इयत्ता 1 ली ते इयत्ता 10 वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार गणित ई-साहित्य निर्मितीसाठी मान्यता !
राज्यात दिक्षा ऍपचा जास्तीत जास्त प्रभावीपणे वापर होण्याकरिता तसेच राज्यातील मराठी माध्यमाच्या इयता १ ली ते १० वी मधील विद्यार्थ्यांना दर्जेदार गणित ई साहित्य निर्मिती करण्याबाबत संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.
शालेय स्तरावर गणित विषयाचे महत्व अनन्य साधारण आहे. राज्यातील विद्यार्थ्यांची गणित विषयाची संपादणूक वृध्दिंगत होण्याच्या दृष्टीने राज्यस्तरावरुन विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामध्ये दीक्षा अॅप वरील ई – साहित्याचे महत्व अधोरेखित आहे. सदर अॅपवरील साहित्य पाठयपुस्तकातील Q.R. Code च्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले जाते.
सदर दीक्षा अॅप वरील ई – साहित्य अद्ययावत, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करणेसाठी राज्यातील तंत्रस्नेही शिक्षक यांच्या मदतीने ई – साहित्य निर्मिती करण्यात येते. सदर प्रक्रियेमध्ये या विषयातील तज्ञ असणाऱ्या विविध अशासकीय संस्थांचे देखील सहकार्य घेण्यात येत असते. याअनुषंगाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाचे ई – साहित्य निर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.
इयत्ता 1 ली ते इयत्ता 10 वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार गणित ई-साहित्य – mathematics e books:
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मार्फत राज्य अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ई – साहित्य निर्मिती करण्यात येत आहे. सदर निर्मित ई – साहित्य दीक्षा अॅप, पाठयपुस्तकातील Q.R. Code परिषदेची वेबसाईट व यु – ट्यूब चॅनेल यांचे मार्फत होणाऱ्या रु. १६.५० लक्ष इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे. तसेच ई – साहित्य निर्मिती करिता आवश्यक साहित्य खरेदी, व्हिडीओ निर्मिती, भाषांतर तज्ञ व इतर अनुषंगिक खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. सदर मान्यता पुढील अटींच्या अधीन राहून देण्यात येत आहे.
- ई – साहित्याची खरेदी Gem पोर्टलवरुन विहित पध्दतीने करण्यात यावी.
- उपलब्ध करुन दिलेला निधी त्याच प्रयोजनासाठी उपयोगात आणला जावा.
- खर्च विहित मार्गाने नियमानुसार करण्याची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे राहील.
- खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे तात्काळ सादर करण्यात यावीत.
शासन निर्णय: इयत्ता 1 ली ते इयत्ता 10 वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार गणित ई-साहित्य निर्मितीसाठी प्रशासकिय व वित्तीय मान्यता देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा – महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु – Apply Online For Maha DBT Scholarship
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!