महिलांना उद्योजिका बनविण्यासाठी पर्यटनसंचालनालयाचे “आई पर्यटन धोरण”
पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या दृष्टीकोनातून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आई’ महिला केंद्रीत (Mother Tourism Policy) पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे.
आई पर्यटन (Mother Tourism Policy) धोरण पर्यटन संचालनालयाद्वारे राबविण्यात येणार आहे. आई पर्यटन (Mother Tourism Policy) धोरणामध्ये महिलांसाठी पर्यटन विकास धोरणाची पंचसूत्री जाहीर केली असून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सवलती दिल्या जाणार आहेत.
आई पर्यटन धोरण – Mother Tourism Policy:
पर्यटन संचालनालयामार्फत प्रोत्साहन व सवलती देण्यात येत आहेत. यानुसार पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकाचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यातील पर्यटन संचालनालयकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेल्या १० पर्यटन व्यवसायांना (होमस्टे, हॉटेल, रेस्टोरेंट, टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल कॅराव्हॅन, बिच शॅक, साहसी पर्यटन (जमिन, हवा, जल) पर्यटक सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, होम स्टे, बी अॅण्ड बी, रिसार्ट, मोटेल, हाऊस बोट, टेंट, ट्री हाऊस, व्होकेशल हाऊस, पर्यटन व्हिला, एजन्सी इत्यादी.
पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी मान्यता प्राप्त बँकामार्फत घेतलेल्या रु. १५ लाख पर्यंतच्या कर्जाच्या रकमेवरील व्याजाची रक्कम १२ टक्के मर्यादेत त्याच्या आधार लिंक बँक खात्यात पूर्ण कर्ज परतफेड होई पर्यत किंवा ७ वर्ष कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम रु.४.५ लक्षच्या मर्यादेपर्यंत, या तीन पर्यायापैकी जे प्रथम घडले तो पर्यंत, दरमहा अटींच्या अधिन राहुन जमा करण्यात येईल.
या अटीनुसार पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असला पाहिजे, पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेल्या असला पाहिजे, महिलांच्या मालकीच्या हॉटेल किंवा रेस्टॉरंट्समध्ये ५० टक्के व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील. महिलांच्या मालकीच्या टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल एजन्सी मध्ये ५० टक्के कर्मचारी महिला असणे आवश्क राहील. पर्यटन व्यवसायाकरीता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात. कर्जाचे हप्ते वेळेत भरले पाहिजे.
सर्व पर्यटन महिला उद्योजकांनी हॉटेल रिसॉर्ट, होम स्टे, कृषी पर्यटन केंद्र, साहसी पर्यटन केंद्र, उपहारगृह, टुर गाईड, टुर ऑपरेटर अशा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या किंवा नवीन व्यवसाय करुन येणाऱ्या महिला उद्योजकांनी व्याजाचा परतावा घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज करण्याचे आवाहन उपसंचालक प्रशांत सवाई यांनी केले आहे.
महिला पर्यटकांच्या विविध गटांसाठी टूर पॅकेजेस
- महिला ज्येष्ठ नागरिकांसाठी सहल.
- दिव्यांग महिलांसाठी सहल
- महिला पर्यटकांसाठी एक दिवसीय सहल
- तरुण महिलांसाठी साहसी सहली
- एकट्या महिला पर्यटकांसाठी स्थानिक स्थळदर्शन सहल
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!