महाराष्ट्र जमीन महसूल कायदातलाठी कार्यालय नोंदवह्यावृत्त विशेषसरकारी कामे

1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारा ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा? जाणून घ्या सविस्तर

जमिनीशी संबंधित कोणताही खरेदी विक्रीचा व्यवहार करायचा असल्यास काय महत्वाचं असतं तर त्या जमिनीचा (Old Land Records) पूर्वीचा इतिहास माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे आता हा इतिहास म्हणजे नेमकं काय तर ती जमीन मूळची कोणाच्या नावावर होती आणि दिवसेंदिवस त्या जमिनीचा अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती असणे आवश्यक असतं.

ही माहिती कुठे असते तर ती तहसीलदार कार्यालय किंवा भूमिअभिलेख कार्यालयत सातबारा उतारा खाते उतारा फेरफार या परिपत्रकांमध्ये ही माहिती नमूद केलेली असते. आता ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाइन देण्याचे सुरू केली आहे महाराष्ट्र सरकारने ई-अभिलेख या प्रकल्पांतर्गत किंवा या कार्यक्रमाद्वारे राज्यभरातील सगळ्या जिल्ह्यामधल्या तीस कोटी अभिलेख उताऱ्यांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. फेरफार उतारे (Old Land Records) आता सरकार ऑनलाइन उपलब्ध करून देत आहे पण हे उतारे ऑनलाईन कसे पाहायचे याची माहिती आपण आता घेणार आहोत.

1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारा ऑनलाईन डाउनलोड करण्याची प्रोसेस – Old Land Records:

1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारा (Old Land Records) ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी खालील महसूल विभागाची वेबसाईट लिंक ओपन करा.

https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in

१) या वेबसाईट वर पहिल्यांदा नवीन वापरकर्ता नोंदणी करण्यासाठी “New User Registration” पर्यायावर क्लिक करा.

२) एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. या फॉर्ममध्ये तुम्हाला सुरुवातीला वैयक्तिक माहिती भरायची आहे.यामुळे तुमचे नाव, मधले नाव, आडनाव, राष्ट्रीयत्व, मोबाईल नंबर, व्यवसाय, ईमेल आयडी, जन्मतारीख इत्यादी गोष्टी ची नोंद करायचे आहे.

३) वैयक्तिक माहिती भरून झाली की तुम्हाला तुमच्या पत्त्या विषयीची माहिती द्यायची आहे. यामध्ये घर क्रमांक, मजला क्रमांक, इमारतीचे नाव पिनकोड, स्थान, शहर, जिल्हा, राज्य इत्यादींची माहिती द्यायची असते.

४) हे भरून झाल्यानंतर तुम्हाला एक लॉगिन आयडी बनवायचा आहे. यानंतर तुमच्या समोर वापर करता नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे असा मेसेज येईल.

५) त्यानंतर लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचा आहे. आता आपण जुना फेरफार उतारा कसा पाहायचा ते पाहू.

लॉगिन
लॉगिन

६) जुना फेरफार (Old Land Records) उतारा पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडायचे आहे, पण इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची सध्या महाराष्ट्र सरकारने ही सुविधा फक्त निवडक जिल्ह्यासाठीच उपलब्ध करून दिली आहे. पण लवकरच ही सुविधा राज्यभरातील सगळ्या जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार आहेत.

७) पुढे तालुका, गावाचे नाव आणि अभिलेख प्रकार निवडायचा आहे. यात तुम्हाला कोणता अभिलेख उतारा हवा आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. आता समजा मी इथे फेरफार उतारा काढण्यासाठी फेरफार उतारा निवडला. जर तुम्हाला सातबारा हवा असेल तर सातबारा आठ अ उतारा हवा असेल तर ८अ हा पर्याय निवडायचा. असे एकूण ६४ अभिलेखांचे प्रकार येथे उपलब्ध आहेत.

८) त्यानंतर गट क्रमांक टाकून शोध (Search) या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

Basic Search (Old Land Records)
Basic Search

९) त्यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसते.

१०) फेरफाराचं वर्षं आणि क्रमांक तिथं दिलेला असतो. तुम्ही त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहू शकता.

जर मला 1982 सालचा फेरफार (Old Land Records) पाहायचा असेल, तर त्या समोरील कार्ड मध्ये ठेवा हा पर्याय यावर क्लिक केला आहे. आता समजा आपण पेज क्रमांक एक वरील माहिती पाहत आहोत त्याच्या समोरील वर्षांचे फेरफार उतारे तुम्हाला पाहायचे असल्यास तर तुम्ही पेज 2, तीन वर क्लिक करुन ही माहिती पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला पुनरावलोकन कार्ड या वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचे कार्ड तुमच्यासमोर ओपन होईल.

त्याखाली असलेल्या पुढे जा या पर्यायावर क्लिक केलं की डाउनलोड सध्याची फाईल अशी ओपन होईल आणि सद्यस्थिती उपलब्ध आहे. त्या समोरील फाईल पहा. यावर क्लिक केलं की, तुमच्या समोर येतं 1982 फेरफार (Old Land Records) पत्र ओपन होईल. या पत्रकारावरील खाली बान असलेल्या चिन्हावर जर तुम्ही क्लिक केलं तर ते डाऊनलोड होईल आता तुम्ही स्क्रीन वर 1982 सालचा फेरफार उतारा पाहू शकता.

या जमिनीचा (Old Land Records) अधिकार अभिलेखात काय बदल झाले, नेमका जमिनीचा व्यवहार कोणा – कोणा मध्ये झाला आणि तो कधी झाला याची सविस्तर माहिती दिलेली आहे. याच पद्धतीने तुम्ही सातबारा उतारा आणि आठ अ इत्यादी अभिलेखांची माहिती पाहू शकता. आम्ही दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये कळवा माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना देखील शेअर करा.

पुढील लेख देखील वाचा!

  1. जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते? जाणून घ्या सविस्तर माहिती
  2. गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती !
  3. सातबारा (7/12) वरील चुकांची दुरुस्ती कशी करावी? जाणून घ्या सविस्तर
  4. सातबारा (7/12) उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
  5. जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती
  6. सर्व्हे नंबर, भूमापन क्रमांक आणि गट नंबर याबाबत सविस्तर माहिती !
  7. जमिनीची सरकारी किंमत ऑनलाईन कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर
  8. जमीन किंवा बिगर शेती जमीन (NA Plot) खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी ? जाणून घ्या सविस्तर
  9. जमिनीचे वारस नोंद करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती
  10. तलाठी कार्यालयातील गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती
  11. डिजिटल स्वाक्षरीचा ८अ खाते उतारा ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा? जाणून घ्या सविस्तर

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

3 thoughts on “1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारा ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा? जाणून घ्या सविस्तर

  • Pavan Shevatre

    जालना जिल्हा नाव नाही आहे?

    Reply
    • महाराष्ट्र सरकारने ही सुविधा फक्त निवडक जिल्ह्यासाठीच उपलब्ध करून दिली आहे. पण लवकरच ही सुविधा राज्यभरातील सगळ्या जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार आहेत.

      Reply
  • SANJAY MARSALE

    खूप उपयुक्त माहिती आपण देतात आपले मनस्वी आभार

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.