परदेशात कार चालवायची असेल तर इथेच काढा परवाना !
रोजगार, व्यवसाय तसेच शिक्षणासाठी अनेक नागरिक परदेशात जात असतात. मात्र, त्या ठिकाणी गेल्यावर जर दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालविण्याची वेळ आली, तर अनेकांजवळ परदेशात चालविण्याचा (International Driver License) परवाना नसल्यामुळे गैरसोयींचा सामना करावा लागतो. त्यामुळे नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेता नागरिकांना आता आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणीच आंतरराष्ट्रीय वाहन परवाना (International Driver License) मिळण्याची सुविधा करून दिली आहे. ज्या नागरिकांना विदेशात वाहन चालविण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे आहे, त्यांच्याकडे पहिल्यांदा भारतातील ड्रायव्हिंग लायसन्स असणं बंधनकारक आहे. तसेच त्यांच्याकडे पासपोर्ट असणे गरजेचे आहे. आरटीओ कार्यालयात प्रत्यक्षात जाणे गरजेचे असून, त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या देशात जायचे आहे आणि किती दिवसांसाठी जायचे आहे, याची माहिती द्यावी लागते. इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी १ हजार रुपये फी भरावी लागेल. इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सची व्हॅलिटीडी १ वर्षाची असून, त्यानंतर या परवान्याची मुदत संपते. तसेच कागदपत्रांची प्रक्रिया केल्यानंतर एका दिवसात परदेशी वाहन (International Driver License) चालविण्याचा परवाना मिळत असल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय चालक परवाना कसा काढाल? International Driver License:
ज्या नागरिकांना विदेशात वाहन चालविण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे आहे, त्यांच्याकडे पहिल्यांदा भारतातील ड्रायव्हिंग लायसन्स असणं बंधनकारक आहे. तसेच त्यांच्याकडे पासपोर्ट असणे गरजेचे असून, आरटीओ कार्यालयात गेल्यानंतर संबंधितांना आंतरराष्ट्रीय चालक (International Driver License) परवाना दिला जात असल्याचे सांगण्यात आले.
१५० देशांत चालतो आंतरराष्ट्रीय परवाना
इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सची व्हॅलिटीडी १ वर्षाची असून, त्यानंतर या परवान्याची मुदत संपते. जवळपास १५० देशांमध्ये हा परवाना ग्राह्य धरला जातो. म्हणजेच १५० देशांमध्ये तुम्ही या इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सच्या आधारावर वाहन चालवू शकत असल्याचे सांगण्यात आले.
कागदपत्रे काय लागतात?
परदेशी वाहन (International Driver License) परवाना काढण्यासाठी आधी भारतीय वाहन परवाना द्यावा लागेल, तसेच पासपोर्टची प्रत, आधारकार्ड आदी कागदपत्रे लागत असल्याची माहिती देण्यात आली.
शुल्क किती?
इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी १ हजार रुपये फी भरावी लागत असल्याचे सांगण्यात आले, तसेच इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सची व्हॅलिटीडी १ वर्षाची असून, त्यानंतर या परवान्याची मुदत संपते.
एका दिवसात परवाना…
परदेशात वाहन चालविण्यासाठी आंतराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्सही आरटीओ कार्यालयातून काढता येते. त्यासाठी वरील सांगितल्याप्रमाणे कागदपत्रांची प्रक्रिया आरटीओ कार्यालयात स्वतः येऊन करणे गरजेचे आहे. सर्व कागदपत्रे पूर्ण असल्यास, एका दिवसातही परदेशात वाहन (International Driver License) चालविण्याचा परवाना दिला जातो.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!