वृत्त विशेषमहाराष्ट्र जमीन महसूल कायदासरकारी कामे

कुळाची जमीन वर्ग-2 मधून वर्ग-1 कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !

आपण या लेखात कुळाची जमीन (Kulachi Jamin) वर्ग-2 मधून वर्ग-1 कशी करायची? याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. जमीन मालकांच्या पिळवणुकीपासून कुळांचं, त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी कुळ वहिवाट अधिनियम अस्तित्वात आला. सन 1939 च्या कुळ कायद्यानुसार सर्वप्रथम कायदेशीर कुळांची नावं सातबाऱ्यावर नोंदवली गेली. त्यानंतर मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, 1948 अस्तित्वात आला. 2012 साली याचं नाव बदलून ते ‘महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम’ असं करण्यात आलं.

कुळाची जमीन वर्ग-1 कशी होते? Kulachi Jamin:

कुळाच्या (Kulachi Jamin) जमिनीचं भोगवटादार वर्ग-2 मधून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतर करायचं असेल किंवा सातबारा उताऱ्यावरील संरक्षित किंवा कायम कुळ ही नोंद काढायची असेल तर तहसील कार्यालयात तहसिलदारांकडे अर्ज करता येतो. कारण तहसीलदार हे कुळाचं प्राधिकरण आहे.

अर्ज कसा करायचा आणि नजराणा किती भरायची याची माहितीही तुम्हाला तहसील कार्यालयात सांगितली जाईल. यासाठी कोणती कागदपत्रं लागतात, ते आता पाहूया.

आवश्यक कागदपत्रे:
  • संबंधित जमिनीचे 1960 पासूनचे सातबारा उतारे
  • या सातबारा उताऱ्यावरील सर्व फेरफार नोंदी
  • खासरापत्रक
  • कुळाचं प्रमाणपत्र
  • कुळाचं चलन
  • कुळाचा फेरफार

एकदा का अर्ज केला की, तलाठी मंडळ अधिकाऱ्याकडून रिपोर्ट मागवला जातो. या जमिनीसंबंधी कुणाला काही आक्षेप आहे का ते पाहण्यासाठी जाहीर प्रगटन दिलं जातं. संबंधित व्यक्तींना सुनावणीसाठी बोलावलं जातं.

सगळं व्यवस्थित असेल तर जवळपास 1 महिन्यांमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते आणि सातबारा उताऱ्यावरील कुळ (Kulachi Jamin) निघून जाऊन भूधारणा पद्धतीत वर्ग-2 च्या जागी, वर्ग-1 असं नमूद केलं जातं. म्हणजे जो अर्जदार आहे फक्त त्याच्याच जमिनीच्या हद्दीपर्यंत वर्ग-1 असं नमूद केलं जातं. म्हणजे गटाचा कुळ असेल तर संपूर्ण गटाच्या नावासमोर वर्ग-1 असं लावलं जात नाही.

कुळ कायद्यात आणखी सुधारणा होणार?
  • महसूली कायद्यांमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारनं सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची समिती गठीत केली आहे.
  • यातला एक कायदा हा, महाराष्ट्र कुळवहिवाट व (Kulachi Jamin) शेतजमीन अधिनियम-1948 हा आहे.
  • 25 ऑक्टोबर 2023 रोजी अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे.
  • आता ही समिती कुळ कायद्यात बदल करण्याबाबत शासनाकडे शिफारस करते का, करणार असेल तर नेमके कोणते बदल त्यात असतील, हे समितीची अहवाल शासनाला प्राप्त झाल्यानंतरच कळेल.

पुढील लेख देखील वाचा!

  1. कुळ कायदा म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर माहिती.
  2. कुळ कायदा आणि कुळाच्या जमिनीचा विक्री व्यवहार याबाबत सविस्तर माहिती !
  3. इनाम आणि वतन जमिनी बद्दल सविस्तर माहिती !
  4. सातबारा (7/12) वरील चुकांची दुरुस्ती कशी करावी? जाणून घ्या सविस्तर.
  5. भोगवटादार वर्ग-२ मधल्या कोणत्या जमिनींचे वर्ग-१ मध्ये रुपांतर होत व होत नाही?
  6. तलाठी कार्यालयातील गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती !
  7. सातबारा (7/12) उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
  8. कुटुंबातील सहमतीने करा १०० रुपयात जमिनीची वाटणी; जाणून घ्या सविस्तर माहिती !
  9. साठेखत म्हणजे काय? साठेखत करण्याचे फायदे काय आहेत?
  10. महसुली प्रकरणांच्या ‘अ’ आणि ‘ब’ फाईलींची सविस्तर माहिती !
  11. कुलमुखत्यारपत्र म्हणजे काय? कुलमुखत्यार पत्राची कायदेशीर नोंदणी करणे का आवश्यक आहे?

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.