लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारचे बॅंकांना महत्वाचे आदेश !
राज्य सरकारतर्फे राबवली जाणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतंर्गत जुलै – ऑगस्ट या महिन्यांच्या तीन हजार रुपयांची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. मात्र, लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होताच अनेकांना काढता येईनाशी झाली. तसेच कर्जाच्या थकीत हफ्त्यांमधून वसूल होत असल्याने रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे कापू नका असे आदेश (Ladki Bahin Yojana State Orders Banks) राज्य सरकारने बॅंकांना दिले आहेत.
लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारचे बॅंकांना महत्वाचे आदेश ! Ladki Bahin Yojana State Orders Banks:
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून माहे जुलै, २०२४ व माहे ऑगस्ट, २०२४ या दोन्ही महिनांच्या एकत्रित रु. ३०००/- इतका आर्थिक लाभ अंतिम पात्र लाभार्थी महिलांना त्यांचा आधार संलग्न (Aadhar Seeded) बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने (DBT) अदा करण्यात आला आहे.
तथापि, सदर योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना प्राप्त झालेला आर्थिक लाभ आहरित करता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरी “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत आर्थिक लाभ अंतिम पात्र लाभार्थी महिलांना प्राप्त होण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे (Ladki Bahin Yojana State Orders Banks) सूचना देण्यात येत आहेत:
१) “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेतून हस्तांतरित केलेले आर्थिक लाभ (रक्कम) कोणत्याही थकित कर्जाच्या बदल्यात समायोजित केले जाऊ नये, ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ती इतर कर्ज समायोजनासाठी वापरता येणार नाही.
२) सदर रक्कम त्याच्या खात्यात वर्ग केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देण्यात येऊ नये.
३) काही लाभार्थ्याकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठविण्यात आले असल्यास सदर बैंक खाते तात्काळ सुरु करण्यात यावे व या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना प्राप्त होणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात यावी.
हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक : १८१ (महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र)
आदेशाची प्रत : लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारचे बॅंकांना दिलेल्या (Ladki Bahin Yojana State Orders Banks) आदेशाची प्रत पाहण्यासाठ येथे क्लिक करा.
खालील लाडकी बहीण योजनेच्या संबंधीत महत्वपूर्ण लेख वाचा !
- मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना; असा भरा वेबपोर्टल वरून ऑनलाईन अर्ज !
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजेनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस!
- लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
- मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना : रद्द झालेले अर्ज, दुरुस्तीसह पुन्हा दाखल करण्याचे आवाहन, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया !
- लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यामध्ये आले नाही तर हे काम करा !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!