महाराष्ट्र जमीन महसूल कायदावृत्त विशेषसरकारी कामे

जमीन मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस !

शेतजमिनीच्या हद्दीबाबत शंका निर्माण झाल्यास शेतकरी भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप-अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करू शकतात किंवा आपण ऑनलाईन (Jamin Mojani Online – eMojni) देखील जमीन मोजणीसाठी अर्ज करू शकता.

जमीन मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर ! (Jamin Mojani Online – eMojni):

आपण या लेखात जमीन मोजणीसाठी (Jamin Mojani Online – eMojni) ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम जमीन मोजणीसाठी नियम व अटी काय आहेत ते पाहूया.

जमीन मोजणीसाठी नियम व अटी (Jamin Mojani Online Terms and Conditions):

1) मोजणी मिळकतीचे क्षेत्र वहीवाटीत व ताब्यात असावे.

2) मोजणी वेळी सहधारक, लगतधारक यांनी हरकत घेतल्यास प्रकरणी नियमानुसार होणारी कार्यवाही मान्य असावी.

3) मिळकतीबाबत कोणताही वाद नाही किंवा कोणत्याही पोलीस स्टेशन / न्यायालयात दावा प्रलंबित नाही. तसे आढळून आल्यास प्रकरणी कार्यालयाकडुन नियमानुसार होणारी कार्यवाही मान्य असावी.

4) मिळकतीच्या मोजणीनंतर मुळ भूमि अभिलेखाशी पडताळणी केल्यानंतर माझी मिळकत लगत मिळकतीच्या मध्ये आल्याचे निदर्शनास आल्यास तसेच ७/१२, मालमत्ता पत्रक यांच्या क्षेत्राशी तफवतीत किंवा फरकात असल्यास मोजणी प्रकरण विनाकार्यवाही निकाली करण्यास हरकत नसावी.

5) बिगरशेती मोजणी प्रकरणासोबत पुर्वी झालेलेल्या मोजणीची नक्कल, संबंधीत कार्यालयाकडील बिगरशेती आदेश सत्यप्रत व मंजूर रेखाकन नकाशाची सत्यप्रत या अर्जासोबत अपलोड करावी.

6) पोट हिस्सा मोजणी प्रकरणासोबत पुर्वी झालेली मोजणीची नक्कल, पोट हिस्स्याचा कच्चा नकाशा या अर्जासोबत अपलोड करावी.

7) नगरपालिका / महानगरपालिका / सक्षम नियोजन प्राधिकरण क्षेत्रातील पोट हिस्सा मोजणी साठी संबंधीत कार्यालयाकडून पोट हिस्सा करणे बाबत चा आदेश / नाहरकत प्रमाणपत्र यांची सत्यप्रत अर्जासोबत अपलोड करावी.

8) कुलमुख्यात्यार पत्राबाबत वाद उदभवल्यास संपूर्ण कायदेशीर बाब म्हणून ती अर्जदार या नात्याने सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची राहील, यांस भूमि कुलमुख्या अभिलेख विभाग जबाबदार राहणार नाही.

9) गुंठेवारी प्रकरणासोबत सक्षम प्राधिकारी यांचा स्थानिक प्राकिरणाचा मजुर गुंठेवारीचा आदेश व विध्यमान रेखकनाचा आराखडा / नकाशा सोबत जोडायचा आहे.

10) सामीलीकरण मोजणी प्रक्रणा पुर्वी झालेली मोजणीची नक्कूल सोबत सामीलीकरण करत असलेल्या मिळकतीच्या सामीलीकरण करणे बाबत सक्षम प्राधिकारी यांचे आदेश व नकाशा अपलोड करायचा आहे.

जमीन मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस ! Jamin Mojani Online Process:

जमीन मोजणीसाठी ऑनलाईन (Jamin Mojani Online) अर्ज करण्यासाठी खालील भूमीअभिलेख विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/

वेबसाईट ओपन केल्यानंतर मुख्य मेनूमध्ये ‘सेवा‘ पर्यायामध्ये ‘ई-मोजणी-2’ पर्यायावर क्लिक करा.

आता नवीन वेबपोर्टल ओपन होईल, त्यामध्ये ‘नवीन वापरकर्ता नोंदणी‘ वर क्लिक करून आवश्यक तपशील भरा आणि नागरिक लॉगिन तयार करा.

नागरिक लॉगिन तयार झाल्यानंतर पुन्हा वेबसाईटच्या होम पेज वर येऊन लॉगिन करा.

Jamin Mojani Online Login
Jamin Mojani Online Login

ई-मोजणी-2 – eMojni’ पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर मोजणी शुल्कपुनर्भेट मोजणी (Jamin Mojani Online – eMojni) अर्ज असे पर्याय दिसतील. आपणास १. हद्दकायम २. पोट हिस्सा ३. बिगरशेती ४. गुंठेवारी प्रकारची ५. सामिलिकरण मोजणी करावयाची असल्यास नवीन मोजणी अर्ज वर क्लिक करावे.

मोजणी शुल्क बाबत माहिती हवी असल्यास मोजणी शुल्क पर्यायावर क्लिक करा आणि आपला पुनर्भेट मोजणी अर्ज भरण्यासाठी ‘पुनर्भेट मोजणी अर्ज‘ पर्यायावर क्लिक करा.

भूसंपादन व शासकीय मोजणी (Jamin Mojani Online – eMojni) प्रकरण भरताना ज्या संस्थेस / शासकीय कार्यालयास मोजणी करावयाची आहे त्या संबंधित संस्थेस / शासकीय कार्यालयाचे वापरकर्ता नोंदणी करून भूसंपादन व शासकीय मोजणी प्रकरण भरावे.

हेल्पलाइन: +02025712712

पुढील लेख देखील वाचा!

    1. जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते? जाणून घ्या सविस्तर माहिती
    2. गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती !
    3. 1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर!
    4. सातबारा (7/12) वरील चुकांची दुरुस्ती कशी करावी? जाणून घ्या सविस्तर
    5. सातबारा (7/12) उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
    6. जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती
    7. सर्व्हे नंबर, भूमापन क्रमांक आणि गट नंबर याबाबत सविस्तर माहिती !
    8. जमिनीची सरकारी किंमत ऑनलाईन कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर
    9. जमीन किंवा बिगर शेती जमीन (NA Plot) खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी ? जाणून घ्या सविस्तर
    10. जमिनीचे वारस नोंद करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती
    11. तलाठी कार्यालयातील गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती
    12. डिजिटल स्वाक्षरीचा ८अ खाते उतारा ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा? जाणून घ्या सविस्तर

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.