दिव्यांग व्यक्तींनी मदतीसाठी महा-शरद पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करा !
दिव्यांग व्यक्तींना जीवन जगणे सुलभ व्हावे व त्यांना सुगम्यता प्राप्त व्हावी यासाठी विविध सहायक उपकरणाची आवश्यकता असते. या उपकरणामुळे ते त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करून सर्वसामान्याप्रमाणे जीवन जगतात. यासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटना त्यांना मदत करू इच्छितात. ही मदत गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी या उद्देशाने सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, दिव्यांग कल्याण आयुक्तालय व राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत महा-शरद हे वेब पोर्टल सुरू करण्यात आले. दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी महा-शरद (Mahasharad Portal) या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
याकरिता दिव्यांग व्यक्तींकडे केंद्र शासनाच्या वैश्विक ओळखपत्र प्रणालीअंतर्गत प्रमाणित असणे आवश्यक आहे. जी व्यक्ती आणि सामाजिक सेवाभावी संस्थांकडून या प्रणालीद्वारे मदत करतील त्यांना आयकरात 80-जी अंतर्गत सूट राहिल. या प्रणालीत जास्तीत-जास्त दिव्यांग व दानशूर व्यक्ती आणि सामाजिक सेवाभावी संस्थांनी महा-शरद (Mahasharad Portal) या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
दिव्यांग व्यक्तींनी मदतीसाठी महा-शरद पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करा ! – Mahasharad Portal:
महा-शरद (Mahasharad Portal) पोर्टलरुपी अभियान म्हणजे राज्यातील दिव्यांगांसाठी सहाय्य उपलब्ध होण्याची नामी संधी असनू ज्यामध्ये ते थेट शासनाच्या मंचाद्वारे मागणी करु शकतात. दिव्यांगं व्यक्ती हक्क अधिनियमातील विशेषत्वाने नमदू केलेल्या दिव्यांग व्यक्ती शासनाच्या मंचावर विस्तृतपणे नोंदणी करुन त्यांना आवश्यक ती मदत तथा सहकार्य मिळवू शकतात. सदर पोर्टल दिव्यांग व्यक्ती व समाजातील दानशरू व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या यांना विनामूल्य जोडणारा दुवा म्हणजे हे शरद पोर्टल अभियान आहे.
दृष्टी आणि ध्येय:
महाराष्ट्रातील दिव्यांगांना अस व्यासपीठ तयार करून देणे ज्यात विविध भागातील सर्व/ कोणत्याही पद्धतीचे दिव्यांग आपलं नाव सहज नोंदवू शकतात राज्यातील दिव्यांगांना त्यांच्या दिव्यांगत्वानुसार आणि लागणाऱ्या मदतीसाठी देणगीदार त्यांचा शोध घेऊ शकतात.
१) संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग आणि त्यांना देणगी देऊ इच्छिणाऱ्या देणगीदारांना एकाच पोर्टलखाली नोंदणी करणे. आणि त्यांचे समर्थन करणे.
२) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळांच्या योजनांची माहिती देणे.
३) विविध प्रकारच्या माहितीच्या आधारे दिव्यांगाची परीस्थिती आणि गरजा समजून घेणे.
४) दिव्यांग, अशासकीय संघटना, समाजसेवक आणि देणगीदार या सर्वांना एकाच छताखाली आणणे.
ऑनलाईन दिव्यांग नोंदणी फॉर्म – Apply Online Mahasharad Portal:
दिव्यांग नोंदणी फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी खालील महा-शरद (Mahasharad Portal) पोर्टल लिंक वर क्लिक करा.
https://www.mahasharad.in/divyang_mr
दिव्यांगांसाठी सहाय्य करा:
दिव्यांगांसाठी सहाय्य करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://www.mahasharad.in/donate-to-cause_mr
पुढील लेख देखील वाचा!
- पंचायत राज्य संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नातून ५ टक्के निधीतून घ्यावयाच्या अपंग कल्याणासाठी योजना व खर्चाबाबत मार्गदर्शक सूचना
- विधवा, अपंग व निराधार अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी असा करा ऑनलाइन अर्ज !
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना
- संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ !
- या ५ विशेष सहाय्य योजनांचे ऑफलाईन/ऑनलाईन अर्ज आता ग्रामपंचायत मध्ये ही भरता येणार !
- UDID Card : दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी वैश्विक ओळखपत्र अनिवार्य !
- मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजनेसाठी दिव्यांग व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन !
- अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!