कृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागवृत्त विशेषसरकारी योजना

महामेष योजना : शेळी मेंढ्यांसाठी चराई, पालानाकरिता १ गुंठा जागा खरेदी अनुदान व कुकूट पालन अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरु !

राज्यातील भज-क प्रवर्गा साठी – राजे यशवंतराव होळकर महामेष योजना (Mahamesh Yojana), चराई अनुदान योजना, शेळी मेंढी पालानाकरिता १ गुंठा जागा खरेदी योजना व परसातील कुकूट पालन योजनेसाठी अर्जदारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. महामेष (Mahamesh Yojana) योजेनचे अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील याची नोंद घ्यावी. तरी इच्छुक अर्जदाराने महामेष (Mahamesh Yojana) योजने अंतर्गत विहित कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना – Mahamesh Yojana:

  1. कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोई सुविधेसह २० मेंढया १ मेंढानर असा मेंढीगट ७५% अनुदानावर वाटप करणे (स्थायी).
  2. स्थलांतर पद्धतीने मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोई सुविधेसह २० मेंढया १ मेंढानर असा मेंढीगट ७५% अनुदानावर वाटप करणे (स्थलांतरीत).
  3. ज्यांच्याकडे स्वतचे २० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ४० पेक्षा कमी मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा १ नरमेंढा ७५% अनुदानावर वाटप करणे.
  4. ज्यांच्याकडे स्वतचे ४० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ६० पेक्षा कमी मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा २ नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.
  5. ज्यांच्याकडे स्वतचे ६० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ८० पेक्षा कमी मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा ३ नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.
  6. ज्यांच्याकडे स्वतचे ८० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु १०० पेक्षा कमी मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा ४ नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.
  7. ज्यांच्याकडे स्वतचे १०० किंवा त्यापेक्षा अधिक मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा ५ नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.
  8. ज्यांच्याकडे स्वत: च्या २० मेंढया व १ मेंढानर अशा एकूण २१ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ४० मेंढ्यापेक्षा कमी अशा मेंढ्याच्या एका ठिकाणी राहून स्थायी स्वरूपाचे मंढी पालनासाठी पायाभूत सोई – सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थायी).
  9. ज्यांच्याकडे स्वतः च्या २० मेंढ्या व १ मेंढानर अशा एकूण २१ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ४० मेंढ्यापेक्षा कमी अध्था मेंढ्यांच्या स्थलांतरीत स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थलांतरीत).
  10. ज्यांच्याकडे स्वतः च्या ४० मेंढ्या व २ मेंढानर अशा एकूण ४२ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक अशा मॅक्यांच्या एका ठिकाणी राहून स्थापी स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थायी).
  11. ज्यांच्याकडे स्वतः च्या ४० मेंढ्या व २ मेंढानर अशा एकूण ४२ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक अशा मेंढ्यांच्या स्थलांतरीत स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थलांतरीत).
  12. एका ठिकाणी राहून स्थायी स्वरूपाचे मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थायी) (१०० ग्रॅम प्रती दिन प्रती मेंढी याप्रमाणे माहे एप्रिल ते जुलै या ४ महिन्याच्या कालावधी करिता).
  13. भटकंती करणारे स्थलांतरीत स्वरूपाच्या मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थलांतरीत) (१०० ग्रॅम प्रती दिन प्रती मेंढी पाप्रमाणे जून ते जुलै या २ महिन्याच्या कालावधी करिता).
  14. कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचा मुरघस करण्याकरिता घासड्या बांधण्याचे पंत्र (Mini Sailage Baler cum Wrapper) खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान वाटप.
  15. पशुखाद्या कारखाने उभारणीसाठी ५०% अनुदान वाटप.
मेंढ्यासाठी चराई अनुदान:

राज्यातील भटक्या जमाती-क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील मेंढपाळ कुटूंबांना राज्यस्तरीय योजनेंतर्गत माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमाह रु. ६०००/- असे एकूण रु. २४०००/- चराई अनुदान.

लाभार्थी निवडीचे निकष / अटी व शर्ती :-

१. सदर योजनेचा लाभ राज्य शासनाने वेळोवेळी अधिसूचित केलेल्या केवळ भटक्या जमाती (भज-क) या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजामधील ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान २० मेंढया व १ मेंढानर असलेल्या मेंढपाळ कुटुंबातील एका व्यक्तीस लाभ घेता येईल.

२. लाभधारकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसावे व ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.

३. लाभधारकांची निवड करताना, महिलांकरिता ३०% व दिव्यांगाकरिता ३% आरक्षण देण्यात यावे.

४. लाभार्थ्यास आधार कार्ड सोबत संलग्न करण्यात यावे.

५. अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवा निवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी/ लोकप्रतींनिधी नसावा.

