थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना!
बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील ३८ लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी (Mahavitaran Abhay Yojana) ‘महावितरण’ची अभय योजना- २०२४ अंमलात येणार आहे. त्याअंतर्गत ग्राहकांना वीजबिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण एक हजार ७८८ कोटी रुपये माफ करण्यात येणार आहेत.
सद्यस्थितीत महावितरणच्या कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडे लक्षणीय थकबाकी प्रलंबित आहे. सदर थकबाकी वसूल करणे विविध समस्यांमुळे आव्हानात्मक बनले आहे. अनेक नवीन येणारे जागा मालक / रहिवासी यांना त्या जागेवरील थकबाकीमुळे नवीन वीज पुरवठा मिळण्यात अडचणी येत आहेत. असे निदर्शनास आले आहे की, बहुतांश कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित असणारे ग्राहक हे अनधिकृतरित्या वीज वापरत आहेत. यामुळे कंपनीच्या महसूल व वितरण हानीवर विपरीत परिणाम होत आहे. याआधीही महावितरणने कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांच्या थकबाकीच्या वसुलीला चालना देण्यासाठी वेळोवेळी विविध अभय (Mahavitaran Abhay Yojana) योजना राबविल्या आहेत. परंतु कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांच्या थकबाकी वसुलीसाठी केलेले प्रयत्न अपुरे पडत आहेत.
अलीकडेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिवाणी अपील क्रमांक २१०९-२११०/२००४ आणि दिनांक १९.०५.२०२३ रोजीच्या अपीलातील १९ प्रकरणांविषयी दिलेल्या निकालाद्वारे वितरण कंपनीला वीज पुरवठा खंडित केलेल्या जागेवरील थकबाकी ही सदर जागेच्या मालक / खरेदीदार / वहिवाटदार यांच्याकडून व्याजासह वसूल करण्याचा अधिकार असल्याचे जाहीर केले आहे.
महावितरण अभय योजना – Mahavitaran Abhay Yojana:
मागील सर्व योजनांचा आढावा घेऊन आणि त्या योजनांना मिळालेल्या प्रतिसादामुळे जास्तीत जास्त कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित असणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अधिक लाभदायक अभय (Mahavitaran Abhay Yojana) योजना राबविणे सद्यस्थितीत गरजेचे आहे. तसेच, महावितरण अभय (Mahavitaran Abhay Yojana) योजने अंतर्गत ग्राहकांना त्यासोबतच पुनर्जोडणी / नवीन वीज जोडणीची सुविधा उपलब्ध करून दिल्यास महावितरणच्या थकबाकी वसुलीच्या प्रमाणात वाढ होईल.
पात्रतेचे निकष :
दिनांक ३१.०३.२०२४ रोजी किंवा त्यापूर्वी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेले सर्व उच्चदाब व लघुदाब ग्राहक (कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा ग्राहक वगळून) महावितरण अभय (Mahavitaran Abhay Yojana) योजनेत सहभागी होण्यास पात्र असतील. महावितरण अभय (Mahavitaran Abhay Yojana) योजनेसाठी ३१ मार्च २०२४ पर्यंतची थकबाकी निश्चित करण्यात आली आहे. वितरण फ्रँचायझी क्षेत्रातील महावितरणच्या काळातील कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेले थकबाकीदार ग्राहक देखील या योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. वितरण फ्रँचायझी क्षेत्रामध्ये ग्राहकांसाठी देय रक्कम संबंधित वितरण फ्रँचायझीच्या करारातील तरतुदीनुसार असेल.
योजनेचे फायदे आणि निकष :
१) कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांनी संपूर्ण मुळ थकबाकी (मुद्दल) भरल्यास १००% व्याज आणि विलंब आकार माफ केले जाईल. तसेच कायमस्वरूपी (PD) वीज पुरवठा खंडित केलेल्या तारखेपासून अर्जाच्या तारखेपर्यंत कोणतेही व्याज आकारले जाणार नाही.
