पीएफ सदस्याचे सदस्य प्रोफाइल अपडेट किंवा त्यात सुधारणा करण्यासाठी ऑनलाइन फाइलिंगसाठी नवीन सॉफ्टवेअर कार्यप्रणालीचा प्रारंभ !
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही ग्राहकांची संख्या आणि आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत जगातील सर्वात मोठ्या सामाजिक सुरक्षा संघटनांपैकी एक आहे. सध्या, सुमारे 7.5 कोटी सदस्य प्रत्येक महिन्याला भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन आणि विमा योजनांमध्ये सक्रिय योगदान देत आहेत. या आर्थिक वर्षाच्या केवळ पहिल्या 2 महिन्यांत सामाजिक सुरक्षा फायद्यांच्या स्वरूपात सुमारे 87 लाख दावे निकाली काढण्यात आले आहेत. यामध्ये गृहनिर्माण, मुलांचे महाविद्यालयीन शिक्षण, विवाह, आजारपण, अंतिम भविष्य निर्वाह निधी सेटलमेंट्स, निवृत्तीवेतन, विमा इ. चा समावेश आहे.
सदस्यांना या फायद्यांचा ऑनलाइन दावा करता येतो. हे एका मजबूत संगणक सॉफ्टवेअर ऍप्लिकेशनमुळे शक्य झाले आहे. हे सॉफ्टवेअर युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) द्वारे सदस्याचा डेटा प्रमाणित करते. सदस्यांच्या प्रोफाइलमधील डेटाची सत्यता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे 22 ऑगस्ट 2023 रोजी जारी मानक ऑपरेटिंग प्रक्रियेद्वारे सुनिश्चित केली जात आहे.
आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाद्वारे ते डिजिटल ऑनलाइन प्रणालीमध्ये कार्यान्वित केले आहे. सदस्य आपली संबंधित विहित कागदपत्रे अपलोड करून नाव, लिंग, जन्मतारीख, पालकांचे नाव, वैवाहिक स्थिती, राष्ट्रीयत्व, आधार क्रमांक इत्यादी बदल किंवा सुधारणा सदस्य डेटामध्ये करण्याची विनंती करू शकतात.
सदस्यांनी या नवीन सुविधेचा वापर करून त्यांच्या विनंत्या दाखल करण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी सुमारे 40,000 विनंतीपत्रे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या क्षेत्रीय कार्यालयांनी आधीच मंजूर केले आहेत. संघटनेला आतापर्यंत अशा सुमारे 2.75 लाख विनंत्या प्राप्त झाल्या आहेत.
योग्य केवायसी आणि जुळणारे सदस्य प्रोफाइल, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला कोणत्याही कार्यालयात प्रत्यक्ष भेट न देता , सदस्यांना ॲडव्हान्सचे ऑटो सेटलमेंट, पीएफ खात्याचे ऑटो ट्रान्सफर, ई-नामांकन इत्यादी तत्काळ सेवा प्रदान करण्यास मदत करते.
हेही वाचा – आपले ईपीएफ पासबुक (EPF Passbook) कसे डाउनलोड करावे? जाणून घ्या सविस्तर माहिती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!