New Criminal Laws : देशात 3 नवीन फौजदारी कायदे १ जुलैपासून लागू !
भारतीय न्याय संहिता 2023”, “भारतीय साक्ष अधिनियम, 2023”, आणि “भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023” हे तीन नवीन फौजदारी कायदे (New Criminal Laws) 1 जुलै 2024 पासून देशभर लागू. पूर्वीचे कायदे रद्द करताना नागरिक केंद्रित आणि लोकशाहीच्या गरजा पूर्ण करणाऱ्या या नवीन तीन गुन्हेगारी कायद्यांना लागू करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 25 डिसेंबर 2023 रोजी मंजुरी दिली आहे. त्यामुळे “भारतीय न्याय संहिता 2023”, “भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023”, आणि “भारतीय साक्ष अधिनियम, 2023” हे कायदे भारतीय दंड संहिता (1860 चा 45), फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 (1974 चा 2) आणि भारतीय पुरावा कायदा, 1872 (1872 चा 1) या पूर्वीच्या फौजदारी कायद्यांची जागा घेतील.
देशात 3 नवीन फौजदारी कायदे १ जुलैपासून लागू ! New Criminal Laws :
केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यांत बदल करून, मंजूर केलेले तीन नवे कायदे आज, सोमवारपासून (१ जुलै) लागू होत आहेत. भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय साक्ष अधिनियम २०२३ अशी या नव्या फौजदारी कायद्यांची नावे आहेत. त्यातील ठळक तरतुदींचा घेतलेला आढावा.
विविध गुन्ह्यांची व्याख्या करून आणि त्यासाठीची शिक्षा निश्चित करून देशातील गुन्हेगारी न्याय व्यवस्था पूर्णपणे बदलणे हा या तीन कायद्यांचा मुख्य उद्देश आहे.
बदल करण्यात आलेल्या न्यायिक संहितेची नावे- New Criminal Laws:
- भारतीय दंड संहिता (IPC) आता भारतीय न्याय संहिता (BNS)
- फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS)
- भारतीय पुरावा कायदा (IEA) आता भारतीय साक्ष अधिनियम (BSA)
भारतीय न्याय संहिता 2023 – The Bharatiya Nyaya Sanhita, 2023:
- बाल या शब्दांची नेमकी व्याख्या समाविष्ट.
- लिंग या संकल्पनेत पारलिंगीचा समावेश.
- कागदपत्रे या संकल्पनेत इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल नोंदींचाही समावेश.
- महिला आणि बालकांविरोधातील गुन्ह्यांमध्ये नवे परिशिष्ट समाविष्ट.
- खोट्या बातम्या प्रसूत करणे याचा गुन्ह्यांमध्ये समावेश.
- आत्महत्येचा प्रयत्न हे कलम रद्द.
- एखाद्या मुलग्याचा लैंगिक छळ करणे ही संकल्पना नव्याने समाविष्ट.
- भीक मागण्यासाठी मुले पळवणे हा मानवी तस्करीचा एक भाग मानणार.
- पाच हजार रुपयांपेक्षा कमी मूल्याच्या चोरीच्या घटनांसाठी समाजसेवा ही शिक्षा.
- लग्नाच्या आमिषाने, बढतीच्या आमिषाने किंवा ओळख लपवून लैंगिक संबंध प्रस्थापित करणे गुन्हा ठरणार.
भारतीय न्याय संहिता 2023 मध्ये एकूण कलमे ३५६ त्यामध्ये खालील प्रमाणे नवीन सुधारणा/बदल केले आहेत.
- २० नवीन गुन्हे समाविष्ट .
- १९ जुने गुन्हे रद्द.
- ३३ गुन्ह्यांसाठीच्या शिक्षेच्या कालावधीत वाढ.
- ८३ गुण्यांसाठीच्या दंडाच्या रकमेत वाढ.
- २३ गुन्ह्यांसाठी किमान शिक्षेची नव्याने तरतूद.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ – The Bharatiya Nagarik Suraksha Sanhita,2023:
- महानगर आणि महानगर न्यायदंडाधिकारी हे प्रवर्ग रद्द.
- सहायक सत्र न्यायाधीश हे पद रद्द
- घोषित गुन्हेगार या संकल्पनेच्या व्याप्तीत वाढ (दहा वर्षे वा त्याहून अधिक शिक्षा झालेल्या सर्वांचा या संकल्पनेत समावेश).
