सरकारी योजनावृत्त विशेष

महिला सन्मान योजना : महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट भाड्यात ५०% सवलत आज १७ मार्च पासून अमंलबजावणी सुरू !

महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिनांक १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर ” महिला सन्मान योजना ” म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणारं आहे.

महिला सन्मान योजना : महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट भाड्यात ५०% सवलत आज १७ मार्च पासून अमंलबजावणी सुरू (MSRTC – ST Mahila Samman Yojana)!

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ टक्के पासून १०० टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते.  यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त राज्य शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून ” मोफत ” प्रवासाची सवलत जाहीर केली होती.

तसेच ६५ ते ७५ वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. सदर सवलतीची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला प्राप्त होत आहे.

  • सर्व महिलांना रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या (साधी, मिडी / मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत शयन आसनी, शिवशाही (आसनी), शिवनेरी, शिवाई (साधी व वातानुकुलीत) इतर इत्यादी ] बसेसमध्ये ५० % सवलत दि. १७/०३/२०२३ पासुन अनुज्ञेय करण्यात येत आहे. २ सदरची सवलत ही भविष्यात रा.प. महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणा-या सर्व प्रकारच्या बसेस करिता देखील लागू राहील.
  • सदरची सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दी पर्यंत अनुज्ञेय आहे.
  • सदर सवलत शहरी वाहतूकीस अनुज्ञेय नाही.
  • ज्या महिलांनी रा.प. महामंडळाच्या बसेसचे प्रवासाचे आगाऊ आरक्षण तिकीट (Advance Booking) घेतलेले आहे. अश्या महिलांना ५०% सवलतीचा परतावा देण्यात येऊ नये.
  • सवलत अनुज्ञेय केलेल्या दिनांक पुर्वीच्या आगाऊ आरक्षणावर केलेल्या प्रवासाचा परतावा देण्यात येऊ नये.
  • सर्व महिलांना प्रवास भाड्यात ५०% सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवाशी संगणकीय आरक्षण सुविधेव्दारे विंडो बुकींगव्दारे, ऑनलाईन, मोबाईल अॅपव्दारे, संगणकीय आरक्षणाव्दारे तिकीट घेतील अशा प्रवाशांकडुन सेवा प्रकार निहाय लागु असलेला आरक्षण आकार वसुल करण्यात यावा.
  • सर्व महिलांना प्रवास भाड्यात शासनाने ५०% सवलत दिली असल्याने ५०% प्रवास भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे प्रवास भाड्यातील अ.स. निधी व वातानुकुलित सेवांकरीता वस्तु व सेवाकरची रक्कम आकारण्यात यावी.
  • मॅन्युअल पद्धतीने तिकीट देण्याची कार्यवाही – महिलांना दिलेल्या ५०% सवलतीच्या मुल्याची परिगणित करणेसाठी स्वतंत्र तिकीट छपाई करावी लागेल. सदरची सवलत ही ५०% असल्यामुळे त्या तिकीटांचे वसूली मूल्य ५० % राहिल. प्रवास केलेल्या महिलांची एकूण संख्या समजावी याकरिता प्रत्येक महिलेस हे मुळ तिकीट वाहकाने दिलेच पाहिजे. (तिकीट रंगसंगती स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.) सर्व महिलांना प्रवास भाडयात ५० % सवलत दयावयाची असली तरी त्याची प्रतिपूर्ती शासनाकडे मागणीसाठी त्यांना इंटी आय ओआरएस कार्यप्रणाली बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून छापील तिकीटे देणे आवश्यक आहे. त्यासाठी रु.५/- रु.१०/- मुल्यवर्गाची मूळ तिकीटे व रु. १०/-, रु. २०/- रु. ३०/-, रु.४०/- रु. ५०/- व रु. १००/- मुल्यवर्गाची जोड तिकीटे देण्यात यावीत.
  • सदरची सवलत इटीआय मशीन मध्ये ७७ क्रमांकावर प्राप्त होईल.
  • ७५ वर्षावरील महिलांसाठी ‘अमृत जेष्ठ नागरिक’ योजनेच्या परिपत्रकीय सुचनेनुसार १००% सवलत अनुज्ञेय राहिल.
  • ६५ ते ७५ या वयोगटातील महिलांना ‘महिला सन्मान योजना’ हीच सवलत अनुज्ञेय राहिल.
  • ५ ते १२ या वयोगटातील मुलींना यापूर्वी प्रमाणेच ५०% सवलत अनुज्ञेय राहिल.

सदर सवलतीपोटी येणारी रक्कम मोठया प्रमाणात असल्यामुळे त्याचा कोणत्याही स्तरावर गैरवापर होऊ नये म्हणून आणि महामंडळास शासनाकडुन मिळणारी प्रतिपुर्ती अचुक मिळावी या करीता आगार लेखाकार यांनी त्याचे लेखापरीक्षण करावयाचे आहे. महिला सवलतीच्या संदर्भात हिशोब तपासणी, लेखा परीक्षणाची पद्धती याबाबतच्या सुचना स्वतंत्र परिपत्रकाव्दारे लेखा शाखेव्दारे निर्गमित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अधिकृत सूचना (MSRTC – ST Notification): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अधिकृत सूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.



शासन निर्णय: महिला सन्मान योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील रा.प.महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50% प्रवास सवलत अनुज्ञेय करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – IRCTC ची ऑनलाईन बस तिकीट बुकिंग सेवा सुरू; अशी करा ऑनलाईन IRCTCची बस तिकीट बुक – IRCTC Bus Ticket Booking Online

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.