महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : 50 हजार प्रोत्साहनपर लाभासाठी कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण करा !
सहकार विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण (MJPSKY KYC) झालेल्या 14 लाख 38 हजार खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरीत करण्यात आला आहे.
ज्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही, त्यांना आधार प्रमाणीकरण (MJPSKY Protsahanpar Anudan KYC) झाल्यानंतर प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल, २०२४ रोजीच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये जाहीर केले. या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या 33 हजार 356 कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण (MJPSKY Protsahanpar Anudan KYC) झाले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही.
अशा पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण (MJPSKY KYC) करुन घ्यावे, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे. संबंधित बॅंकांनीही खातेदारांना याबाबत कळवावे, असे निर्देशही सहकार विभागाने दिले आहेत.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – MJPSKY:
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या) परंतू आधार प्रमाणीकरण न झालेल्या ३३३५६ शेतकऱ्यांसाठी महा-आयटी यांनी दिनांक १२.०८.२०२४ ते ०७.०९.२०२४ पर्यत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सदर कालावधीत संबंधीत शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे, त्याबाबतचा लघु संदेश शेतकऱ्यांना महा-आयटी मार्फत देण्यात आला आहे.
पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सहकार विभागाच्या दिनांक 29 जुलै 2022 रोजीच्या शासननिर्णयाद्वारे अंमलात आली.
सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कमाल रुपये 50 हजार पर्यंतच्या रकमेचा प्रोत्साहनपर लाभ यामध्ये देण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी महा-आयटी मार्फत विकसित संगणकीय प्रणालीद्वारा करण्यात येत असून पात्र अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर थेट वर्ग करण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील विविध बॅंकांनी एकूण 29 लाख 2 हजार कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर सादर केली. त्यापैकी, 4 लाख 90 हजार कर्जखाती आयकर दाते, पगारदार व्यक्ती आदी कारणांमुळे अपात्र ठरली, तर साधारणत: 8 लाख 49 हजार कर्जखाती पीक कर्जाची तीन आर्थिक वर्षापैकी केवळ एकाच आर्थिक वर्षात परतफेड केल्यामुळे अपात्र ठरली आहेत.
पात्र ठरलेल्या 15 लाख 44 हजार कर्जखात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यापैकी 15 लाख 16 हजार कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण (MJPSKY KYC) करण्यात आले.
प्रमाणीकरण झालेल्या कर्जखात्यापैकी 14 लाख 40 हजार कर्जखात्यांसाठी 5,222 कोटी 5 लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली. त्यापैकी 14 लाख 38 हजार खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपये रकमेचे वितरणही करण्यात आल्याचे सहकार विभागाने कळविले आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण – MJPSKY Protsahanpar Anudan KYC :
शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, कर्जखाते पासबुक व बचतखाते पासबुक घेऊन नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण (MJPSKY Protsahanpar Anudan KYC) करुन घ्यावे.
आधार प्रमाणीकरण करण्याची शेवटची तारीख: १८ सप्टेंबर २०२४
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर ५०,०००/ लाभ योजना eKYC प्रलंबित लाभार्थी यादी: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर ५०,०००/ लाभ योजना eKYC प्रलंबित लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा !
आधार प्रमाणीकरण ऑनलाईन ( MJPSKY Protsahanpar Anudan KYC Online): महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50 हजार प्रोत्साहनपर लाभासाठी कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण ऑनलाईन करण्यासाठी इथे क्लिक करा.
पुढील लेख देखील वाचा!
- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर ५०,०००/ लाभ योजना eKYC प्रलंबित लाभार्थी यादी जाहीर !
- आधार प्रमाणीकरण ऑनलाईन प्रोसेस पहा !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
आधार प्रामाणिक रन केले आहे