योजनेचा उद्देश :-

१. राज्यातील मेंढपाळ कुटुंबांना पावसाळ्यात चराई करिता जून ते सप्टेंबर या ४ महिन्याच्या कालावधीमध्ये चराई अनुदान देऊन या व्यवसायास चालना देणे.

२. राज्यातील मेंढ्यांच्या संख्येमध्ये सातत्याने होत असलेली घट थांबविणे किंबहुना त्यामध्ये वाढ करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

३. राज्यातील मेंढीपालन व्यवसायास चालना देऊन ग्रामीण रोजगार निर्मिती करणे.

योजनेची वैशिष्टे :-

१. मेंढी पालन व्यवसाय हा पुर्णपणे स्थलांतरित पध्दतीने केला जातो. मेंढपाळ त्यांच्या मेंढ्याकरिता चारा व पाण्याच्या शोधात साधारणपणे माहे ऑक्टोबर पासून भटकंती करीत असतात. भटकंती काळात मेंढपाळ त्यांच्या मेंढ्याकरिता चारा व पिण्याचे पाण्याच्या शोधात सतत स्थलांतरण करत असतात. पावसाळी हंगामामध्ये मुळस्थानी मेंढपाळ परत आल्यानंतर त्या भागामध्ये पाऊस फार अत्यल्प होत असल्यामुळे चारा उपलब्ध होत नाही.

२. जुन ते ऑक्टोबर या काळात मेंढपाळ नजीकच्या स्थानिक ठिकाणी, नदी किनारी, शेतकर्‍यांच्या बांधावर तसेच नजीकच्या वन क्षेत्रावर त्यांच्या मेंढ्यांची चराई करीत असतात. हल्लीच्या काळामध्ये शेतकरी शेतामध्ये तणनाशक तसेच कीटकनाशक औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे. तसेच राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण सुरू असल्यामुळे बर्‍याच रसायन कंपण्यामधील कचरा पाणी नदी-नाल्यामध्ये सोडण्यात येते. त्यामुळे भटकंती काळात मेंढ्यांचा संपर्क या विषारी रसायनांसी आल्यामुळे विषबाधा होण्याचे प्रकार नेहमी घडत असतात. यामुळे मेंढपाळांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. दिवसेंदिवस ही समस्या वाढत असल्यामुळे या कालावधी मध्ये त्यांच्या मेंढ्यांना चारा उपलब्ध करणेकरिता मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे चराई करिता शासनाकडून अर्थ सहाय्य उपलब्ध झाल्यास त्यांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

प्राथमिक निवड झाल्यानंतर सादर करावयाचे कागदपत्रे –

१) जातीचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याचा)
२) आधार कार्ड
३) रेशन कार्ड
४) बँक पासबुक
५) मेंढी पालन करण्याच्या पद्धतीबाबत संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र (बंधपत्र नमुना क्र. १ नुसार)
६) अपत्य स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. २ नुसार)
७) स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. ५)
८) दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)

मेंढी व शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान:

भटक्या जमाती-क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील भूमीहीन मेंढपाळ कुटुंबासाठी राज्यस्तरीय योजनेंतर्गत अर्ध बंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरीता जागा खरेदीसाठी किंवा ३० वर्षाच्या भाडे करारावर जमीन भाड्याने घेण्यासाठी अनुदानस्वरुपात एकवेळचे एकरकमी अर्थसहाय्य.

लाभार्थी निवडीचे निकष / अटी व शर्ती :-

१. सदर योजना राज्य शासनाने वेळोवेळी अधिसुचित केलेल्या केवळ भटक्या जमाती (भज-क) या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीमधील ज्या मेंढपाळ कुटुंबांच्या मालकी हक्काची महाराष्ट्र राज्यात कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही प्रकारची शेतजमिन नाही अशा भुमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास (पुरूष किंवा स्त्री) या योजनेचा लाभ घेता येईल.

२. लाभधारकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.

३. लाभधारकांची निवड करताना, महिलांकरिता ३०% व दिव्यांगाकरिता ३% आरक्षण देण्यात यावे.

४. लाभार्थ्यास आधार कार्ड सोबत संलग्न करण्यात यावे.

५. अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवा निवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी/ लोकप्रतींनिधी नसावा.

६. यापूर्वी पशूपालन संबंधीत योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

योजनेचा उद्देश :-

१. राज्यातील भटकंती करणाऱ्या धनगर व तत्सम समाजातील पशुपालकांना पारंपारिक पद्धतीने करित असलेल्या मेंढी/ शेळी पालन या व्यवसायापासून त्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करून देणे व त्याद्वारे त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत करणे.

२. राज्यामध्ये बंदिस्त शेळी/मेंढी पालन व्यवसायास चालना देणे.

