वृत्त विशेषसरकारी योजना

रक्षाबंधनाच्या दिवशी खात्यात जमा होणार ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे; दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार!

लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. यासंदर्भात आता स्वत: अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम रक्षाबंधनाला लाभार्थी महिलांना मिळणार आहे. राज्यसरकारकडून महिलांना राखीची भेट दिली जाणार आहे. महाराष्ट्र सरकारकडून ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची (Ladki Bahin Yojana Installment update) घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत महिलांना दरमाहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. आता अनेक महिलांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

आता या योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार? याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं आहे. अजित पवार यांनी या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात कधी जमा होतील, याबाबतही भाष्य केलं. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून आम्ही या योजनेचे पैसे रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा करण्याचा विचार केला आहे. १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. त्या दिवशी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं अजित पवार यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजना काय आहे?

राज्य सरकारने यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहिना १५०० रुपये देण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केलं आहे. राज्यातील सुमारे एक कोटी महिलांना याचा लाभ होणार आहे. तसेच या योजनेची अंमलबजाणी जुलै महिन्यापासून केली जाणार आहे. त्यासाठी सरकारने ४६ हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतदूही केली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकानं जाहीर केलेली योजना आहे. जर तुम्ही अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल, तर अजूनही अर्ज करण्याची मुदत संपलेली नाही. तुम्ही अर्ज करू शकता. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमाहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच, प्रतिवर्ष 18 हजार रुपये मिळणार आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेचे निकष काय? 
  • महाराष्ट्र रहिवासी
  • विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
  • 60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
अपात्र कोण असेल?
  • 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
  • घरात कोणी Tax भरत असेल तर
  • कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
  • कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
  • कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर (ट्रॅक्टर सोडून)
कोणती कागदपत्रं लागणार? 
  • आधारकार्ड
  • रेशनकार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक
  • अर्जदाराचा फोटो
  • अधिवासाचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र
  • लग्नाचे प्रमाणपत्र

योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपवर/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरलं जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.

ऑनलाईन अर्ज (Apply Online CM Majhi Ladki Bahin Yojana): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑफलाईन अर्ज नमुना PDF फाईल : माझी लाडकी बहीण योजनेचा ऑफलाईन अर्ज नमुना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय:

  1. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण – CM Majhi Ladki Bahin Yojana योजना सुरु करण्यास मान्यता देण्याबाबत (दि. २८ जून २०२४) चा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  2. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणाबाबत (दि. ३ जूलै २०२४) चा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  3. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबत (दि. १२ जूलै २०२४) चा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा – ‘लाडकी बहीण योजने’साठी अर्ज करण्यास मुदतवाढ; योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना देण्यासाठी निकष शिथिल !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “रक्षाबंधनाच्या दिवशी खात्यात जमा होणार ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे; दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार!

  • Diksha Dhanraj Sonwane

    At-sonale Post -paldhi Tal -jamner Dist -jalgoan

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.