५०
१०.२० टक्के (अधिक १८ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा
१९,२५८
एकूण प्रकल्प किंमत
१,५६,८५०
एकूण प्रकल्प किंमत
१,७९,२५८

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र.
प्रवर्ग
२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात)
अ.क्र.
प्रवर्ग
२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात)
शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के
१,१७,६३८
शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के
१,३४,४४३
स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के
३९,२१२
स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के
४४,८१५
शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के
७८,४२५
शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के
८९,६२९
स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के
७८,४२५
स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के
८९,६२९

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:

१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
२) सातबारा (अनिवार्य)
३) ८ अ उतारा (अनिवार्य)
४) अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
५) आधारकार्ड (अनिवार्य )
६) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
७) अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

२) अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे:

टीप :-

1. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्ह्यात मध्ये राबवली जाणार नाही.
2. योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
3. योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्‍या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने):

१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी.

२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक).

३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक).

४) सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.).

5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील).

एका गटातील किंमत खालील प्रमाणे राहील:

अ.क्र.तपशीलदर(रक्कम रुपयात )१० शेळ्या व १ बोकड (रक्कम रुपयात)
1शेळ्या खरेदी८,०००/- प्रति शेळी (ऊस्मानाबाद /संगमनेरी जातीच्या पैदासक्षम )

६,०००/- प्रति शेळी (अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )

८०,०००/- (१० शेळ्या )

६०,०००/- (१० शेळ्या )

2बोकड खरेदी१०,०००/- एक बोकड (ऊस्मानाबाद/संगमनेरी जातीच्या नर )

८,०००/- एक बोकड (अन्य स्थानिक पैदासक्षम नर )

१०,०००/- (१ बोकड )

८,०००/- (१ बोकड )

3शेळ्या व बोकडाचा विमा (तीन वर्षासाठी )१२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर)रु १३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )

रु १०,२३१/- (अन्य स्थानिक जातींसाठी )

4शेळ्यांचे व्यवस्थापन (खाद्य , चाऱ्यावरील खर्च )लाभार्थीने स्वतः करणे अपेक्षित
एकूण खर्च१,०३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )

७८,२३१/- (अन्य स्थानिक जातीसाठी )

अ.क्र.तपशीलदर(रक्कम रुपयात )१० मेंढया व १ नरमेंढा (रक्कम रुपयात)
1मेंढया खरेदी१०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ )

८,०००/- प्रति मेंढी (दख्खनी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )

१,००,०००/- (१० मेंढया )

८०,०००/- (१० मेंढया )

नरमेंढा खरेदी१२,०००/- एक नरमेंढा (माडग्याळ)

१०,०००/- एक नरमेंढा (दख्खनी व अन्य स्थानिक जातीच्या नर )

१२,०००/- (१ नरमेंढा )

१०,०००/- (१ नरमेंढा )

3मेंढया व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी )१२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर)रु १६,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

रु १३,५४५/- (दख्खनी व अन्य स्थानिक जातीसाठी )

4शेळ्यांचे व्यवस्थापन (खाद्य , चाऱ्यावरील खर्च )लाभार्थीने स्वतः करणे अपेक्षित
एकूण खर्च१,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

१,०३,५४५/- (दख्खनी व अन्य स्थानिक जातीसाठी )

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील:

अ.क्र.गटप्रवर्गएकूण किंमतशासनाचे अनुदानलाभार्थ्याचा स्वहिस्सा
1शेळी गट – उस्मानाबादी /संगमनेरीसर्वसाधारण१,०३,५४५/-५१,७७३/-५१,७७२/-
अनु. जाती व जमाती१,०३,५४५/-७७,६५९/-२५,८८६/-
2शेळी गट – अन्य स्थानिक जातीसर्वसाधारण७८,२३१/-३९,११६/-३९,११५/-
अनु. जाती व जमाती७८,२३१/-५८,६७३/-१९,५५८/-
3मेंढी गट – माडग्याळसर्वसाधारण१,२८,८५०/-६४,४२५/-६४,४२५/-
अनु. जाती व जमाती१,२८,८५०/-९६,६३८/-३२,२१२/-
दख्खनी व अन्य स्थानिक जातीसर्वसाधारण१,०३,५४५/-५१,७७३/-५१,७७२/-
अनु. जाती व जमाती१,०३,५४५/-७७,६५९/-२५,८८६/-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:

१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
२) सातबारा (अनिवार्य)
३) ८ अ उतारा (अनिवार्य)
४) अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
५) आधारकार्ड (अनिवार्य )
६) रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
७) बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
८) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (अनिवार्य )
९) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
१०) अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार, स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

३) 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे:

टीप :-

1. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्हया मध्ये राबवली जाणार नाही.
2. लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला व 3 टक्के विकलांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे.

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने):

१) अत्यल्प भुधारक शेतकरी (१ हेक्टर पर्यतचे भुधारक).

२)अल्प भुधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्यतचे भुधारक).

३) सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोद असलेले).

