महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत जॉब कार्डसाठी अर्ज कसा करायचा?
आपण या लेखात महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) जॉबकार्ड (MGNREGA Job Card) म्हणजे काय? जॉब कार्ड (MGNREGA Job Card) साठी अर्ज कसा करायचा? जॉब कार्ड (MGNREGA Job Card) यादी मध्ये ऑनलाईन नाव कसे तपासायचे ते सविस्तर पाहूया.
महात्मा गांधी रोजगार हमी कायदा 2005, हा एक भारतीय कामगार कायदा आणि सामाजिक सुरक्षा उपाय आहे ज्याचा उद्देश ‘कामाच्या अधिकाराची हमी’ मिळवणे आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारच्या काळात सप्टेंबर 2005 मध्ये हा कायदा मंजूर करण्यात आला होता. ज्यांचे वयस्क सदस्य अकुशल मॅन्युअल काम करण्यासाठी स्वयंसेवा करतात अशा प्रत्येक घरात आर्थिक वर्षात किमान 100 दिवसांचे वेतन रोजगार उपलब्ध करून ग्रामीण भागात रोजीरोटीची सुरक्षा वाढविण्याचे उद्दीष्ट ठेवलेले आहे. ज्यात प्रौढ सदस्य अकुशल मॅन्युअल काम करण्यासाठी स्वयंसेवा करतात अशा प्रत्येक घरात, “आर्थिक वर्षात किमान 100 दिवसांची मजुरीची हमी रोजगार देऊन ग्रामीण भागात रोजीरोटीची सुरक्षा वाढविण्याच्या उद्देशाने” मनरेगाची सुरूवात केली गेली.
टिकाऊ मालमत्ता (जसे की रस्ते, कालवे, तलाव आणि विहिरी) तयार करणे हे मनरेगाचे आणखी एक उद्दीष्ट आहे. अर्जदाराच्या निवासस्थानापासून 5 किमीच्या आत रोजगार उपलब्ध करुन द्यावा लागेल आणि किमान वेतन द्यावे लागेल. अर्ज केल्याच्या 15 दिवसांच्या आत काम दिले गेले नाही तर अर्जदारांना बेरोजगारी भत्ता मिळण्याचा हक्क आहे. म्हणजेच जर सरकार रोजगार उपलब्ध करण्यात अयशस्वी ठरली तर त्या लोकांना त्या लोकांना बेरोजगाराचे काही भत्ते द्यावे लागतील. अशा प्रकारे मनरेगा अंतर्गत रोजगार हा कायदेशीर हक्क आहे. मनरेगाची अंमलबजावणी प्रामुख्याने ग्रामपंचायतींकडून करण्यात येणार आहे. कंत्राटदारांच्या सहभागावर बंदी आहे.
मनरेगा जॉबकार्ड म्हणजे काय? MGNREGA Job Card:
मनरेगाच्या कायद्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब ओळखपत्र म्हणजेच, जॉबकार्ड (MGNREGA Job Card) आवश्यकआहे. यामध्ये योजनेच्या लाभार्थींचा फोटोसह नोंदणी क्रमांक असतो. जॉब कार्ड (MGNREGA Job Card) हे एक मुख्य कागदपत्र आहे जे मनरेगा अंतर्गत कामगारांच्या अधिकारांची नोंद ठेवते. हे नोंदणीकृत कुटुंबांना कायदेशीररीत्या कामासाठी अर्ज करण्यास सक्षम करते, पारदर्शकता सुनिश्चित करते आणि कामगारांना फसवणूकीपासून संरक्षण देते. मागेल त्याला काम’ या तत्वावर ग्रामीण भागातील कुटुंबातील व्यक्तींना एका आर्थिक वर्षात केंदीय निधीतून १०० दिवसांची रोजगाराची हमी दिली जाते. तसेच, २६५ दिवसाची हमी राज्य शासनाकडून दिली जाते.
आपल्याला शासनाच्या विविध योजनाचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे जॉबकार्ड (MGNREGA Job Card) असणे आवश्यक आहे. योजनेअंतर्गत केलेल्या कामांची, मुजुरी भरलेल्या दिवसांची हजेरी आणि मजुरीदराची मस्टरवर नोंद करावी लागते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यांच्याकडे जॉबकार्ड (MGNREGA Job Card) नाही त्यांनी हे ग्रामपंचायतमार्फत काढून घेतले पाहिजे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) योजना महाराष्ट्र मजुरी:
केंद्रशासनाने ठरविलेल्या दराप्रमाणे मजूरास मजूरी मिळते, तसेच पुरुष आणि स्त्रियांना सामना रोजगार दर दिला जातो.
- २०१६ – २०१७ करिता- रु. १९२/- प्रति मनुष्यदिन
- २०१७-२०१८ करिता- रु. २०१/- प्रति मनुष्यदिन
- २०१८- २०१९ करिता- रु. २०३/- प्रति मनुष्यदिन
- २०१९- २०२० करिता- रु. २०६/- प्रति मनुष्यदिन
- २०२०-२०२१ करिता- रु. २३८/- प्रति मनुष्यदिन
मनरेगा जॉब कार्डसाठी अर्ज कसा करायचा? Apply for MGNREGA Job Card:
महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत जॉब कार्ड (MGNREGA Job Card) काढण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत मध्ये सरपंच/ग्रामसेवक यांच्या नावे अर्ज करावा लागतो. कामासाठी अर्ज केल्याच्या १५ दिवसाच्या आत मोफत जॉब कार्ड (MGNREGA Job Card) दिलं जातं. अर्ज केल्याच्या दिवसापासून १५ दिवसांच्या आत जर रोजगार दिला नाही तर, कायद्यानुसार दैनंदिन रोजगार भत्ता राज्यसरकारने द्यायचा असतो.