२) ग्राहकांना थकबाकीची देय रक्कम १००% एकरकमी भरण्याचा किंवा किमान ३०% डाऊनपेमेंटसह जास्तीत जास्त ०६ हफ्त्त्यांमध्ये भरण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
३) उच्चदाब ग्राहकांनी मुळ थकबाकी (मुद्दल) एकरकमी भरल्यास त्यावर ५% अतिरिक्त सवलत मिळेल तसेच लघुदाब ग्राहकांनी मुळ थकबाकी एकरकमी भरल्यास त्यावर १०% अतिरिक्त सवलत मिळेल.
प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यासः
अ. ग्राहकाने दाखल केलेली याचिका केस / खटला बिनशर्त मागे घेतल्यास आणि त्यासाठी महावितरणने दावा दाखल केलेल्या खर्चाची (Legal Expenses) भरपाई केल्यास ग्राहक महावितरण अभय (Mahavitaran Abhay Yojana) योजनेत सहभागी होण्यास पात्र ठरेल.
ब. जर महावितरणने याचिका/केस/खटला दाखल केला असेल तर ग्राहकाने मुळ थकबाकी रक्कम व महावितरणने दावा दाखल केलेल्या खर्चाचा भरणा केल्यानंतर खटला मागे घेण्यात येईल. क. जर ग्राहकाने हप्त्यांनी थकबाकी भरण्याकरिता पर्याय निवडला असेल तर मुळ थकबाकी रक्कम व महावितरणने दावा दाखल केलेल्या खर्चाचा संपूर्ण भरणा केल्यानंतर खटला मागे घेण्यात येईल.
ड. कोर्टाकडून डीक्री आदेश पारित होऊन देखील १२ वर्षापर्यंत अंमलबजावणी झाली नसल्यास आणि त्याविरुध्द कंपनीने कोर्टात अपिल दाखल केले नसल्यास असे ग्राहक महावितरण अभय (Mahavitaran Abhay Yojana) योजनेसाठी पात्र ठरतील.
इ. कोर्टाकडून डीक्रीचे आदेश पारित होऊन १२ वर्षे पूर्ण झाली नसतील व देय रक्कम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे असेल, तर व्याजामध्ये ५०% सूट लागू होईल (दावा दाखल केलेल्या तारखेपासून ग्राहकाच्या अर्जाच्या तारखेपर्यंत).
फ. जर महावितरणने ग्राहकाविरुद्ध किंवा ग्राहकाने महावितरण विरुद्ध खटला / याचिका दाखल केली असेल तर ग्राहकास २०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य राहील.
पुनर्जोडणी/नवीन वीज जोडणी :
अ. जर ग्राहकाने देय रक्कम एकरकमी किंवा किमान ३०% डाऊन पेमेंटचा पर्याय निवडला असेल तर ग्राहकास कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित केलेल्या जागेवरती पुनर्जोडणी/नवीन वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध असेल.
ब. ग्राहकाने नवीन वीज जोडणीचा पर्याय निवडल्यास आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि मा. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने निर्धारित केलेल्या रकमेचा भरणा केल्यानंतर नियमानुसार तात्काळ नवीन वीज जोडणी देण्यात येईल.
कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित थकबाकी विषयीच्या तक्रारी/विवादाबाबतः-
अ. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित थकबाकीबाबत कोणतीही तक्रार/विवाद असल्यास ग्राहकाला ती नोंदविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ग्राहकाने नोंदविलेल्या तक्रारी सीआरएम पोर्टल मध्ये उपलब्ध होतील. संबंधित मंडळ / उपविभाग कार्यालयाने, ग्राहकाचा अर्ज प्राप्त झाल्यापासून ०३ दिवसांच्या आत या तक्रारींचे निराकरण करावयाचे आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याच्या तारखेपासून (TD) किंवा अवाजवी बिले त्या नंतर दिली असल्यास, संबंधित बिलिंग प्रभारी अधिकाऱ्याने दुरुस्ती करून सदर प्रस्ताव संबंधित सक्षम अधिकाऱ्याकडे मंजुरीसाठी सादर करावयाचे आहे.