४) महिला बचत गटातील लाभार्थी /वैयक्तिक महिला लाभार्थी (अ. क्रं १ ते ३ मधील).

1000 मांसल पक्षी संगोपनाचा बाबनिहाय खर्चाचा तपशिल:

अ.क्र.तपशीललाभार्थी /शासन सहभाग (रक्कम रुपयात)एकूण अंदाजित किंमत (रक्कम रुपयात)
1जमीनलाभार्थीस्व:ताची/भाडेपट्ट्यावर घेतलेली
2पक्षीगह 1000 चौ फुट , स्टोअर रुम, पाण्याची टाकी , निवासाची सोय , विदयुतीकरणलाभार्थी / शासन2,00,000/-
3उपकरणे/खादयाची, पाण्याची भांडी, ब्रुडर इ.लाभार्थी /शासन25000/-
एकूण खर्च2,25,000/-

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील:

अ.क्र.प्रवर्ग1000 मांसल पक्षी (रक्कम रुपयात)
1शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के

१,६८,७५०/-
1स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के

५६,२५०/-
2शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के

१,१२,५००/-
2स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के

१,१२,५००/-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:

१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
२) सातबारा (अनिवार्य)
३) ८ अ उतारा (अनिवार्य)
४) अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
५) आधारकार्ड (अनिवार्य )
६) रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
७) बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
८) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (अनिवार्य )
९) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
१०) अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

४) १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे:

टीप :-

१. योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
2. योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्‍या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
3. लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलांना प्राधान्य देण्यात यावे..

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने):

१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी.
२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक).
३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक).
४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील ).

एका गटातील किंमत खालील प्रमाणे राहील:

अ.क्र.तपशीलदर(रक्कम रुपयात )१० शेळ्या व १ बोकड (रक्कम रुपयात)
1शेळ्या खरेदी८,०००/- प्रति शेळी (ऊस्मानाबाद /संगमनेरी जातीच्या पैदासक्षम )

६,०००/- प्रति शेळी (अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )

८०,०००/- (१० शेळ्या )

६०,०००/- (१० शेळ्या )

2बोकड खरेदी१०,०००/- एक बोकड (ऊस्मानाबाद/संगमनेरी जातीच्या नर )

८,०००/- एक बोकड (अन्य स्थानिक पैदासक्षम नर )

१०,०००/- (१ बोकड )

८,०००/- (१ बोकड )

3शेळ्या व बोकड्याचा विमा (तीन वर्षासाठी )१२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर)रु १३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )

रु १०,२३१/- (अन्य थानिक जातींसाठी )

4शेळ्यांचे व्यवस्थापन (खाद्य , चाऱ्यावरील खर्च )लाभार्थ्याने स्वतः करणे अपेक्षित
एकूण खर्च१,०३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )

७८,२३१/- (अन्य स्थानिक जातीसाठी )

अ.क्र.तपशीलदर(रक्कम रुपयात )१० मेंढया व १ नरमेंढा (रक्कम रुपयात)
1मेंढया खरेदी१०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ )

८,०००/- प्रति मेंढी (दख्खनी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )

१,००,०००/- (१० मेंढया )

८०,०००/- (१० मेंढया )

नरमेंढा खरेदी१२,०००/- एक नरमेंढा (माडग्याळ)

१०,०००/- एक नरमेंढा (दख्खनी व अन्य स्थानिक जातीच्या नर )

१२,०००/- (१ नरमेंढा )

१०,०००/- (१ नरमेंढा )

3मेंढया व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी )१२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर)रु १६,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

रु १३,५४५/- (दख्खनी व अन्य स्थानिक जातीसाठी )

4शेळ्यांचे व्यवस्थापन (खाद्य , चाऱ्यावरील खर्च )लाभार्थीने स्वतः करणे अपेक्षित
एकूण खर्च१,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

१,०३,५४५/- (दख्खनी व अन्य स्थानिक जातीसाठी )

अ.क्र.तपशीलदर(रक्कम रुपयात )१० मेंढया व १ नरमेंढा (रक्कम रुपयात)
1मेंढया खरेदी१०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ )

८,०००/- प्रति मेंढी (दख्खनी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )

१,००,०००/- (१० मेंढया )

८०,०००/- (१० मेंढया )

नरमेंढा खरेदी१२,०००/- एक नरमेंढा (माडग्याळ)

१०,०००/- एक नरमेंढा (दख्खनी व अन्य स्थानिक जातीच्या नर )

१२,०००/- (१ नरमेंढा )

१०,०००/- (१ नरमेंढा )

3मेंढया व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी )१२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर)रु १६,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

रु १३,५४५/- (दख्खनी व अन्य स्थानिक जातीसाठी )

4शेळ्यांचे व्यवस्थापन  (खाद्य , चाऱ्यावरील खर्च )लाभार्थीने स्वतः करणे अपेक्षित
एकूण खर्च१,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

१,०३,५४५/- (दख्खनी व अन्य स्थानिक जातीसाठी )

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील:

