Mukhyamantri Teerth Darshan Yojana : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत सुधारणा !
राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना – Mukhyamantri Teerth Darshan Yojana” सुरु करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास दि. ११ जुलै, २०२४ रोजीच्या मा. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्यास दि. १४ जुलै, २०२४ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांनी दि. ३१ जुलै, २०२४ व दि. ०५ ऑगस्ट, २०२४ च्या पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून दि. १४ जुलै, २०२४ च्या शासन निर्णयामधील नमूद काही निकषामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” या योजनेच्या दि. १४ जुलै, २०२४ रोजीच्या शासन निर्णयामध्ये अंशतः सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
“मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” योजनेत सुधारणा – Mukhyamantri Teerth Darshan Yojana:
“मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” या योजनेच्या दि. १४ जुलै, २०२४ रोजीच्या शासन निर्णयामध्ये पुढीलप्रमाणे अंशतः सुधारणा करण्यात येत आहेत.
अ. क्र. | शासन निर्णय दि. १४.०७.२०२४ मधील नमूद निकष | सुधारीत निकष |
१ | ७. सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत :- अ. क्र. (१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज. अ.क्र. (४) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य) किंवा पिवळे / केशरी रेशनकार्ड | ७. सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत :- अ. क्र. (१) योजनेच्या लाभासाठी दि. ३१ ऑक्टोबर, २०२४ पूर्वी ऑफलाईन व तद्नंतर ऑनलाईन अर्ज अ.क्र. (४) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य) किंवा अंत्योदय अन्न योजना (AAY)/ प्राधान्य कुटुंब योजना (PHH) / वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखाच्या आत असलेले मात्र प्राधान्य कुटुंब नसलेले (NPH) शिधापत्रिकाधारक. |
२ | ८. रेल्वे प्रवास तसेच बस प्रवासासाठी एजन्सी तथा टूरिस्ट कंपन्यांची निवड -: सदर योजनेंतर्गत रेल्वे तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टूरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी IRCTC समकक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विहित निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात येईल. | ८. प्रवासासाठी एजन्सी तथा टूरिस्ट कंपन्यांची निवड -: सदर योजनेंतर्गत विविध दळणवळणाच्या साधनांद्वारे प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टूरिस्ट कंपन्या तसेच IRCTC किंवा समकक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विहित नियमांचे निविदा प्रक्रियेचे पालन करुन करण्यात येईल. |
३ | ९. लाभार्थ्यांची निवड :- अ.क्र. १. प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल, ज्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे (लॉट्सचे संगणकीकृत ड्रॉ) प्रवाशांची निवड केली जाईल. कोट्यातील १०० टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतिक्षा यादी देखील तयार केली जाईल. अ.क्र. ३. निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर (दि. ३१ ऑक्टोबर, २०२४ नंतर) जिल्हाधिकारी कार्यालय आणि समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमांद्वारे प्रसारित केली जाईल. अ.क्र. ५. जर पती-पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल, तर जिल्हास्तरीय समिती त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील. | ९. लाभार्थ्यांची निवड :- अ.क्र.१. प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल, ज्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धतेवर आधारित पारदर्शक पध्दतीने लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड केली जाईल. कोट्यातील १०० टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतिक्षा यादी देखील तयार केली जाईल. मात्र दि. ३१ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याकरीता कमाल १००० (एक हजार) पात्र लाभार्थ्यांचा कोटा निश्चित करण्यात येत असून सदर कोट्याच्या कमाल मर्यादेत तसेच प्रति लाभार्थी रु. ३०,०००/- (रुपये तीस हजार) च्या कमाल मर्यादेत शासनाने दि. १४.०७.२०२४ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या तीर्थक्षेत्रांमधून तीर्थदर्शन यात्रा (दूर पॅकेज) निश्चित करण्याचे अधिकार जिल्हास्तरीय समितीस असतील. अ.क्र. ३. निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमांद्वारे प्रसारित केली जाईल. अ.क्र. ५. जर पती-पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल, तर आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, पुणे त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील. |
४ | १५. अर्ज करण्याची प्रक्रिया :- योजनेचे अर्ज पोर्टल / मोबाईल अॅपद्वारे / सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे:- अ.क्र. १) पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. अ.क्र. २) ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल. | १५. अर्ज करण्याची प्रक्रिया :- योजनेचे अर्ज दि. ३१ ऑक्टोबर, २०२४ पूर्वी ऑफलाईन पध्दतीने व तद्नंतर योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे:- अ. क्र. १) पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी दि. ३१ ऑक्टोबर, २०२४ पूर्वी ऑफलाईन पध्दतीने आणि तद्नंतर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल. अ.क्र. २) दि. ३१ ऑक्टोबर, २०२४ पूर्वी ज्यांना ऑफलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयात उपलब्ध असेल. |
५ | १६. तात्पुरत्या यादीचे प्रकाशन :- अर्ज प्राप्त झाल्यानंतर, पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल/अॅपवर जाहीर केली जाईल. | १६. तात्पुरत्या यादीचे प्रकाशन :- ऑफलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आणि समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर जाहीर केली जाईल. आणि ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर, पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल/अॅपवर जाहीर केली जाईल. |
६ | १७. मूळ अर्जदारासह जीवनसाथी सहाय्यकाच्या प्रवासासंबंधीच्या तरतुदी :- अ.क्र. २. ७५ वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असले तरीही प्रवासी सहाय्यक अर्जदारासोबत प्रवास करू शकेल. अ.क्र. ५. सहाय्यकाचे किमान वय २१ वर्षे ते कमाल ५० वर्षे असावे. एखादा मदतनीस प्रवासात घेतल्यास, त्याला देखील त्याच प्रकारच्या सुविधा मिळतील ज्या प्रवाशाला परवानगी आहे. सहाय्यक शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असावा. | १७. मूळ अर्जदारासह जीवनसाथी/सहाय्यकाच्या प्रवासासंबंधीच्या तरतुदी :- अ.क्र.२. ७५ वर्षावरील अर्जदाराच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असले तरीही जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एक अर्जदारासोबत प्रवास करू शकेल. अ.क्र. ५. सहायकाचे किमान वय २१ वर्षे ते कमाल ५० वर्षे असावे. एखादा सहायक प्रवासात घेतल्यास, त्याला देखील त्याच प्रकारच्या सुविधा मिळतील ज्या प्रवाशाला परवानगी आहे. सहाय्यकाने शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल. |
७ | २१. वेबसाईट तयार करणे:- सदर योजनेची नवीन वेबसाईट बनवण्याचे काम महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून करुन घेण्यात येईल. | २१. वेबसाईट / पोर्टल तयार करणे:- सदर योजनेची नवीन वेबसाईट/पोर्टल बनवण्याचे काम महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून किंवा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या अधिनस्त महामंडळाकडून तयार करुन घेण्यात येईल. सदर वेबसाईट/पोर्टलद्वारे संकलित डाटा शासनाच्या मालकीचा राहील. |
सदर योजनेसाठी आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
प्रस्तुत योजनेसाठी आयुक्त, समाजकल्याण, पुणे हे नोडल अधिकारी असल्याने सदर योजनेंतर्गत विविध दळणवळणाच्या साधनांद्वारे प्रवासाचे आयोजन करण्यासाठी निवड करण्यात आलेल्या एजन्सी तथा टुरिस्ट कंपन्यासोबत शासन मान्यतेने सामंजस्य करार करण्यासाठी आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय – Mukhyamantri Teerth Darshan Yojana GR:
- महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील ६० वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) राबविण्यास मान्यता देणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) या योजनेतील सुधारणांबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – CM Vayoshree Yojana : मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ : ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!