महसूल व वन विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी कामे

महसूल विभागाची जिवंत सातबारा मोहिम : ७/१२ उताऱ्यावरील मयतांची नावे कमी होणार, वारसांची नावे लागणार!

राज्यातील ‘मयत’ सातबारा आता ‘जिवंत’ (Jivant Satbara Mohim) होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही अनोखी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहे. सातबारा वरील सर्व मयत खातेदारांच्या ऐवजी वारसांची नावे नोंदवण्यात येणार आहे. ऑनलाईन सातबारा मोहिमेनंतर आता महसूल खात्याने अजून एक मोठे पाऊल टाकले आहे. मयतांची नावे सातबाऱ्यावरून हटवून त्यांच्या वारसदाराची नावे सातबारावर लावण्यात येणार आहे. राज्यातील सातबारा अद्ययावत होणार आहे.

महसूल विभाग १०० दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत दिनांक ०१ मार्च २०२५ पासुन बुलढाणा जिल्हयातील सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहिम राबविण्यात येत असून सदर मोहिमेची शासनस्तरावर मा. महसूल मंत्री महोदय यांनी दखल घेवून सदर मोहिम संपुर्ण राज्यामध्ये राबविण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.

महसूल विभागाची जिवंत सातबारा मोहिम – Jivant Satbara Mohim:

“जिवंत सातबारा मोहिम – Jivant Satbara Mohim” अंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. या दृष्टीकानातुन संपूर्ण राज्यात” जिवंत सातबारा मोहिम (Jivant Satbara Mohim)” राबविण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे.

100 दिवस कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत जिवंत सातबारा (Jivant Satbara Mohim) मोहिम राबविणेबाबत शासन निर्णय :-

सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्यावत करुन मयत खातेदारांच्या वारसाची नोंदींचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये “जिवंत सातबारा (Jivant Satbara Mohim) मोहिम राबविण्यात यावी.

कशी असेल ‘जिवंत सातबारा मोहीम’?

जिवंत सातबारा (Jivant Satbara Mohim) मोहिम राबविण्यासाठी खालील प्रमाणे कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात येत आहे:-

अ.क्र.कालावधीकरावयाची कार्यवाही
दि.१/४/२०२५ ते ५/४/२०२५ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणा-या गावामध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ठ प्रकरणे सोडून गाव निहाय मयत खातेदार यांची यादी तयार करणे
दि.६/४/२०२५ ते २०/४/२०२५वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे (मृत्यूदाखला, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञालेख / स्वयं घोषणापत्र, पोलीस पाटील / सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांचे नावे, वय, पत्ते व दुरध्वनी क्रमांक /भ्रमणध्वनी क्रमांक, रहिवास बाबतचा पुरावा ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी स्थानिक चौकशी करुन मंडळ अधिकारी यांचे मार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणे.
दि.२१/४/२०२५ ते १०/५/२०२५ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा. त्यानंतर म.ज.म.अ.१९६६ च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करुन मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफार वर निर्णय घेऊन त्यानुसार ७/१२ दुरुस्त करावा जेणेकरुन सर्व जिवंत व्यक्ती ७/१२ वर नोंदविलेल्या असतील.
तहसीलदारांपासून विभागीय आयुक्तांपर्यंत जबाबदारी:

वरील कालबध्द कार्यक्रम राबविण्याकरीता खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत:-

१) संबंधित तहसिलदार यांची त्यांच्या तालुक्याकरीता “समन्यय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांनी आपल्या अधिनस्त कार्यक्षेत्रात सदर कालबध्द कार्यक्रम वर नमूद विहीत मुदतीत पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही करावी, तसेच उपरोक्त कार्यक्रमाबद्दल ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) व मंडळ अधिकारी यांना अवगत करण्यात येऊन उचित कार्यवाही करण्याबाबत सक्त सुचना देण्यात याव्यात.

२) संबंधित जिल्हाधिकारी यांची त्यांच्या जिल्ह्याकरीता “नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्त तालुक्यांचा वेळोवेळी आढावा घेऊन जिवंत सातबारा (Jivant Satbara Mohim) मोहिम राबविण्यामध्ये काही अडचणी येत असल्यास त्यांचे निराकरण करावे.

३) संबंधित विभागीय आयुक्त यांची त्यांच्या अधिनस्त जिल्ह्यांकरीता “विभागीय संनियंत्रण अधिकारी” म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या अधिनस्त जिल्ह्यांचा नियमित आढावा घेऊन त्याबाबतचा साप्ताहिक अहवाल खालील नमुन्यामध्ये प्रत्येक सोमवारी निश्चितपणे dolcellurid revenue@maharashtra.gov.in या ई-मेल पत्चावर सादर करावा.

जिल्हातालुकाएकूण मयत खातेदार संख्याई-ठक्क प्रणालीत वारसनोंद अर्ज दाखल संख्यावारसनोंद अर्जानुसार वारस ठराव निर्णय संख्यावारस फेरफार संख्या
दाखलमंजूरनामंजूर

जिवंत सातबारा (Jivant Satbara Mohim) मोहिमेंतर्गत वारस नोंदीकरीता अर्ज ई हक्क प्रणालीमार्फतच नोंदविणेत यावा.

सातबारावरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया करणेसाठी आवश्यक असलेल्या सर्व वारस नोंदी घेऊन ७/१२ “जिवंत” म्हणजेच अद्ययावत करणेसाठी वर नमूद केल्याप्रमाणे विहित कालबध्द कार्यक्रम राबवावा व “जिवंत ७/१२” मोहिम यशस्वी होईल याची दक्षता घ्यावी.

महसूल व वन विभाग शासन निर्णय डाउनलोड:

100 दिवस कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत जिवंत सातबारा मोहिम राबविणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही महसूल विभागाची जिवंत सातबारा (Jivant Satbara Mohim) मोहिम विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

खालील लेख देखील वाचा!

  1. जमिनीचे वारस नोंद करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती.
  2. गाव नमुना ६-क (वारसा प्रकरणांची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 6K
  3. गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती !
  4. 1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर!
  5. सातबारा (7/12) वरील चुकांची दुरुस्ती कशी करावी? जाणून घ्या सविस्तर
  6. सातबारा (7/12) उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
  7. जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती
  8. सर्व्हे नंबर, भूमापन क्रमांक आणि गट नंबर याबाबत सविस्तर माहिती !
  9. जमिनीची सरकारी किंमत ऑनलाईन कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर
  10. जमीन किंवा बिगर शेती जमीन (NA Plot) खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी ? जाणून घ्या सविस्तर
  11. जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते? जाणून घ्या सविस्तर माहिती
  12. डिजिटल स्वाक्षरीचा ८अ खाते उतारा ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा? जाणून घ्या सविस्तर
  13. डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे? जाणून घ्या सविस्तर !

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.