अ.क्र.गटप्रवर्गएकूण किंमतशासनाचे अनुदानलाभार्थ्याचा स्वहिस्सा
1शेळी गट – उस्मानाबादी /संगमनेरीअनु. जाती व जमाती१,०३,५४५/-७७,६५९/-२५,८८६/-
2शेळी गट – अन्य स्थानिक जातीअनु. जाती व जमाती७८,२३१/-५८,६७३/-१९,५५८/-
3मेंढी गट – माडग्याळअनु. जाती व जमाती१,२८,८५०/-९६,६३८/-३२,२१२/-
दख्खनी व अन्य स्थानिक जातीअनु. जाती व जमाती१,०३,५४५/-७७,६५९/-२५,८८६/-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:

१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
२) सातबारा (अनिवार्य)
३) ८ अ उतारा (अनिवार्य)
४) अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
५) आधारकार्ड (अनिवार्य )
६) रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
७) बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
८) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (अनिवार्य )
९) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
१०) अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

५) दोन दुधाळ गाई /म्हशीचे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना वाटप करणे:

टीप :- १ लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलांना प्राधान्य देण्यात यावे..

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने):

१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी.

२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक).

३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक).

४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.).

5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील).

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील:

अ.क्र.बाब२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात )
1संकरित गाई /म्हशी चा गट – प्रति गाय /म्हैस रु. ४०,०००/- प्रमाणे८०,०००
2५.७५ टक्के (अधिक १०.०३ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा५,०६१
एकूण प्रकल्प किंमत८५,०६१

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील:

अ.क्र.प्रवर्ग२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात)
1शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के

६३,७९६

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:

१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
२) सातबारा (अनिवार्य)
३) ८ अ उतारा (अनिवार्य)
४) अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
५) आधारकार्ड (अनिवार्य )
६) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
७) अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

६) ८ ते १० आठवडे वयाच्या तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे:

टीप :- १ लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलांना प्राधान्य देण्यात यावे..

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने):

१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी.

२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक).

३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक).

४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.).

5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील ).

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील:

अ.क्र.बाबजिल्हास्तरीय तलंगा गट(२५ माद्या + ३ नर)
1पक्षी किंमत३,००० /-
2खाद्यवरील खर्च१,४०० /-
वाहतूक खर्च१५० /-
औषधी५० /-
रात्रीचा निवारा१,००० /-
खाद्याची भांडी४०० /-
एकूण किंमत६,००० /-

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील:

अ.क्र.प्रवर्गजिल्हास्तरीय तलंगा गट(२५ माद्या + ३ नर)
1सर्व प्रवर्ग ५० टक्के

३,००० /-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:

१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
२) सातबारा (अनिवार्य)
३) ८ अ उतारा (अनिवार्य)
४) अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
५) आधारकार्ड (अनिवार्य )
६) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
७) अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

७) एकदिवशीय सुधारित पक्षांच्या १०० पिल्लांचे वाटप करणे:

टीप :– १ लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलांना प्राधान्य देण्यात यावे..

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने):

१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी.

२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक).

३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक).

४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.).

5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील).

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील:

अ.क्र.बाबएकदिवशीय पक्षांच्या पिल्लांचे गट (१०० पिल्ले)
1पक्षी किंमत२,००० /-
2खाद्यवरील खर्च१२,४०० /- (८०० किलोग्रॅम)
वाहतूक खर्च१०० /-
औषधी१५० /-
रात्रीचा निवारा१,००० /-
खाद्याची भांडी३५० /-
एकूण किंमत१६,००० /-

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील:

अ.क्र.प्रवर्गएकदिवशीय पक्षांच्या पिल्लांचे गट (१०० पिल्ले)
1सर्व प्रवर्ग ५० टक्के

८,००० /-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –

१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
२) सातबारा (अनिवार्य)
३) ८ अ उतारा (अनिवार्य)
४) अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
५) आधारकार्ड (अनिवार्य )
६) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
७) अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

ऑनलाईन अर्ज करा:

पशुसंवर्धन विभागाच्या वरील विविध योजनांसाठी खालील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत पोर्टलवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करावा किंवा AH-MAHABMS या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत अँड्रॉईड मोबाईल अप्लिकेशन डाउनलोड करून ऑनलाईन अर्ज करा.

पशुसंवर्धन विभागाची अधिकृत पोर्टल: http://ah.mahabms.com/webui/registration

पशुसंवर्धन विभागाचे अधिकृत अप्लिकेशन: पशुसंवर्धन – AH – MAHABMS

संपर्क: योजने संदर्भात अडचण असल्यास आपल्या जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्याशी संपर्क साधण्यासाठी इथे क्लिक करा.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक: १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ यावर अधिक माहिती घेता येणार आहे. टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी ( विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा – राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM); शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा – National Livestock Mission

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

2 thoughts on “पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु (गाई /म्हशी, शेळ्या, मेंढ्या, व कुक्कूट पक्षी वाटप योजना)

  • Dharamendra kisan meshram

    Wonderful yojna is very profitabal occupation for tha farmer

    Reply
  • Dnyaneshwar Ajinath salgar

    Good

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.