मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज सुरु २०२४ – Mini Tractor Subsidy Scheme Latur
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे व त्यांच्या राहणीमानात बदल होऊन सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor Subsidy Scheme) व उपसाधनांचा पुरवठा करण्यात येतो.
10 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च, 2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यात येतो.
सन 2024-2025 मध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र बचतगटांनी 10 ऑगस्ट 2024 पर्यंत समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेच्या मार्गदर्शक सूचना 8 मार्च, 2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या संकेतस्थळावर हा शासन निर्णय उपलब्ध आहे.
संपर्क: तरी इच्छुक व पात्र बचतगटांनी 10 ऑगस्ट 2024 पर्यंत समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयात मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी (Mini Tractor Subsidy Scheme) अर्ज सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त एस. एन.चिकुर्ते यांनी केले आहे.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
Tractor yes
ट्रॅक्टर अनुदान