आपले सरकार - महा-ऑनलाईनमहिला व बाल विकास विभागवृत्त विशेषसरकारी योजना

लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !

लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार याबाबत अनेक महिलांच्या मनात संभ्रम होता, परंतु जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम रक्षाबंधन पुर्वीच लाभार्थी महिलांना मिळाली आहे. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांनी अर्ज केलेले आहेत तरी त्यांनी आपल्या अर्जाचे स्टेट्स (Ladki Bahin Yojana Beneficiary Status) चेक करणे गरजेचं आहे. लाडकी बहीण योजनेचे अर्ज अनेकांनी नारीशक्ती दूत ॲप व वेबपोर्टल वरून केले आहेत.

लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !

या योजनेंतर्गत महिलांना दरमहा १५०० हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच वर्षाचे १८,००० मिळणार आहेत. आता अनेक महिलांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु अर्जाची स्थिती (Ladki Bahin Yojana Beneficiary Status) काय आहे हे कसे चेक करायचे किंवा आपला अर्ज मंजूर झाला आहे का ? हे कसे पाहायचे ते आपण आज या लेखा मध्ये पाहणार आहोत.

नारीशक्ती दूत ॲप वरून अर्जाचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा – Ladki Bahin Yojana Beneficiary Status check:

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचे (Ladki Bahin Yojana Beneficiary Status) स्टेटस ऑनलाईन चेक करण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करून किंवा गुगल प्ले-स्टोअरवरून ‘नारीशक्ती दूत – Narishakti Doot’ असे सर्च करून हे ॲप डाऊनलोड करा किंवा Narishakti Doot ॲप अगोदरच मोबाईल मध्ये असेल तर ते अपडेट करा.

https://play.google.com/store/apps/Narishakti-Doot

‘नारीशक्ती दूत – Narishakti Doot ॲप इन्स्टॉल झाल्यावर ओपन करा; त्यानंतर ज्या महिलेचा अर्जाचे स्टेटस चेक करायचे आहे, त्या महिलेचा मोबाईल क्रमांक टाकून लॉगीन करा.

पुढे ज्या मोबाईल क्रमांकाने तुम्ही लॉगीन केलं, त्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला OTP येईल. तो OTP दिलेल्या बॉक्समध्ये टाकून ‘Verify OTP’ या पर्यायावर क्लिक करा.

लॉगिन केल्यानंतर खालील यापूर्वी केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकता, त्यासाठी केलेल्या अर्जावर क्लिक करा.

अर्ज ओपन झाल्यावर वरती आपल्याला ४ पर्याय दिसतील त्यामध्ये sms verification done, (i) सर्कल मध्ये आय आयकॉनचा सिम्बॉल दिसेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना In Pending to submitted, edit Form हे पर्याय दिसतील.

Ladki Bahin Yojana Beneficiary Status
Ladki Bahin Yojana Beneficiary Status

जर वरील पर्याय आपल्या मोबाईल मध्ये दिसत नसतील तर Narishakti Doot ॲप अपडेट करा किंवा डिलीट (Uninstalled) करून पुन्हा इंस्टाल करा.

वरील चित्रामध्ये Pending to submitted असे दाखवत आहे म्हणजेच  “सर्वेक्षण अर्ज भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही. अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे.”

तुम्हाला खालील पैकी अर्जाचे (Ladki Bahin Yojana Beneficiary Status) स्टेट्स दाखवत असेल तर त्याचा अर्थ समजून घेऊ.

  • Pending to submitted – म्हणजेच सर्वेक्षण अर्ज भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही. अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे.
  • Approved – म्हणजेच सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे. सबमिटरकडून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही.
  • In Review – म्हणजेच सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनकर्त्यांद्वारे मूल्यांकन केले जात आहे. सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे.
  • Rejected – म्हणजेच सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही. हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही.
  • Disapproved – Can Edit and Resubmit – म्हणजेच सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे.

अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana Beneficiary Status) अर्जाचे स्टेट्स ऑनलाईन चेक करू शकता, जर तुम्हाला अर्ज चुकला आहे अशी शंका असेल किंवा काही माहिती अपडेट करायची असेल तर अर्ज तुम्ही edit Form या पर्यायवर क्लिक करून अपडेट करा.

वेबपोर्टल वरून अर्जाचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा – Ladki Bahin Yojana Beneficiary Status check:

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचे (Ladki Bahin Yojana Beneficiary Status) स्टेटस वेबपोर्टल वरून ऑनलाईन चेक करण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करून पोर्टल ओपन करा व लॉगिन करा.

https://ladakibahin.maharashtra.gov.in/

लॉगिन झाल्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती (Status) जाणून घेऊ शकता.

तुम्हाला खालील पैकी अर्जाचे (Ladki Bahin Yojana Beneficiary Status) स्टेट्स वेबपोर्टलवर दाखवत असेल तर त्याचा अर्थ समजून घेऊ.

  • Pending – म्हणजेच सर्वेक्षण अर्ज भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही. अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे.
  • Approved – म्हणजेच सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे. सबमिटरकडून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही.
  • Rejected – म्हणजेच सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही. हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही.
  • Re-submit – म्हणजेच सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, परंतु अर्जामध्ये योग्य बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे.
अर्ज पुन्हा सबमिट करण्याची प्रक्रिया:

सर्व संबंधितांनी Disapproved असलेल्या सर्व लाभार्थ्यांना संपर्क करुन अंशतः अर्ज रद्द होण्याचे कारण View Reason या टॅबवर बघून त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन Edit Form टॅबवर जाऊन यापूर्वी केलेल्या नोंदी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करुन Form Submit करावा, यामध्ये फक्त Form एकदाच Edit करता येईल.

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलाय, पण पैसे आले नाही; मग असे करा !
  1. तुम्ही लाडकी बहीण पोर्टल किंवा नारीशक्ती अ‍ॅपवरुन अर्ज केला आहे. तो मंजूर झाला आहे. परंतु पैसे बँक खात्यात आले नाही. तर आपले बँक खाते आधारकार्डशी लिंक आहे की नाही? हे तपासून पाहा.
  2. बँक खाते आधारकार्डशी लिंक नसल्यास त्वरित लिंक करा. त्यानंतर तुमच्या खात्यात जुलैपासून मिळणारे पैसे जमा होतील.
  3. तुमच्या मोबाइलवर अर्जातील त्रुटीबाबत काही मेसेज आला आहे का ते पाहावे. त्यानंतर त्या त्रुटीची पुर्तता करुन अर्ज पुन्हा सबमिट करावा.
  4. आधार लिंक असलेल्या दुसऱ्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते देखील तपासून पहावे.

हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक : १८१ (महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र)

खालील लाडकी बहीण योजनेच्या संबंधित महत्वपूर्ण लेख वाचा !

  1. लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यामध्ये आले नाही तर हे काम करा !
  2. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना : रद्द झालेले अर्ज, दुरुस्तीसह पुन्हा दाखल करण्याचे आवाहन, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया !
  3. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजेनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस!
  4. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना; असा भरा वेबपोर्टल वरून ऑनलाईन अर्ज !
हेही वाचा – मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना : रद्द झालेले अर्ज, दुरुस्तीसह पुन्हा दाखल करण्याचे आवाहन, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.