नवीन बांधणी झालेल्या वाहनांची विक्रेत्यांमार्फत होणार नोंदणी !
केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार राष्ट्रीय सूचना केंद्र यांनी नवीन पूर्ण बांधणी झालेल्या (Fully Built) परिवहन संवर्गातील वाहनांची (vehicle registration) नोंदणी करण्यासाठी 4.0 संगणकीय प्रणाली विकसित केली आहे.
नवीन बांधणी झालेल्या वाहनांची विक्रेत्यांमार्फत होणार नोंदणी ! Vehicle Registration:
आता अशा पूर्णत: नवीन बांधणी झालेल्या टुरिस्ट टॅक्सी, सर्व तीन चाकी मालवाहू वाहने व 7,500 किलोग्रॅम पेक्षा कमी सकल भार क्षमता असलेली चारचाकी या परिवहन संवर्गातील वाहनांची नोंदणी अधिकृत वाहन वितरकांमार्फत होणार आहे.
या निर्णयाचे ऑटोमोबाईल असोसिएशनच्या वतीने स्वागत करण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारही व्यक्त करण्यात आले आहे. या वाहनांची (vehicle registration) नोंदणी आता विक्रेत्यांकडेच होणार असल्यामुळे वाहन धारकांना परिवहन कार्यालयाकडे वाहनांना आणायची गरज नाही. त्यामुळे वाहनधारकांचा त्रास वाचणार आहे. या निर्णयाचा लाभ जवळपास 7 ते 8 लाख वाहनधारकांना होणार आहे.
नोंदणीबाबतचे अधिकार विक्रेत्यांना देण्यात आले आहेत. टुरिस्ट टॅक्सीमध्ये मीटर्ड टॅक्सी वगळून नवीन बांधणी केलेल्या टॅक्सीचा समावेश असणार आहे. यापूर्वी वाहन वितरकांमार्फत नवीन दुचाकी व कार या परिवहनेत्तर संवर्गातील वाहनांची नोंदणी करण्यात येत आहे.
आता परिवहन संवर्गातील पूर्ण नवीन बांधणी असलेल्या वाहनांची सर्व वाहनांची (vehicle registration) नोंदणी 4.0 प्रणालीवर अधिकृत वाहन विक्रेत्यामार्फत करण्यात येणार आहे.
तरी सर्व वाहन वितरकांनी 4.0 संगणकीय प्रणालीवर परिवहन संवर्गातील नवीन पूर्ण बांधणी झालेल्या वाहनांची नोंदणी करावी, असे आवाहन परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी केले आहे.
पुढील लेख देखील वाचा!
- केंद्र सरकारच्या वाहन 4.0 (Vahan 4.0 Portal) पोर्टलवर RTO च्या विविध सेवांचा घरबसल्या ऑनलाईन लाभ घ्या!
- राज्यात RTO च्या सहा सेवा ऑनलाईन आणि फेसलेस; वाहन चालकांना फायदा होणार!
- लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढा फक्त आधार कार्डने, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस
- दुचाकी विक्री करताना दोन हेल्मेट द्या, नाही तर कारवाई !
- CSC ट्रान्सपोर्ट पोर्टल नवीन पोर्टल सुरु; आता CSC सेंटर मध्ये होणार RTO ची सर्व कामे !
- या वाहनांना वेग नियंत्रक उपकरण बसविणे बंधनकारक !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!