नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत (POCRA) गावांमधील शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या योजनांचा लाभ मिळण्याकरिता मंजुरी देणेबाबत अधिसूचना जारी
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत (POCRA) गावांमधील शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या योजनांचा लाभ मिळण्याकरिता मंजुरी देणेबाबत अधिसूचना जारी केली आहे.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत (POCRA) गावांमधील शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या योजनांचा लाभ मिळण्याकरिता मंजुरी देणेबाबत अधिसूचना जारी:
प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (POCRA) यांनी प्रकल्पांतर्गत समाविष्ट घटकांची आणि कृषि/इतर विभागांच्या अन्य प्रचलित योजनांमधील समान घटकांची व्दिरूक्ती होऊ नये याकरिता प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये समाविष्ट घटकांसाठी पात्र लाभार्थ्यांना त्याच घटक/बाबीसाठी कृषि/इतर विभागांच्या प्रचलित योजनांमधून लाभ देण्यात येऊ नये असे २०१८ व २०२० च्या अधिसूचनेव्दारे सूचित केले होते.
प्रकल्प संचालकांनी २०२१ अधिसूचना पत्रान्वये POCRA प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये यांत्रिकीकरण घटक (औजारे बँक वगळून), पाईप व पंपसंच घटकांच्या लक्षांकापेक्षा अधिक अर्ज आले असल्यामुळे या घटकांकरिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ देणे बंद करण्यात आले असल्याचे कळविले आहे.
त्यामुळे सदर घटकांकरिता प्रकल्प क्षेत्रातील गावामधील वैयक्तिक लाभार्थ्यांना कृषि विभागाच्या प्रचलित योजनांतर्गत लाभ देण्यात यावा असे प्रकल्प संचालकांनी प्रस्तावित केले आहे.
त्यानुषंगाने, PoCRA प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावातील वैयक्तिक लाभार्थ्यांना कृषि विभागाच्या प्रचलित योजनांमधून महाडीबीटी प्रणालीव्दारे यांत्रिकीकरण (औजारे बँक वगळून), पाईप व पंपसंच या घटकांसाठी लाभ देण्यात यावा. लाभाची द्विरुक्ती टाळण्याकरिता प्रकल्प संचालकांनी प्रकल्पांतर्गत लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी क्षेत्रीय स्तरावर (तालुका कृषि अधिकारी स्तर) उपलब्ध करुन द्यावी.
महा-डीबीटी प्रणालीवरील छाननी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यापूर्वी POCRA योजनेतून लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना पुनःश्च त्याच बाबीसाठी लाभ मंजूर करु नये याची दक्षता घेण्याबाबत सूचित करावे.
हेही वाचा – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – POCRA Yojana
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!