लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये लाभासाठी नारीशक्ती दूत ॲपवरून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस !
महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. या योजनेनुसार जुलै महिन्यापासून राज्यातील महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये मानधन दिले जाणार आहे. मात्र, यासाठी अर्ज करताना अनेक महिलांना रांगेत उभे राहून त्रास सहन करावा लागतो आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता थेट मोबाईवरून ऑनलाईन (Majhi Ladki Bahin Yojana Apply Online) अर्ज करता येणार आहे. ऑफलाईन पद्धतीने देखील तहसील कार्यालयात जाऊन किंवा अंगणवाडी सेविकांच्या मदतीने किंवा सेतू कार्यालयात हा अर्ज दाखल करता येतो.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारीशक्ती दूत ॲपवरून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस ! Majhi Ladki Bahin Yojana Apply Online:
ज्या महिलांना मोबाईलच्या माध्यमातून हा अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठीही राज्य सरकारने नारीशक्ती दूत नावाच्या अॅपचा वापर करण्याचा पर्याय दिलेला आहे. ‘नारीशक्ती दूत’ अॅप डाऊनलोड करून तुम्हाला अर्ज भरता येऊ शकतो. त्यासाठी अॅपमध्ये जाऊन तुमची माहिती भरून आपलं प्रोफाईल तयार करावे.
नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करा:
सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करून किंवा गुगल प्ले-स्टोअरवरून ‘नारीशक्ती दूत – Narishakti Doot’ असे सर्च करून हे ॲप डाऊनलोड करा.
https://play.google.com/store/apps/Narishakti-Doot
नारीशक्ती दूत ॲप मध्ये लॉगीन करा
‘नारीशक्ती दूत – Narishakti Doot ॲप इन्स्टॉल झाल्यावर ओपन करा; त्यानंतर ज्या महिलेचा अर्ज भरायचा आहे, त्या महिलेचा मोबाईल क्रमांक टाकून लॉगीन करा.
पुढे ‘Accept Term and Condition’ वर क्लिक करा आणि स्वीकारा या पर्यायावर क्लिक करा. ज्या मोबाईल क्रमांकाने तुम्ही लॉगीन केलं, त्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला OTP येईल. तो OTP दिलेल्या बॉक्समध्ये टाकून ‘Verify OTP’ या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर ‘तुम्हाला प्रोफाईल अपडेट करा’ असा संदेश येईल. तिथे ‘आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा’, या पर्यायावर क्लिक करा.
प्रोफाईल अपडेट करा:
प्रोफाईल अपडेट करताना, तुमचं पूर्ण नाव, ईमेल आयडी (पर्यायी), जिल्हा, तालुका, नारीशक्तीचा प्रकार अपडेट करा.
प्रोफाईल अपडेट केल्यानंतर खाली ‘नारीशक्ती दूत’ या पर्यायावर क्लिक करा. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या पर्यायावर क्लिक करा.
महिलेचे संपू्र्ण नाव (आधार कार्डप्रमाणे), पतीचे किंवा वडिलांचे नाव, जन्म तारीख, जन्माचे ठिकाण (गाव/ शहर) पिनकोड, पूर्ण पत्ता, अर्जदार महिलेचा मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत आहे का?, वैवाहिक स्थिती आणि बॅंक खात्याचा तपशील भरा.
संपूर्ण माहिती भरल्यानंतर आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला/रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, (डाऊनलोड करून प्रिंट काढून त्यावर सही करा आणि पुन्हा अपलोड करा) आणि बॅंकेच्या पासबूकचा फोटो आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करा, आणि खाली ‘जतन करा’ या पर्यायावर क्लिक करा.
तुम्ही भरलेली माहिती योग्य आहे की नाही, तपासून घ्या आणि ‘अर्ज दाखल करा’, या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल, तो ओटीपी भरून अर्ज दाखल करा.
अर्ज संपूर्ण भरून सबमिट केल्यानंतर केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकता.
या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यास १ जुलैपासून सुरुवात झाली असून ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
लाडकी बहीण योजनेचा अर्ज चुकला आहे अपडेट कसा करायचा ?
अँप मध्ये लॉगिन करून यापूर्वी केलेले अर्ज मध्ये तुमचा अर्ज दिसेल त्यावर क्लिक करा. पुढे edit बटन वर क्लिक करून अर्ज अपडेट करा.
सूचना: चुकलेला अर्ज एकदाच दुरुस्त करू शकता, त्यामुळे काळजीपूर्वक माहिती अपडेट करा
हमीपत्र PDF फाईल : हमीपत्र येथे क्लिक करून डाउनलोड करा आणि आवश्यक तपशील भरून ऑनलाईन फॉर्म मध्ये अपलोड करा.
सूचना:
- ॲप मध्ये अर्ज भरताना OTP प्रॉब्लेम किंवा लॉगिन होत नसेल, EDIT पर्याय दिसत नसेल > तर ॲप अपडेट करा किंवा अनइंस्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करा.
- कागदपत्रे अपलोड होत नसतील तर > कागदपत्रांची साईज कमी करा.
ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज भरण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे नोंदणी करावी लागेल. तर शहरी भागातील महिलांना वॉर्ड ऑफिसरकडे नोंदणी करावी.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑफलाईन अर्ज नमुना PDF फाईल : माझी लाडकी बहीण योजनेचा ऑफलाईन अर्ज नमुना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय :
- महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण – CM Majhi Ladki Bahin Yojana योजना सुरु करण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणाबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा – लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर अर्जाचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
This app is not working, mobile number login error and no further process
Happening due to high traffic on the app…please try sometime or at night.
Justice for girl
सर्व माहिती भरल्यावर बॅंकेच्या आय एफ सी कोड चुकीचे म्हणते, बॅंक मॅनेजर पण थकले.
आय एफ सी कोड सर्च करा
Ladke bahin
Ladki bahin yojana