३. मेंढीपालन व्यवसायामध्ये अर्धबंदिस्त किंवा बंदिस्त मेंढीपालन ही संकल्पना प्रभावीपणे राबविणे.

४. मेंढीपालनाचा पारंपारिक व्यवसाय असणाऱ्या समाजातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.

५. राज्यामधील शेळयांच्या संख्येमध्ये वाढ करून राज्याच्या कृषी व संलग्न क्षेत्रातील स्थुल उत्पन्न वाढीच्या दराचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करणे.

६. स्थायी स्वरूपाच्या ठाणबंद पद्धतीने मेंढीपालन करण्यासाठी पशुपालकांना आकर्षित करून त्यांना स्थैर्य निर्माण करून देणे.

७. राज्यातील मेंढयांच्या संख्येमध्ये सातत्याने होत असलेली घट थांबविणे किंबहुना त्यामध्ये वाढ करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

८. राज्यातील मेंढीपालन व्यवसायास चालना देऊन ग्रामीण रोजगार निर्मिती करणे.

योजनेचे स्वरूप :-

१. सदर योजना राज्य शासनाने वेळोवेळी अधिसुचित केलेल्या केवळ भटक्या जमाती (भज-क) या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीमधील ज्या मेंढपाळ कुटुंबांच्या मालकी हक्काची महाराष्ट्र राज्यात कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही प्रकारची शेतजमिन नाही अशा भुमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास (पुरूष किंवा स्त्री) या योजनेचा लाभ देय असेल.

२. या योजनेमध्ये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून भुमिहीन मेंढपाळ कुंटुंबासाठी अर्ध बंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरिता किमान १ गुंठा जागा खरेदी करण्यासाठी जागेच्या किंमतीच्या ७५% अथवा किमान ३० वर्षासाठी भाडेकरारावर जागा घेण्यासाठी भाडयापोटी द्यावयाच्या रक्कमेच्या ७५% रक्कम एकवेळेचे एकरकमी अर्थसहाय्य म्हणुन कमाल रु. ५०,०००/- एवढे अनुदान वाटप करणे.

३. सदर योजनेमध्ये ७५% हिस्सा राज्य शासनाचा व २५% हिस्याची रक्कम लाभार्थ्यांने उभारणे आवश्यक आहे.

४. २० मेंढया/शेळया व १ मेंढानर/बोकड एवढे पशुधन संगोपन करण्याकरिता सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे जागेची आवश्यकता असते.

२० + १ मेंढी / शेळी गटासाठी शेड बांधकाम

I. २१ प्रौढ मेंढया/शेळयांसाठी १० चौ. फुट प्रमाणे २१० चौ. फुट
II. २० कोकरांसाठी प्रत्येकी ५ चौ. फुट प्रमाणे १०० चौ. फुट

एकुण बांधकाम ३१० चौ. फुट

मोकळया जागेस कुंपण उभारणी

I. २१ प्रौढ मेंढया/शेळयांसाठी २० चौ. फुट प्रमाणे ४२० चौ. फुट
II. २० कोकरांसाठी प्रत्येकी ५ चौ. फुट प्रमाणे १०० चौ. फुट

एकुण ५२० चौ. फुट क्षेत्रास कुंपण

५. २० मेंढया / शेळया व १ मेंढानर / बोकड एवढे पशुधन संगोपन करण्याकरिता एकुण शेड बांधकामाकरिता ३१० चौ. फुट व ५२० चौ. फुट क्षेत्रास कुंपण असे एकुण ८३० चौ. फुट जागेची तसेच चाऱ्याची साठवणुक करण्याकरिता लागणारी जागा विचारात घेऊन साधारणपणे १००० चौ. फुट म्हणजेच १ गुंठा जागा पुरेशी आहे.

प्राथमिक निवड झाल्यानंतर सादर करावयाचे कागदपत्रे –

१) अर्जदार स्वत:च्या तसेच त्याच्या कुटुंबाच्या इतर सदस्याच्या नावाने जमीन नसल्याबाबत सक्षम प्राधीकाऱ्याचे प्रमाणपत्र (भूमिहीन प्रमाणपत्र)
२) जातीचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याचा)
३) आधार कार्ड
४) रेशन कार्ड
५) बँक पासबुक
६) मेंढी पालन करण्याच्या पद्धतीबाबत संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र (बंधपत्र नमुना क्र. १ नुसार)
७) अपत्य स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. २ नुसार)
८) स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. ५)
९) दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)

कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान :

ग्रामीण परिसरातील कुक्कुट पालनास चालना देणेसाठी भटक्या जमाती (क) या प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीसाठी ७५ टक्के अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारीत देशी प्रजातीच्या १०० कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अर्थसहाय्य.