१ . मजूर कुटुंबाने नोंदणीसाठी ग्रामसेवकाकडे द्यावयाचा अर्ज
२ . ग्रामसेवक अनुपस्थित असल्यास किंवा ग्रामसेवकाकडे ग्रामपंचायत मध्ये अर्ज देणे शक्य नसल्यास गट विकास अधिकाऱ्यांकडे द्यावा .
३ . छापील अर्ज उपलब्ध नसल्यास कोऱ्या कागदावर खालील नमुना १ मधील माहिती लिहून दिली तरी चालेल.
४ . कुटुंब नोंदणी हि वर्षभर सतत चालणारी प्रक्रिया आहे .
अर्ज नमुना-१ खालील प्रमाणे माहिती भरायचे आहे.
१. कुटुंब प्रमुखाचे नाव :-
२. अर्जदाराचे नाव :-
३. अर्जदाराचा पत्ता ( घर क्र . सहित ) :- मोबाईल क्र. :-
४. जात प्रवर्ग :-
५. अल्पसंख्याक आहे कि नाही
६. अल्पभूधारक शेतकरी आहे कि सीमांत शेतकरी
७. भूसुधार लाभार्थी आहे कि नाही
८. इंदिरा आवास योजना लाभार्थी आहे कि नाही.
९. आम आदमी बिमा योजना लाभार्थी आहे कि नाही.
१०. राष्ट्रीय स्वास्थ बीमा योजना लाभार्थी आहे किंवा नाही :-
११. दारिद्र रेषेखालील कुटुंब आहे किंवा नाही :-
१२. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वन हक्क मान्यता अधिनियम २००६ अंतर्गत जमीन मिळाली आहे का होय किंवा नाही.
त्यानंतर पुढे आपल्या कुटुंबातील अर्जदार प्रौढ व्यक्तींचा पोस्टकार्ड आकाराचा रंगीत फोटो लावायचा आहे.
जॉब कार्ड अर्ज नमुना PDF फाईल – (MGNREGA Job Card PDF Form):
महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत जॉब कार्ड (MGNREGA Job Card) अर्ज नमुना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
जॉब कार्ड संबंधित अहवाल ऑनलाईन तपासा (MGNREGA Job Card Report):
मनरेगा रोजगार हमी योजनेच्या व्यवहारात व कामात अधिक सुगममता यावी म्हणून ऑनलाईन पोर्टल सुरू केली आहे. या पोर्टलच्या माध्यमातून योजनेच्या लाभार्थ्यांची यादी, जॉब कार्ड (MGNREGA Job Card) धारकांची यादी, जॉब कार्ड क्रमांक, मनरेगाच्या विविध योजनेअंतर्गत करण्यात आलेली कामे, भरलेल्या कामाचे एकूण दिवस, आणि बँक खात्यात जमा झालेले अनुदान आणि मजुरीचे सर्व माहिती पाहायला मिळेल.
महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत जॉब कार्ड (MGNREGA Job Card) संबंधित अहवाल ऑनलाईन पाहण्यासाठी खालील मनरेगाच्या अधिकृत पोर्टला भेट द्या.
https://nrega.nic.in/MGNREGA_new/Nrega_home.aspx
- मनरेगाची पोर्टल ओपन झाल्यावर “Reports“ या पर्यायावर क्लीक करा.
- पुढे “Captcha Code” टाका.
- Financial Year :- आर्थिक वर्ष निवडा.
- आपले राज्य निवडा.
पुढे एक नवीन वेबपेज ओपन होईल त्यामध्ये R1.Beneficiary Detail मध्ये Job Card Related Reports या मेनू मध्ये जॉब कार्ड (MGNREGA Job Card) संबंधित अहवाल आणि कामगार खाते तपशील पाहू शकता.
मनरेगा टोल फ्री नंबर / MGNREGA Helpline Number: 1800-110-707
खालील लेख देखील वाचा!
- ग्रामपंचायत मधील मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले की नाही हे ऑनलाईन कसं पाहायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती – Measurement Book & Mustroll Detail
- मनरेगा मजुरांच्या मजुरीत वाढ २०२४ !
- ग्राम रोजगार सेवक मनरेगा हजेरीपट निर्गमित करणार !
- मनरेगा योजनेंतर्गत कामांवरील हजेरीपट ग्राम पंचयातस्तरावरून निर्गमित करण्याची कार्यपध्दती !
- मनरेगा संबंधित तक्रार आणि सुचना ऑनलाईन नोंदवा !
- मनरेगा अंतर्गत कामांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीचे सुधारित धोरण
- ग्रामपंचायत मधील मनरेगाच्या कामांचं स्टेटस ऑनलाईन कसं पाहायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती – Gram Panchayat MGNREGA Work Expenditure
- मनरेगा अंतर्गत मजुरांना मस्टर बंद होण्याच्या 8 दिवसाच्या आत मजूरी देणे बाबत शासन नियम!
- अभिसरण, संयोजन आणि श्रमदानातून मनरेगांत पाहिजे ते काम घेणे आणि हवे तेव्हा पूर्ण करणे – पहा मनरेगाचा नवीन शासन निर्णय
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत इतर यंत्रणांची भूमिका व जबाबदारी !
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत “ग्राम समृध्दी दिवस”
- ग्रामपंचायतच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची ? जाणून घ्या सविस्तर माहिती!
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!