राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्यास मंजुरी !
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान National Mission On Natural Farming (Naisargik Sheti – NMNF) या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाने जारी केल्या आहेत.
निसर्गावर आधारित शाश्वत शेतीच्या प्रणालींना चालना देणे, शेतावर निविष्ठा निर्मिती करून बाहेरुन निविष्ठांवरील खरेदीचे अवलंबित्व कमी करणे, निविष्ठा खरेदीवरील खर्च कमी करुन उत्पादन खर्च कमी करणे, मातीचे आरोग्य सुधारणे, पशुधन लोकप्रिय करण्यासाठी (शक्यतो स्थानिक गायीची जात) एकात्मिक कृषी-पशुपालन मॉडेल तयार करणे, कृषी पर्यावरणीय संशोधन आणि ज्ञान आधारित विस्तार क्षमता मजबूत करणे इत्यादी योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत.
ही केंद्र पुरस्कृत योजना असून यामध्ये केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा अनुक्रमे ६०:४० या प्रमाणात राहणार आहे. सदर योजनेचा कालावधी दोन वर्षाचा आहे. ही योजना राज्यात मिशन मोड तत्वावर राबवावयाची आहे.
दिनांक २७.०६.२०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन योजनेची व्याप्ती संपूर्ण राज्यामध्ये वाढविण्यात आली आहे. प्रस्तावित राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (National Mission on Natural Farming- Naisargik Sheti – NMNF) या योजनेकरिता शासन निर्णयान्वये केंद्र व राज्य हिश्शासाठी करावयाच्या तरतुदीस मंत्रिमंडळाने दिनांक ३०.५.२०२३ रोजीच्या बैठकीत मान्यता दिली आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व दिनांक २७.०६.२०२३ रोजीच्या शासन निर्णयाच्यानुषंगाने राज्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता अंमलबजावणी यंत्रणा निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान – Naisargik Sheti (NMNF):
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान National Mission On Natural Farming (Naisargik Sheti – NMNF) ची राज्यात अंमलबजावणी करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे राज्यस्तरीय कार्यकारी समिती (SLEC), राज्यस्तरीय नैसर्गिक शेती कक्ष, जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती, तालुकास्तरीय सनियंत्रण समिती स्थापन करण्यात येत आहे.
राज्यस्तरीय कार्यकारी समिती (SLEC) ची कार्ये :-
१. अंमलबजावणी धोरण तयार करणे.
२. राज्य नैसर्गिक शेती (Naisargik Sheti – NMNF) कक्षाने तयार केलेल्या वार्षिक कृती आराखड्याला मान्यता देणे.
राज्य नैसर्गिक शेती कक्षाची कार्ये:-
१. जिल्हानिहाय कृती आराखडा संकलीत करून राज्यस्तरीय वार्षिक कृती आराखडा तयार करणे
२. वार्षिक कृती आराखडा राज्यस्तरीय कार्यकारी समितीकडे (SLEC) मंजुरीसाठी सादर करणे.
३. मंजुरीनंतर तो राष्ट्रीय कार्यकारी समिती (NEC) कडे पाठविणे.
४. अंमलबजावणीसाठी कृषी व शेतकरी कल्याण विभागाकडून निधी प्राप्त करून घेणे.
५. मंजूर वार्षिक कृती आराखड्यानुसार निधी वितरित करुन आराखड्यानुसार अंमलबजावणीवर देखरेख करणे.
६. राज्य/ जिल्हा स्तरावर सर्व उत्सुक गट / भागधारकांसाठी कार्यशाळा, चर्चासत्रे, क्षमता निर्माण आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
७. योजनेच्या अंमलबजावणीच मूल्यांकन व प्रभावी मुल्यमापन करणे.
८. राज्य सरकार आणि योजना राबविण्यासाठी नियुक्त अंमलबजावणी संस्था, यांनी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पंचायत राज संस्था (PRIs) आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान (MSRLM) यांना सक्रियपणे सहभागी करुन घेणे.
९. योजनेचे संनियंत्रण करणे.
१०. राज्यस्तरीय कार्यकारी समिती/नोडल विभागाद्वारे निर्देशित केलेले इतर कोणतेही कार्य.
जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे कार्ये :-
१) जिल्हास्तरावर राष्ट्रीय नैसर्गिक (Naisargik Sheti – NMNF) शेती अभियानाचे सनियंत्रण करणे.
(२) राज्यस्तरीय नैसर्गिक शेती (Naisargik Sheti – NMNF) कक्षास नैसर्गिक शेतीच्या अनुषंगाने माहिती उपलब्ध करुन देणे.
तालुकास्तरीय सनियंत्रण समितीचे कार्य :-
(१) जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीस नैसर्गिक (Naisargik Sheti – NMNF) शेतीच्या अनुषंगाने माहिती उपलब्ध करुन देणे.
(२) आत्मा, एमएसआरएलएम, केव्हीके, नॉन-गर्व्हनमेंट ऑर्गनायझेशन (एनजीओ) यांच्या मदतीने शेतकऱ्यांना नैसर्गिक (Naisargik Sheti – NMNF) शेतीसाठी प्रवृत्त करणे.
३. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान National Mission On Natural Farming (Naisargik Sheti – NMNF) ही योजना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून राज्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित करुन राबविण्यास आयुक्त कृषी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
या लेखात, आम्ही राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (Naisargik Sheti – NMNF) ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा निर्माण करण्याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय:
राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (NMNF) ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा निर्माण करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
पुढील लेख देखील वाचा!
- नैसर्गिक शेतीसाठी केंद्र शासनाची नवीन योजना !
- केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना भेट ! शेतकऱ्यांना या 7 योजनांसाठी 14,235 कोटींच्या खर्चास मंजुरी !
- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना; आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज!
- नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाई अनुदानाची स्थिती ऑनलाईन चेक करा !
- अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी eKYC करणे अनिवार्य; अन्यथा नुकसान भरपाई मिळणार नाही !
- नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाई अनुदानाची स्थिती ऑनलाईन चेक करा !
- अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमधील बाधित नागरिकांना विशेष दराने मदत !
- नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाईसाठी आधार प्रमाणीकरण ऑनलाईन प्रोसेस !
- नैसर्गिक संकटात शेतीचं नुकसान झालंय? मग पीक विम्याचा दावा करताना या गोष्टी लक्षात ठेवल्यास नुकसान भरपाई मिळू शकते !
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना : शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये मदत मिळवण्यासाठी या गोष्टी करा !
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना
- वन्यप्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरीता नुकसान भरपाई मंजुरीसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
- शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना – MahaDBT Portal Scheme
- फळबाग लागवड योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!