कृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

महामेष योजनेत बदल; मेंढपाळ लाभार्थींच्या रक्कम थेट खात्यात जमा होणार ! शासन निर्णय जारी

राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना – Mahamesh Yojana पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय दि. २३ जुलै २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील धनगर समाजातील मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना 2017 वर्षापासून सुरु होती. या योजनेत अधिकाधिक लाभार्थींना फायदा व्हावा म्हणून काही बदलासह त्यास मान्यता देण्यात आली. या वर्षासाठी महामंडळाकडे असलेल्या 29 कोटी 55 लाख इतका निधी चालू वित्तीय वर्षात खर्च करण्यास आणि त्यानंतर ही योजना दरवर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पुढे चालू ठेवण्यात येईल. पशुधन खरेदीच्याबाबतीत 75 टक्के अनुदानाची रक्कम 7 दिवसात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रीयेतून (डीबीटी) लाभार्थीना देण्यात येईल. तसेच चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे व बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व लाभ डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थींना देण्यात येतील.

धनगर व तत्सम जमातीमधील समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्या असलेला मागासलेपणा दूर करुन स्थैर्य मिळवून देण्याच्या दृष्टीने मेंढीपालनास प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान तत्त्वावर ६ मुख्य घटकासह नवीन योजना “राजे यशवंतराव होळकर महामेष योजना – Mahamesh Yojana” या नावाने सुरु करण्यात आली आहे. सदर योजनेत समाविष्ठ असलेल्या ६ घटकांसाठी घटकनिहाय लाभार्थ्यांची संख्या व आर्थिक मर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत एकूण रु. ४४,५६,९२,३३८/- अनुदान वाटपासाठी व प्रशासकिय खर्च (१ टक्का) रु. ४४,५६,९२३/- असा एकूण ४५,०१,४९,२६१/- इतका निधी निर्धारित करण्यात आला आहे. सदर योजनेत आतापर्यंत रु. ४४.२४ कोटी इतका निधी खर्च झाला आहे. त्यानुसार आर्थिक उद्दिष्ट पुर्ण झाले आहे.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत बदल ! Mahamesh Yojana:

सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पीय भाषणात तत्कालीन अर्थमंत्री यांनी योजनेची फलश्रुती लक्षात घेऊन व्याप्ती वाढविण्याबाबत नंतर विचार करण्यात येईल, असे घोषित केले आहे. सदर योजनेत महामंडळाकडे सध्यास्थितीत प्रलंबित / प्रतिक्षाधिन अर्ज व महामंडळाकडे उपलब्ध असलेला निधी विचारात घेवून ही योजना पुढे चालु ठेवण्यास मा. मंत्रिमंडळाने दिनांक २३.०७.२०२४ रोजी मान्यता दिली आहे. त्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवणार!

शासन निर्णयान्वये धनगर व तत्सम समाजास आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्यासाठी व मेंढी पालनास प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान तत्वावर “राजे यशवंतराव होळकर महामेष योजना” ही योजना सुरु करण्यात आली आहे. सदर योजना राबवितांना आलेला अनुभव व सदर योजनेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड, पुणे यांच्याकडे प्रतिक्षाधिन असलेल्या २५६९५ अर्जाची संख्या व उपलब्ध निधी विचारात घेऊन “राजे यशवंतराव होळकर महामेष योजना – Mahamesh Yojana” पुढे चालू ठेवण्याची आवश्यकता विचारात घेऊन पुढील निर्णयास मान्यता देण्यात येत आहे.:-

(१) धनगर व तत्सम समाजास सामाजिक व आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्यासाठी शासन निर्णय अन्वये लागू करण्यात आलेली “राजे यशवंतराव होळकर महामेष योजना – Mahamesh Yojana” यापूढे चालू ठेवण्यात येत आहे.

(२) “राजे यशवंतराव होळकर महामेष योजना” या योजनेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाकडे अखर्चित असलेला रु. २९.५५ कोटी इतका निधी चालु वित्तीय वर्षात खर्च करण्यात यावा. तसेच पुढील वर्षापासुन उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल.

(३) या योजनेतील लाभार्थ्यांचा प्रतिसाद विचारात घेऊन लाभार्थी उद्दिष्टे तसेच आर्थिक उद्दिष्टे यामध्ये अंतर्गत बदल करण्याचे अधिकार प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आले आहे.

(४) सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणारे पशुधन (मेंढ्या व नर) यांची लाभार्थ्यांने प्रथम स्वखर्चातून महामंडळाच्या प्रक्षेत्रावरुन अथवा जनावरांच्या अधिकृत बाजारातून खालील समितीच्या उपस्थितीत खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.:-

  • जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त (संबंधित जिल्हा)
  • पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती
  • पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना
  • विमा
  • लाभधारक

संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी खरेदी करण्यात आलेल्या पशुधन खरेदीच्या मुळ पावत्या तसेच खरेदी केलेले पशुधन व खरेदी समितीच्या एकत्रित फोटोसह खरेदी अहवाल पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड, पुणे यांना सादर कराव्यात.

मेंढपाळ लाभार्थींच्या रक्कम थेट खात्यात जमा!

व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड, पुणे यांना वरील कागदपत्रे सादर केल्यानंतर ७५ टक्के अनुदानाची रक्कम ७ दिवसात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेच्या (DBT) माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.

सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड, पुणे यांच्या प्रक्षेत्रावरुन देण्यात येणा-या चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे/बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व बाबींचे लाभ पूर्वीप्रमाणेच थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेच्या (DBT) माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात येईल.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना या योजनेच्या इतर अटी, शर्ती व कार्यपध्दती शासन निर्णय क्र. पविआ २०१७/प्र.क्र.६५/पदु-३, दिनांक २.६.२०१७ प्रमाणेच राहतील.

ऑनलाईन अर्ज (Apply Online Mahamesh Yojana): महामेष (Mahamesh Yojana) योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग शासन निर्णय – Mahamesh Yojana GR : 

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना या योजनेत बदल करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा .

पुढील लेख देखील वाचा!

  1. महामेष योजना : शेळी मेंढ्यांसाठी चराई, पालानाकरिता १ गुंठा जागा खरेदी अनुदान व कुकूट पालन अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरु !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.