खड्ड्यांच्या तक्रारीसाठी आता खड्डे तक्रार निवारण प्रणाली वर अशी करा तक्रार !
पावसाळ्यानंतर रस्त्यांमध्ये खड्डे पडतात. असे खड्डे जलद दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे तक्रार निवारण (Khadde Takrar Nivaran) प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता खड्डयांबाबतची तक्रार ऑनलाईन करता येणार आहे.
खड्ड्यांच्या तक्रारीसाठी आता खड्डे तक्रार निवारण प्रणाली वर अशी करा तक्रार ! Khadde Takrar Nivaran:
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचे संगणकीकारण करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यासोबतच खड्ड्यासाठी तक्रार प्रणाली (Khadde Takrar Nivaran) विकसीत केली आहे.
खड्डे तक्रार निवारण प्रणाली (Khadde Takrar Nivaran Website):
खड्डे तक्रार निवारण मोबाईल अँप (Khadde Takrar Nivaran App):
नागरिक खड्डे तक्रार निवारण (Khadde Takrar Nivaran) प्रणालीच्या माध्यमातून तक्रार करू शकतात. प्रथम PCRS अँप गुगल प्ले स्टोअर, केंद्र शासनाच्या m- Seva portal, किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे संकेतस्थळ www.mahapwd.gov.in या संकेतस्थळावरून मोबाईलवर डाउनलोड करावे.
नागरिकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या OTP चा वापर करावा आणि ॲप नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी रजिस्टर फीडबॅक येथे क्लिक करावे.

मोबाईल स्क्रीनवर नकाशा दिसेल. त्यामध्ये आपले लोकेशन निश्चित करून खड्ड्यांचा फोटो अपलोड करण्यासाठी ‘Take Pothol Photo’ या बटनावर क्लिक करावे.

त्यानंतर खड्ड्यांचा फोटो घेऊन सदर तक्रारीबाबत अभिप्राय नोंदवावा आणि शेवटी तक्रार दाखल करावी.
खड्डे तक्रार निवारण (Khadde Takrar Nivaran) प्रणालीमध्ये तक्रारीची सद्यस्थिती दाखवण्याची व्यवस्था आहे. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी तातडीने संबंधित शाखा अभियंता आणि उपअभियंता यांच्याकडे पाठवण्यात येतील. या माध्यमातून खड्डेमुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने सार्वजनिक बांधकाम (PWD Maharashtra PCRS) विभागाने उचललेले महत्वाचे पाऊल आहे.
या लेखात, आम्ही खड्ड्यांच्या तक्रारीसाठी आता खड्डे तक्रार निवारण (Khadde Takrar Nivaran) प्रणाली विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
खालील लेख देखील वाचा !
- शासकीय कामे होत नसतील तर ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची? जाणून घ्या सविस्तर – (आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली) Grievances Maharashtra
- आपले सरकार २.० – तक्रार निवारण प्रणालीची कार्यपध्दती अद्ययावत ! Aaple Sarkar 2.0 Grievances Maharashtra
- व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही आता डायल ११२ मध्ये समावेश !
- माहिती अधिकाराचा अर्ज ऑनलाईन मोबाईलद्वारे कसा करायचा ? जाणून घ्या सविस्तर
- महाराष्ट्र लोक आयुक्त कडे तक्रार कशी दाखल करावी? जाणून घ्या सविस्तर !
- ग्राहक संरक्षण अधिनियमान्वये तक्रार दाखल करण्याची पद्धत
- लोकाभिमुख प्रशासनच्या दृष्टीने जनतेच्या तक्रारींची दखल घेणे, त्यांचे वेळेत निराकरण करणे, तक्रारदारांना सन्मानाची वागणूक देणेबाबत शासन नियम
- निनावी तक्रारीसाठी काय नियम आहे?
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!