ब. महावितरण अभय (Mahavitaran Abhay Yojana) योजनेअंतर्गत बिलाची तक्रार/न्यायिक विवाद असल्यास हप्ते मंजूर करण्याकरिता सक्षम अधिकारी खालील प्रमाणे असतील:-
उच्चदाब ग्राहक – मुख्य अभियंता स. व. सु. परिमंडळ महावितरण.
लघुदाब ग्राहक – कार्यकारी अभियंता स. व. सु. विभाग महावितरण.
(ज्या ग्राहकांचे कोणतेही विवाद नसल्यास / कोणतेही न्यायप्रविष्ट प्रकरण नसल्यास / कोणत्याही चुकीच्या बिलाची तक्रार नसल्यास, एकरकमी किंवा हप्त्याद्वारे रक्कम भरण्याकरिता वेगळ्या मंजुरीची आवश्यकता नाही.
क. सुधारित थकबाकीची रक्कम पोर्टलवर दर्शविण्यात येईल आणि त्वरित एसएमएस/ईमेलद्वारे ग्राहकांना सूचित केली जाईल. मंडळ / उपविभागीय कार्यालया मार्फत सुद्धा सुधारित वीज बिल भरणा रकमे बद्दल ग्राहकांना सूचित करण्यात येईल.
थकबाकी वसुली प्रक्रिया :
अ. जर ग्राहकाची पुनर्जोडणी/नवीन जोडणी झाली नसेल तर महावितरण अभय (Mahavitaran Abhay Yojana) योजनेच्या कालावधीत (ग्राहकाने निवडलेल्या हप्त्यांइतके महिने) ग्राहकाने देय हप्त्याची रक्कम संबधित महिना अखेर पर्यत भरणे अनिवार्य राहील. आणि जर ग्राहकाची पुनर्जोडणी/नवीन जोडणी झाली असल्यास वीज देयकाच्या देय तारखेनुसार हप्त्यांची रक्कम आणि चालु वीज देयक भरणे बंधनकारक असेल.
ब. निवड केलेल्या देय हप्त्यांच्या रकमेचा भरणा करण्याकरिता महावितरणच्या संकेतस्थळ / मोबाईल अॅपवर पर्याय उपलब्ध असेल.
क. हप्त्याची रक्कम / चालू वीज बिल किंवा दोन्ही थकवल्यास पूर्वसूचना न देता तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात येईल.
ड. महावितरण अभय (Mahavitaran Abhay Yojana) योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला सर्व देय रक्कम हप्त्यानुसार विहित मुदतीत भरणे आवश्यक आहे. महावितरण (Mahavitaran Abhay Yojana) अभय योजनेनुसार देय असणारी एकूण थकबाकीची रक्कम न भरल्यास कालावधीच्या अंती देय रक्कमेवर व्याज आणि विलंब आकार लागू होतील.
या धोरणाच्या तरतुदींबाहेरील कोणताही प्रस्ताव असल्यास सदर प्रस्तावाला अपवादात्मक प्रकरण मानले जाईल आणि अशा प्रकरणांबाबत निर्णय घेण्यासाठी मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हे सक्षम अधिकारी असतील.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० नोव्हेंबर २०२४ (अर्ज दि. १ सप्टेंबर २०२४ पासून सुरु)
ऑनलाईन अर्ज (Apply Online For IMahavitaran Abhay Yojana): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
ग्राहक ऑनलाईन पोर्टलद्वारे आणि मोबाईल अॅपद्वारे अर्ज करून महावितरण अभय (Mahavitaran Abhay Yojana) योजनेत सहभागी होऊ शकतात. ग्राहकांनी ऑनलाईन पोर्टलच्या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा मोबाईल अॅपचा वापर करून अर्ज सादर करावा.
संपर्क: वीज ग्राहक १९१२ किंवा १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही माहिती घेऊ शकतात.
खालील लेख अवश्य वाचा !
- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४; आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज!
- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० : राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार !
- पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी अर्ज सुरु ! PM Suryaghar Yojana
- विजेचे युनिट रेट/आकार आणि वीज ग्राहकांचे अधिकार
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!