कृषी कल्याण अभियान योजना : ८०% अनुदानावर कृषी औजारे बँक स्थापनेसाठी अर्ज सुरु
कृषी यांत्रिकीकरण उपविभाग अंतर्गत कृषी कल्याण अभियान योजना अंतर्गत कृषि औजारे बँक (Krushi Avajare Bank) स्थापन करण्यासाठी 10 लाख खर्चाची मर्यादा असून त्याकरिता 80 टक्के किंवा अनुदानाची उच्चत्तम मर्यादा 8 लाख यापैकी जी कमी असेल त्या मर्यादेपर्यंत अनुदान लाभार्थ्यांस डीबीटी प्रणालीद्वारे वितरीत करण्यात येईल.
लाभ घेण्यास इच्छुक शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांचे नोंदणीकृत गट, नोंदणीकृत शेतकरी बचत गट व विविध कार्यकारी संस्था यांनी विहित नमुन्यात अर्ज जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कार्यालया मार्फत संबंधित तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात अर्ज मागविण्यात येत आहेत.
कृषी कल्याण अभियान योजना; ८०% अनुदानावर कृषी औजारे बँक स्थापनेसाठी अर्ज सुरु! Krushi Avajare Bank:
योजनेंचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे,
- संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र,
- खरेदी करावयाच्या यंत्र/औजारे संचाचे दरपत्रक व प्रशिक्षण पुरावा.
- आधार कार्ड सलग्न बँक खात्याचा पासबुक च्या पहिल्या पृष्ठाची छायांकित प्रत,
- संस्थेच्या सबंधित व्यक्तीच्या बॅक खात्यातून अनुदान जमा करण्यास संस्थेने प्राधिकृत केले असल्यास प्राधिकृत केल्याचे पत्र
- सबंधित व्यक्तीचा आधार कार्ड/फोटो असलेल्या ओळख पत्राची स्वयंसाक्षांकित प्रत
- विहित नमुन्यातील अर्ज
वरील कागदपत्रे व अर्ज तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात संपूर्ण कागदपत्रासह सादर करावे व योजनेच्या अधिक माहिती साठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
विविध योजने अंतर्गत यंत्र, औजारे व सिंचन सुविधा या बाबीकरीता वैयक्तिक व गटाकरीता लाभ देण्यात येत आहे तरी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी या पोर्टल वर अर्ज करावे. व जिल्हयात नाविन्य पूर्ण बाबी खाली ड्रगन फ्रुट, काजू, स्ट्रोबेरी, हळद, आले, पाम, तैवान पेरु इत्यादी बाबी करीता इच्छुक नोंदणी कृत गटांनी अर्ज करावे.
योजनेची अधिक माहिती व मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध करुन देण्यात देण्यात येईल.
कृषि विभाग अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पुढील लेख देखील वाचा!
- सर्व शेतकरी योजना आता “महाडीबीटी शेतकरी मोबाईल अॅप” वर – MahaDBT Farmer App
- शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना – MahaDBT Portal Scheme
- महाडीबीटी योजना लाभार्थी यादी ऑनलाईन डाउनलोड करा ! MahaDBT Yojana Beneficiary List Download Online!
- महाडीबीटी पोर्टल वरील योजना प्रभावीपणे राबविणेबाबत परिपत्रक जारी – MahaDBT Portal Schemes.
- महाडीबीटी लॉटरी मध्ये निवड व पूर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!