वृत्त विशेषउद्योगनीतीसरकारी योजनासुक्ष्म लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

एमएसएमई चॅम्पियन्स योजनेअंतर्गत स्पर्धात्मक (लीन) योजना

एमएसएमई स्पर्धात्मक योजनेची (MSME LEAN Scheme) एलईएन (लीन) मध्ये राष्ट्रीय चळवळ बनण्याची क्षमता आहे. तसेच या अभियानाद्वारे भारतातील एमएसएमई उद्योगांना रष्ट्रीय स्पर्धात्मकतेचा आराखडा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. लीनमुळे, या उद्योगातील उत्पादनांचा दर्जा, उत्पादकता आणि कामगिरी यात तर सुधारणा होईलच; शिवाय उत्पादकांची मानसिकता बदलण्याची आणि त्यांना जागतिक दर्जाचे उत्पादक बनवण्याची क्षमता देखील यात आहे.

एमएसएमई चॅम्पियन्स योजनेअंतर्गत स्पर्धात्मक (लीन) योजना – MSME Competitive LEAN Scheme:

ही (MSME LEAN Scheme) योजना, एमएसएमई क्षेत्रात लीन उत्पादक पद्धतींबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देत लीन श्रेणी    गाठण्यासाठी प्रेरित आणि प्रोत्साहन देण्यासाठीची एक व्यापक मोहीम आहे.

या योजनेंतर्गत, एमएसएमई, 5S, कैजर, कांबन, व्हिज्युअल वर्कप्लेस, पोका वोका अशी लीन उत्पादक साधने, प्रशिक्षित आणि सक्षम लीन सल्लागारांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली मूलभूत, मध्यम आणि उच्च यासारख्या लीनमधल्या श्रेणीपर्यंत पोहोचतील. लीनच्या मदतीमुळे, एमएसएमई उद्योगातील नासाडी कमी होऊ शकेल, उत्पादकता, गुणवत्ता आणि सुरक्षितता वाढेल आणि हे उद्योग स्पर्धात्मक होऊन फायद्यात चालू शकतील.

एमएसएमई क्षेत्राला आधार देण्यासाठी, या लीनच्या अंमलबजावणी तसेच सल्ला यातील 90 टक्के खर्च सरकार वहन करेल. तसेच जे एमएसएमई उद्योग स्फूर्ती (SFURTI) समूहाचा भाग असतील म्हणजे, महिला, अनुसूचित जाती/जमाती आणि ईशान्य भारतात सुरु असलेले उद्योग असतील, अशा उद्योगांसाठी सरकार आणखी 5 टक्के योगदान देईल. या सगळ्या सोबत, उद्योग संघटना समग्र उपकरण उत्पादन संस्था (OEM) यांच्याद्वारे नोंदणी करण्याऱ्या उद्योगांना, सर्व श्रेणी पूर्ण केल्यानंतर आणखी 5 टक्के मदत सरकारकडून मिळेल. उद्योग संघटना आणि ओईएम यांना पुरवठा साखळी विक्रेत्यांना या योजनेत सहभागी होण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने, हे एक विशेष वैशिष्ट्य ठरले आहे.

एमएसएमई युनिट्ससाठी आर्थिक सहाय्य:

  • एमएसएमईसाठी सल्लागार शुल्काच्या अंमलबजावणी खर्चावर 90% सबसिडी.
  • सर्व स्तर पूर्ण झाल्यानंतर इंडस्ट्री असोसिएशन/ओईएम द्वारे नोंदणी करणार्‍या एमएसएमईला अतिरिक्त 5% गोल योगदान दिले जाईल.
  • लीन हस्तक्षेपाचे सर्व टप्पे पूर्ण केल्यानंतर 5000/ प्रति एमएसएमई oem/ असोसिएशनला दिले जातील.

पात्रता:

  • UDYAM नोंदणी पोर्टलवर (MoMSME च्या) नोंदणीकृत सर्व MSMEs MSME स्पर्धात्मक (लीन) (MSME LEAN Scheme) योजनेत सहभागी होण्यासाठी आणि संबंधित फायदे/ प्रोत्साहनांचा लाभ घेण्यास पात्र असतील.
  • SFURTI (पारंपारिक उद्योगांच्या पुनरुत्पादनासाठी निधीची योजना) आणि सूक्ष्म आणि लघु उद्योग – क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम (MSE-CDP) योजना अंतर्गत सामान्य सुविधा केंद्रे (CFCs) साठी ही योजना खुली आहे.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

खालील लेख देखील वाचा!

  1. नवीन उद्योजकांसाठी मोफत एमएसएमईच्या उद्यम नोंदणी (Udyam Registration) ऑनलाईन कशी करायची? जाणून घ्या सविस्तर.

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.