आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी कामेसरकारी योजना

जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन मोबाईल ॲपद्वारे कसे काढायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!

ज्येष्ठ नागरिक आणि इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी बँकेत जाऊन प्रत्यक्ष जीवन प्रमाणपत्र Life Certificate (Jeevan Pramaan) सादर करणे अत्यंत अवघड असते. भारत सरकारने अशा निवृत्ती वेतनधारकांसाठी आधार-आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरून जीवन प्रमाण पोर्टलला भेट देऊन किंवा त्यांच्या स्मार्टफोनवर जीवन सन्मान ॲप डाउनलोड करून डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्याची तरतूद केली आहे.

लाभार्थ्याला त्याच्या पेन्शन खात्यात पेन्शन मिळत राहण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र द्यावे लागते. वृद्ध किंवा आजारी पेन्शनधारकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकेला भेट देणे कधीकधी कठीण होऊ शकते. सरकारने यावर उपाय शोधून काढला आहे आणि डिजिटल लाइफ सर्टिफिकेट किंवा जीवन प्रमाण सादर केले आहे.

पात्रता:

एखादी व्यक्ती खालील पात्रता निकषांची पूर्तता करत असल्यास जीवनप्रमाणच्या सुविधांचा लाभ घेऊ शकते:

  • कर्मचारी पेन्शनधारक असावा.
  • कर्मचारी निवृत्त सरकारी कर्मचारी असावा (केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा इतर सरकारी संस्था).
  • त्याच्याकडे वैध आधार क्रमांक असावा.
  • आधार क्रमांक पेन्शन वितरण संस्थेकडे नोंदणीकृत असावा.

जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन मोबाईल ॲपद्वारे काढण्याची प्रोसेस – Life Certificate (Jeevan Pramaan):

जीवन प्रमाणपत्र Life Certificate (Jeevan Pramaan) आपल्या मोबाईलद्वारे काढण्यासाठी सर्वप्रथम Jeevan Pramaan ॲप डाउनलोड करून ऑपरेटर (Operator Registration) नोंदणी करून पेन्शनर ओळख (Pensioner Identifacation) तपशील भरायचा आहे.

१) ऑपरेटर नोंदणी – Operator Registration:

जीवन प्रमाणपत्र आपल्या मोबाईलद्वारे काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला Jeevan Pramaan ॲप डाउनलोड करायचे आहे.

जीवन प्रमान ॲप डाउनलोड : (Jeevan Pramaan App Download) :

जीवन प्रमान ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा किंवा गुगल प्लेस्टोअर वर “Jeevan Pramaan” सर्च करून हे ॲप डाऊनलोड करावे.

डाउनलोड झाल्यानंतर कोणता एर्रोर प्रॉब्लेम आला तर आपल्या मोबाईल मध्ये अजून एक ॲप असणे गरजेचे आहे ते म्हणजे AadhaarFaceRD हे ॲप डाउनलोड करून ठेवायचे आहे.

आधार फेस आरडी ॲप डाउनलोड : (AadhaarFaceRD App Download) :

आधार फेस आरडी ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा किंवा गुगल प्लेस्टोअर वर “AadhaarFaceRD” सर्च करून हे ॲप डाऊनलोड करावे पुन्हा Jeevan Pramaan ॲप ओपन करायचे आहे.

ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम Device Registration & Operator Identifacation यामध्ये तुम्हाला स्वतःची माहिती टाकायची आहे कारण आपण स्वतः दुसऱ्यांचे जीवन प्रमाणपत्र काढून देणार आहोत, तर तिथे तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर, व इमेल आयडी टाकून Send OTP वरती क्लिक करायचे आहे. मोबाईल वरील OTP टाकून Submit बटनावरती क्लिक करायचे आहे.

पुढे Operator Name विचारलं जाईल तिथे आपले नाव टाकायचे आहे व Accept वर क्लिक करून Scan पर्यायावरती क्लिक करायचे आहे. Scan आपण दोन पर्यायाने करू शकता Face RD द्वारे आणि Finger Print च्या मदतीने, तर आपण Face RD द्वारे आपल्या कॅमेराद्वारा सेल्फी घेऊन Operator Registration पूर्ण होईल.

२) पेन्शनर ओळख तपशील – Pensioner Identifacation:

ऑपरेटर नोंदणी झाल्यानंतर आपल्याला Pensioner Identifacation करायचे आहे, त्यासाठी ज्या व्यक्तीचे आपल्याला जीवन प्रमाणपत्र काढायचे आहे त्याची माहिती इथे टाकायची आहे, त्यामध्ये त्यांचा आधार नंबर, मोबाईल नंबर, व इमेल आयडी टाकून Send OTP वरती क्लिक करायचे आहे. मोबाईल वरील OTP टाकून Submit बटनावरती क्लिक करायचे आहे.

पुढे त्या ग्राहकाचा तुम्हाला PPO No. दिसेल तसेच इतरही माहिती दिसेल ते चेक करून Next पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर सर्व माहिती दाखवली जाईल ती माहिती Preview करून Accept करून Submit बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर ग्राहकाचे Face RD द्वारे फोटो काढून Scan करून Pensioner Registration पूर्ण होईल.

त्यानंतर तुम्हाला ग्राहकाचा प्रमाण आयडी व PPO No. असेल तो लिहून ठेवायचा आहे.

जीवन प्रमाणपत्र डाउनलोड कसे करायचे ? Life Certificate (Jeevan Pramaan) Download:

जीवन प्रमाणपत्र Life Certificate (Jeevan Pramaan) डाउनलोड करण्यासाठी खालील पोर्टलला भेट द्या.

https://jeevanpramaan.gov.in/ppouser/login

पोर्टल ओपन केल्यानंतर तुम्हाला प्रमाण आयडीकॅप्चा कोड टाकून Generate OTP वरती क्लिक करायचे आहे.

त्यानंतर OTP टाकून लॉगिन बटनावरती क्लिक करायचे आहे. पुढे तुम्हाला जीवन प्रमाणपत्र दिसेल ते Click Here या पर्यायावरती क्लिक करून डाउनलोड करू शकता.

संपर्क : 1800 111 555 / ईमेल : jeevanpramaan@gov.in

खालील लेख देखील वाचा!

  1. ‘आपली पेन्शन आपल्या दारी’ योजना !
  2. जीवन प्रमाणपत्र : पात्रता, नोंदणी आणि जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड करण्याची प्रोसेस!
  3. या ५ योजनांचे ऑफलाईन/ऑनलाईन अर्ज आता ग्रामपंचायत मध्ये ही भरता येणार – विशेष सहाय्य योजनेच्या निकषात सुधारणा.
  4. घरबसल्या घ्या विविध सरकारी सेवांचा ऑनलाईन लाभ!
  5. निवृत्तिवेतनासंबंधीचे बँकींग व्यवहार हाताळण्यामध्ये येणा-या अडचणी दूर करणेसाठी कार्यपध्दती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.