लाभार्थी निवडीचे निकष / अटी व शर्ती :-

१. लाभार्थी हा भटक्या जमाती (क) या धनगर व तत्सम जमाती प्रवर्गातील जात प्रमाणपत्र धारण करणारा व १८ ते ६० या वयोगटातील असावा.

२. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात यावा.

३. परसातील कुक्कुटपालनासाठी निवडलेल्या लाभार्थ्याकडे स्वतःची पुरेशी जागा असावी.

४. लाभार्थी निवडताना भटक्या जमाती – क या प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीतील ३० टक्के महिला व ३ टक्के दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात यावे.

५. व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी महामंडळ यांनी सदर योजनेचे सनियंत्रण करावे व योजनेची प्रसिद्धी करावी.

६. अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवा निवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी/ लोकप्रतींनिधी नसावा.

प्राथमिक निवड झाल्यानंतर सादर करावयाचे कागदपत्रे –

१) जातीचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याचा)
२) आधार कार्ड
३) रेशन कार्ड
४) बँक पासबुक
५) परसातील कुक्कुटपालनासाठी अर्जदाराकडे स्वत:ची पुरेशी जागा असल्याबाबत संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र (बंधपत्र नमुना क्र. ६ नुसार)
६) अपत्य स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. २ नुसार)
७) स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. ५)
८) दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)

ऑनलाईन अर्ज (Apply Online Mahamesh Yojana):

महामेष वेबपोर्टल (Mahamesh Portal): महामेष योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

महामेष ऍप (Mahamesh App): महामेष ऍप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

महामेष (Mahamesh Yojana) योजनेचे वेळापत्रक:

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ सप्टेंबर २०२४ रात्री १२ वाजेपर्यंत असणार आहे.

  • महामेष (Mahamesh Yojana) योजनेच्या अर्जामध्ये २६ सप्टेंबर २०२४ या तारखेपर्यंत आपल्याला बदल करता येईल.
  • अर्जाची पावती/प्रत काढण्याची सुविधा २६ सप्टेंबर २०२४ नंतर उपलब्ध करून देण्यात येईल.
  • अर्जदारास अर्जाची पावती अर्ज करण्याची तारीख संपल्या नंतर महामेष (Mahamesh Yojana) योजनेच्या वेबसाईट वरून डाउनलोड करता येईल.

प्राथमिक निवड:

शीर्षकचालु दिनांकसमाप्त दिनांक
प्राथमिक निवड३० सप्टेंबर २०२४०४ ऑक्टोबर २०२४

निवड झालेल्या अर्जदारांची कागदपत्रे अपलोड

शीर्षकचालु दिनांकसमाप्त दिनांक
निवड झालेल्या अर्जदारांची कागदपत्रे अपलोड०७ ऑक्टोबर २०२४१४ ऑक्टोबर २०२४

कागदपत्रांची पडताळनी

शीर्षकचालु दिनांकसमाप्त दिनांक
कागदपत्रांची पडताळनी१६ ऑक्टोबर २०२४२१ ऑक्टोबर २०२४

अंतिम निवड

शीर्षकचालु दिनांकसमाप्त दिनांक
अंतिम निवड२३ ऑक्टोबर २०२४२५ ऑक्टोबर २०२४

महामेष (Mahamesh Yojana) लाभार्थी निवड समितीमार्फत प्राथमिक निवड प्रक्रियेनंतर, प्राथमिक निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी स्वतंत्र विंडो देण्यात येईल.

महामेषच्या (Mahamesh Yojana) सर्व योजनांसाठी लागणारे आवश्यक बंधपत्रांचे नमुने: महामेषच्या (Mahamesh Yojana) सर्व योजनांसाठी लागणारे आवश्यक बंधपत्रांचे नमुने डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

मार्गदर्शक सूचना : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना (Mahamesh Yojana) राबविणे बाबत मार्गदर्शक सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

महामेष (Mahamesh Yojana) योजनेचे लक्षांक यादी: महामेष (Mahamesh Yojana) योजनेचे लक्षांक यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेल्पलाइन: 020 2565 7112 / 8308584478, 1962  ईमेल– mahameshyojana2024@gmail.com / mahameshtechhelp@gmail.com

महामेष (Mahamesh Yojana) योजने संदर्भात अडचण असल्यास आपल्या जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्याशी संपर्क साधावा ! संपर्क क्रमांक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – महामेष (Mahamesh Yojana) योजनेत बदल; मेंढपाळ लाभार्थींच्या रक्कम थेट खात्यात जमा होणार ! शासन निर्णय जारी

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “महामेष योजना : शेळी मेंढ्यांसाठी चराई, पालानाकरिता १ गुंठा जागा खरेदी अनुदान व कुकूट पालन अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरु !

  • मेंढी पालन योजने साठी जमीन नवावर असने अवशेख करावे

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.