नमो शेतकरी महासन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (kisan samman nidhi yojana) योजने प्रमाणे राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करून त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला केंद्राचे सहा हजार (NSMNY Beneficiary Status) आणि महाराष्ट्र सरकारचे सहा हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये जमा होतील.
प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील निधी (NSMNY Beneficiary Status) वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नेमका काय?
- नमो शेतकरी महा सन्मान निधी ही केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान (pm samman nidhi) योजनेसारखीच योजना आहे.
- या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र सरकार वर्षाला सहा हजार रुपये जमा करेल.
- केंद्र सरकारकडून दर तीन महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.
- याप्रमाणेच आता राज्य सरकारही दर तीन महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करेल.
- यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला केंद्राचे सहा हजार आणि महाराष्ट्र सरकारचे सहा हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये जमा होतील.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना – NSMNY Beneficiary Status:
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा २००० चा हप्ता बँकेमध्ये जमा झाला की नाही ते चेक करण्यासाठी NSMNY Beneficiary Status च्या खालील लिंकवर क्लिक करून ओपन करा.
https://nsmny.mahait.org/Beneficiary_Status/Beneficiary
त्यानंतर तिथं तुम्हाला मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकून कॅप्चा कोड टाकायचा आहे. त्यानंतर Get Data या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर २००० च्या हप्त्या विषयीची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळते.
” नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” या योजने अंतर्गत केंद्र शासनाच्या PM- KISAN योजनेनुसार खालील वेळापत्रकाप्रमाणे लाभ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरणाद्वारे आयुक्त (कृषी) यांच्या मार्फत वितरीत करण्यात येईल.
अ. क्र. | हप्ता क्रमांक | कालावधी | रक्कम |
1 | पहिला हप्ता | माहे एप्रिल ते जुलै | रु. 2000/- |
2 | दुसरा हप्ता | माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर | रु. 2000/- |
3 | तिसरा हप्ता | माहे डिसेंबर ते मार्च | रु. 2000/- |
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी लाभार्थी पात्रता:
दिनांक 01.02.2019 रोजी शेतजमीन धारण करणारे शेतकरी कुटुंबे (पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांचा समावेश असलेले) पीएम किसान (pm kisan samman nidhi yojana) आणि NSMNY या दोन्ही योजनेसाठी पात्र आहेत.
फायदे:
1) पीएम किसान (PMKISAN Yojana) नुसार पात्र शेतकरी कुटुंबांना रुपये 2000/- प्रति हप्ता चा फायदा होईल.
2) पीएम किसान सम्मान निधि (PM KISAN Yojana) मध्ये लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना NSMNY चा लाभ मिळेल.
3) NSMNY लाभार्थ्यांना GoI द्वारे प्रदान केलेल्या यादीचा लाभ होईल.
4) NSMNY चा पहिला हप्ता PMKISAN च्या हप्त्याच्या यादीनुसार दिला जातो.
5) पात्र शेतकरी कुटुंबाला PMKISAN आणि NSMNY कडून रु. 2000/- दिले जाते.
6) पात्र शेतकऱ्यांना PM KISAN आणि NSMNY या दोन्ही योजनांमधून एका वर्षात रु. 12,000/- लाभ मिळतो.
7) DBT च्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणार फायदा.
8) NSMNY चा लाभ फक्त आधार लिंक केलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केला जाईल.
9) NSMNY मधील अपात्रांना जमा केलेला लाभ PMKISAN च्या SOP नुसार वसूल केला जाईल.
पुढील लेख देखील वाचा!
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
- PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस घरबसल्या कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती!
- प्रधानमंत्री किसान योजने संदर्भात तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- PMKisan अंतर्गत लाभार्थ्यांच्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा!
- पीएम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रोसेस !
- बँक खाते आधार नंबरला ऑनलाईन/ऑफलाईन लिंक करण्याची सविस्तर प्रोसेस !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!