कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी सुरु; असा करा ऑनलाईन अर्ज ! – Kusum Solar Pump Yojana Online Registration
‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना (Kusum Solar Pump Yojana) जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी कुसुम सौर कृषी पंप ऑनलाईन नोंदणी अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे.
अटल सौर कृषिपंप योजना-१ व २ आणि मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमध्ये लाभ घेतलेले शेतकरी महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब (Kusum Solar Pump Yojana) योजनेसाठी पात्र नाहीत. त्यामुळे त्यांनी महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरु नयेत.
तरी सुद्धा अर्ज भरल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल. महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब (Kusum Solar Pump Yojana) योजनेअंतर्गत एका लाभार्थी शेतकऱ्याने एकाच सौर कृषिपंपाकरीता अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास इतर अर्ज रद्द करण्यात येईल.
कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणीची प्रोसेस – Kusum Solar Pump Yojana Online Registration:
प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी खालील संकेतस्थळावर भेट दयावी.
https://www.mahaurja.com/meda/
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) पोर्टलला भेट दिल्या नंतर उजव्या महाकृषि ऊर्जा अभियान या बॉक्स मध्ये “महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी” लिंक वर क्लिक करा किंवा खालील थेट लिंक वर क्लिक करा.
https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B
नवीन ऑफग्रीड सौर पंप किंवा जुना डिझेल पंप सौर पंपाने बदलण्यासाठी नोंदणी अर्जामध्ये खालील प्रमाणे आपला आवश्यक तपशील भरायचा आहे.
कुसुम सौर कृषी पंप नोंदणी अर्ज भरल्या नंतर पुढे आपल्याला सौर कृषी पंपाचा उपलब्ध कोटा दाखवला जाईल, त्यानंतर १०० रुपये ऑनलाईन नोंदणी पेमेंट करायचे आहे.
कुसुम लाभार्थी लॉगिन:
कुसुम सौर कृषी पंप ऑनलाईन नोंदणी पेमेंट केल्यानंतर आपल्याला कुसुम लाभार्थी लॉगिनसाठी युजरनेम/अप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड दिला जाईल त्याने लॉगिन करून पुढील प्रकिया करायची आहे.
https://kusum.mahaurja.com/beneficiary
सर्व शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर कुसुम लाभार्थी लॉगिन मध्ये कागदपत्रे अपलोड करणे, पेमेंट करणे इत्यादी प्रकिया करण्यासाठी पर्याय उपलब्ध केले जातील.
कुसुम सौर कृषी पंप महाकृषी ऊर्जा अभियान गावांची यादी: महाराष्ट्र ऊर्जा विकास एजन्सी (MEDA) सुरक्षित गावांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
उपरोक्त योजनेअंतर्गत सौर कृषिपंपाचा लाभ घेतलेले शेतकरी सौर कृषिपंप काढून ठेवतात व लाभ घेतला नसल्याचे भासवून दुसरा सौर कृषिपंप महाकृषि ऊर्जा अभियन पीएम- कुसुम घटक-ब योजने अंतर्गत आस्थापित करुन घेतात. अशी बाब निदर्शनास आल्यास त्यांच्याकडील सौर कृषिपंप काढून घेण्यात येईल व त्यांनी भरलेली लाभार्थी हिस्सा रक्कम जप्त करण्यात येईल व अशा शेतकऱ्यांच्या विरुद्ध FIR करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
हेही वाचा – प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना; लाभार्थी हिस्सा भरणेबाबत सुधारित सुचना जारी
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
Kusum solar pump
Sangli OBC caste quota Kyon nahi diya.
Actual requirement in mountains area having no electricity zone.
CHALAN BHARLE JAT NAHI KRUPYA LAKSH DYAVE
Plz Contact Us PHONE -91-020-35000450 Email – meda@mahaurja.com
Solar pump