- स्थानबद्धतेच्या पहिल्या ४० ते ६० दिवसांच्या काळात १५ दिवस पोलिस कोठडीची मुभा आणि या कारणाने जामीन नामंजूर करता येणार नाही.
- जिल्हापातळीवर विशिष्ट पोलिस अधिकारी असणार आणि प्रत्येक पोलिस ठाण्याला अटकेसाठी नोटीस द्यावी लागणार.
- तपासाचा आढावा ९० दिवसांत आरोपीला मिळण्याचा अधिकार.
- आरोपपत्र दाखल झाल्यानंतर तपासासाठी ९० दिवसांची मुदत.
- युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर ३० दिवसांत निकाल देणे बंधनकारक. काही विशिष्ट कारणांसाठी ही मुदत ६० दिवसांपर्यंत.
- परोक्ष सुनावणीची तरतूद समाविष्ट, निकाल लागेपर्यंत परोक्ष सुनावणी शक्य
- झिरो एफआयआर देशभरात लागू.
- इलेक्ट्रॉनिक एफआयआर नोंदवण्याची तरतूद.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ एकूण कलमे : ५३१ त्यामध्ये खालील प्रमाणे नवीन सुधारणा/बदल केले आहेत.
- ९ नवीन कलमे समाविष्ट.
- ३९ उपकलमे समाविष्ट.
- ३६ ठिकाणी जलद न्यायदानासाठी प्रक्रिया निश्चित.
- १४ तरतूदी वगळल्या.
- ११७ तरतुदींमध्ये सुधारणा.
भारतीय साक्ष अधिनियम, २०२३ – The Bharatiya Sakshya Adhiniyam, 2023:
- कागदपत्रांच्या व्याख्येत इलेक्ट्रॉनिक नोंदींचाही समावेश.
- पुराव्यांच्या व्याख्येत इलेक्ट्रॉनिक जबाबही समाविष्ट.
- इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल दस्तावेजांचे योग्य सादरीकरण, जतन, वैधता आदींबाबत तरतूद.
- पती वा पत्नीविरोधातील खटल्यात वैवाहिक जोडीदाराला सक्षम साक्षीदार मानले जाणार.
- गुन्ह्यातील साथीदाराच्या साक्षीच्या आधारे दोषसिद्धी वैध मानली जाणार.
भारतीय साक्ष अधिनियम, २०२३ एकूण कलमे : १७० त्यामध्ये खालील प्रमाणे नवीन सुधारणा/बदल केले आहेत.
- २ नवीन कलमे समाविष्ट.
- ६ नवीन उपकलमे समाविष्ट.
- २४ तरतुदींमध्ये सुधारणा.
- ६ कलमे रद्द.
गुन्ह्यांबाबत महत्त्वाची जुनी व नवी कलमे:
गुन्हा | जुने कलम | नवीन कलम |
हत्या | ३०२ | १०३ (१) |
हत्येचा प्रयत्न | ३०७ | १०९ |
गंभीर दुखापत | ३२६ | ११८ (२) |
मारहाण | ३२३ | ११५ |
धमकी | ५०६ | ३५१ (२) |
विनयभंग | ३५४ | ७४ |
बलात्कार | ३७६ (१) | ६४ (१) |
विवाहितेचा छळ | ४९८ (अ) | ८५ |
अपहरण | ३६३ | १३७(२) |
चोरी | ३८० | ३०५ (ए) |
दरोडा | ३९५ | ३१० (२) |
फसवणूक | ४२० | ३१८ (४) |
सरकारी कामात अडथळा | ३५३ | १३२ |
हे तीन नवे कायदे (New Criminal Laws) लागू झाल्याने अनेक नियम आणि कायदे बदलतील. यामध्ये अनेक नव्या विभागांचा समावेश करण्यात आला आहे. काही विभाग बदलण्यात आले आहेत, तर काही काढून टाकण्यात आले आहेत. नवे कायदे (New Criminal Laws) लागू झाल्यानंतर सामान्य माणूस, पोलीस, वकील आणि न्यायालय यांच्या कार्यपद्धतीत खूप बदल होणार आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.
हेही वाचा – Labor Law : कामगार कायदे विषयी सविस्तर माहिती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!