नोकरी भरतीवृत्त विशेष

महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात भरती; ऑनलाईन अर्ज सुरु !

महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या (Mahila Bal Vikas Vibhag Bharti) 236 जागांसाठी २०२४ मध्ये भरती सुरू आहे. महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात भरतीची (Mahila Bal Vikas Vibhag Bharti) अर्ज प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 03 नोव्हेंबर 2024 असणार आहे, तरी इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात भरती – Mahila Bal Vikas Vibhag Bharti:

आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त आस्थापनेवरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट ड या संवर्गातील (१) संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित) २ पदे (२) परिविक्षा अधिकारी, गट क ७२ पदे (३) लघुलेखक (उच्चश्रेणी) गट क १ पद (४) लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क-२ पदे (५) वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक, गट-क- ५६ पदे (६) संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क५७ पदे (७) वरिष्ठ काळजी वाहक गट-ड ४ पदे (८) कनिष्ठ काळजी वाहक गट-ड ३६ पदे (९) स्वयंपाकी गट-ड-६ इत्यादी भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न नमूद सरळसेवा कोट्यातील रिक्त असलेली पदे (Mahila Bal Vikas Vibhag Bharti) भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग सरळसेवा भरती (Mahila Bal Vikas Vibhag Bharti) प्रक्रियेशी संबंधित सविस्तर जाहिरात व ऑनलाइन अर्ज भरण्याबाबतची सुविधा महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे च्या संकेतस्थळावर दिनांक १४-१०-२०२४ पासून उपलब्ध होणाऱ्या लिंकवर उपलब्ध करून दिली आहे. उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून केवळ ऑनलाइन पध्दतीनेच अर्ज सादर करावेत. प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता केवळ उक्त संकेस्थळावरुन ऑनलाइन पध्दतीने भरलेला अर्ज व ऑनलाइन पध्दतीने भरण्यात आलेले परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज/ परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येणार नाही,

जाहिरात क्र.: 01/2024

एकूण जागा : 236 जागा.

पदाचे नाव व तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1संरक्षण अधिकारी, गट ब02
2परिविक्षा अधिकारी, गट क72
3लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क01
4लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क02
5वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, गट-क56
6संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क57
7वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड04
8कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड36
9स्वयंपाकी गट-ड06
एकूण जागा236

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) समाज कार्य विषयात पदव्युत्तर पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण   (ii)  लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  4. पद क्र.4: कोणत्याही शाखेतील पदवी
  5. पद क्र.5: कला, विज्ञान, वाणिज्य,विधी, समाज कार्य, गृह विज्ञान किंवा पोषण आहार पदवी
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण   (ii)  लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) उंची: 163 सेमी, छाती: न फुगवता 79 सेमी
  8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) उंची: 5 फुट 4 इंच, छाती: न फुगवता 31 इंच
  9. पद क्र.9: 10वी उत्तीर्ण

वयाची अट:03 नोव्हेंबर 2024 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

फी: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2024 (11:55 PM)

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (Mahila Bal Vikas Vibhag Bharti Notification):

  1. जाहिरात सूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
  2. जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online Mahila Bal Vikas Vibhag Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पुढील नोकरी भरतीचे लेख देखील वाचा!

  1. भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ११,५५८ जागांवर होणार भरती, असा करा अर्ज!
  2. MPSC मार्फत नगर विकास विभागात भरती.
  3. MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
  4. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती २०२४
  5. SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39481 जागांसाठी मेगा भरती
  6. महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती ; जाणून घ्या सविस्तर माहिती !
  7. पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती
  8. उत्तर मध्य रेल्वेत 1679 जागांसाठी भरती
  9. नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
  10. SBI SO Bharti : भारतीय स्टेट बँकेत 1511 जागांसाठी भरती
  11. बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
  12. नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.