सरकारी कामेआपले सरकार - महा-ऑनलाईनजिल्हा परिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेष

आता पोस्टमन काढणार लहान मुलांचे आधारकार्ड; जाणून घ्या सविस्तर माहिती !

आधारकार्ड हे आजकाल सर्वांसाठी महत्वाचे आहे. त्यामुळे लहान मुलांचेही आधारकार्ड जरूर बनवले पाहिजे. जर तुमच्या मुलांचे आधारकार्ड बनवलेले नसेल तर तुम्हाला अनेक ठिकाणी अडचणी येऊ शकतात. नवीन शाळेसाठी मुलांची प्रवेश प्रक्रिया सुरु होताना, पालकांना त्याबाबतची पळापळ देखील सुरु करावी लागते, कारण त्यासाठी अनेक कागदपत्रांची देखील आवश्यकता पडणार आहे. ज्यामधील एक आधारकार्ड देखील आहे.

पाच वर्षाखालील मुलामुलींचे आधारकार्ड काढण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांना ही यापूर्वी देण्यात आलेली होती. जून महिन्यापासून पोस्टमनकडे जबाबदारी देण्यात आली असून ग्रामीण भागात लहान मुलांच्या आधार मोहिमेला बळ मिळाले आहे. घरोघरी पोहोचणाऱ्या पोस्टमनच्या माध्यमातून लहान मुलांचे आधारकार्ड तयार करणे अधिक सोपे झाले आहे. त्यामुळे नागरिकांना आता आपल्या गावातच मुलांचे आधारकार्ड मिळविण्याची प्रक्रिया करता येणार आहे.

आता पोस्टमन घरोघरी टपाल बटवडा करणारे पोस्टमन आधार काढण्याचे देखील काम करीत आहेत. ग्रामीण भागातील जनतेचे आधारकार्ड काढण्याबरोबरच आता पाच वर्षाखालील मुलांचे आधारकार्डही काढले जात आहे. यासाठी त्यांना अंगणवाडी सेविकांची मदत होत आहे. त्यामुळे आधारकार्ड काढण्यासाठी होणारी लूटदेखील थांबणार आहे.

अंगणवाडी सेविकांवर होती जबाबदारी

गाव खेड्यात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांवर यापूर्वी बालकांचे आधारकार्ड काढण्याची जबाबदारी देण्यात आलेली होती. परंतु आता पोस्टमनच्या माध्यमातून लहान मुलांचे आधारकार्ड काढले जात आहे. जून महिन्यापासून अंगणवाडी सेविकांच्या मदतीने पोस्टमन अंगण वाड्यांमधून मोहीम राबवत आहेत.

काय कागदपत्रे लागणार ?

लहान मुलांचे आधारकार्ड काढण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

  1. मुलाचे मूळ जन्म प्रमाणपत्र,
  2. पालकांपैकी एकाचे आधारकार्ड,
  3. दोन्ही कागदपत्रांची मूळ प्रत दाखविणे बंधनकारक आहे.

अंगणवाड्यांमध्ये राबविली जाते मोहीम:

सीईएलसी माध्यमातून मोबाईल डिव्हाईस आणि थम्ब स्कॅनरचा वापर करून पोस्टमन आधारकार्ड काढून देत आहेत. लहान मुलांचे आधारकार्ड काढण्यासाठी अंगणवाड्यांमध्ये जाऊन मोहीम राबविली जात आहे.

गावातल्या गावात काढा आधारकार्ड:

गावातल्या गावात आधारकार्ड काढण्याची सुविधा पोस्टमनमुळे उपलब्ध झाली आहे. गावात येणाऱ्या पोस्टमनकडे किंवा गावातील टपाल कार्यालयात आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते.

अंगणवाडी सेविका करणार मदत:

लहान मुलांचे आधारकार्ड काढण्यासाठी यापूर्वी अंगणवाडी सेविकांना जबाबदारी होती. आता अंगणवाडीतील पाच वर्षाखालील मुलांचे आधारकार्ड काढण्यासाठी अंणवाडी सेविकांची मदत घेऊन अंगणवाडीत आधाराचे शिबिर घेतले जाते. यासाठी अंगणवाडी सेविकांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरते.

शहारात किंवा आधार केंद्रावर जाऊन रांगेत वाट पाहण्यापेक्षा ग्रामीण भागातील जनतेला पोस्टमन किंवा ग्रामीण टपाल खात्यात सुविधा उपलब्ध आहे. पोस्टमनच्या माध्यमातून आधारकार्ड काढण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यात यावा.

लहान मुलांचे आधारकार्ड बनवण्याचे फायदे:

  • आधारकार्ड हे मुलांचे ओळखपत्र म्हणून काम करेल. लहान मुलांचे ड्रायव्हिग लायसन्स किंवा मतदान कार्ड बनत नाही. त्यामुळे आधारकार्डच लहान मुलांचे ओळखपत्र असते.
  • शाळेत देखील आता प्रवेशासाठी आधार नंबर मागितला जातो. ज्या मुलांचे आधारकार्ड नसेल त्यांना शाळेतून देखील विशिष्ट कालावधित आधारकार्ड बनवण्यास सांगितले जाते.
  • शिष्यवृत्तीसारख्या अन्य योजनांसाठी देखील आधारकार्डची आवश्यकता असते.
  • लहान मुलांच्या नावे बॅंकेत बचत खाते उघडण्यासाठीही आधारकार्ड जरूरी असते.

पुढील लेख देखील वाचा!

  1. आधारकार्ड PDF फाईल मध्ये डाउनलोड करण्याची प्रोसेस ! Download Aadhaar Card in PDF File
  2. आधार PVC कार्ड ATM सारखं दिसणार आधार कार्ड ऑनलाईन ५० रुपयात बनवा, जाणून घ्या सविस्तर प्रोसेस (Aadhaar PVC card)
  3. आधार कार्ड वरील पत्ता अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
  4. मुलींच्या लग्नानंतर आधार कार्डवरील नाव बदलण्याची प्रोसेस !
  5. आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी आधार बायोमेट्रिक लॉक/अनलॉक कसे करायचे?
  6. तुमच्या आधारकार्डवर किती मोबाईल नंबर सक्रिय आहेत ते पहा !
  7. तुमचे आधार कार्ड कुठे वापरले जातेय ? असे तपासा !
  8. घरबसल्या आधारकार्डला नवीन मोबाईल नंबर अपडेट होणार

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.