मोदी आवास घरकुल योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गांचा समावेश !
सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मा. उपमुख्यमंत्री (वित्त) महोदयांनी दि. ०९ मार्च, २०२३ रोजी राज्याचा सन २०२३-२४ करीताचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षात १० लाख घरे बांधण्यासाठी नवीन “मोदी आवास घरकुल योजना” सुरु करण्यात येईल तसेच या योजनेसाठी येत्या ३ वर्षात १२ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येतील, यापैकी ३ लाख घरे ३ हजार ६०० कोटी रुपये खर्च करुन सन २०२३- २४ या पहिल्या वर्षात पूर्ण करण्यात येतील अशी घोषणा केली होती.
त्याअनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षात १० लाख घरे बांधण्यासाठी “मोदी आवास घरकुल योजना” राबविण्याबाबतच्या प्रस्तावास दि. २१.०७.२०२३ रोजी मा. मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभाग क्र.वगृयो- २०२३/प्र.क्र.३३/योजना-५, दि.२८.०७.२०२३ निर्गमित करण्यात आला आहे. तसेच, विशेष मागास प्रवर्गातील घरकुलास पात्र कुटुंबांचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्याबाबतचा शासन निर्णय दि. २७.०९.२०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
तथापि, विविध स्तरावरुन “मोदी आवास” घरकुल योजनेमध्ये विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाचा समावेश करण्याची विनंती करण्यात येत होती. त्यानुषंगाने सदर प्रवर्गातील पात्र कुटुंबांचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
मोदी आवास घरकुल योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गांचा समावेश शासन निर्णय :-
राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासोबतच विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांचा समावेश ‘मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभाग क्र.वगृयो-२०२३/प्र.क्र.३३/योजना-५ दि.२८.०७.२०२३ मधील नमुद अटी व शर्ती विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांनाही लागू राहतील.
सदर योजनेतंर्गत लाभ घेणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरुन सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन निर्णय: मोदी आवास घरकुल योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गांचा समावेश करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – “मोदी आवास” घरकुल योजना – “Modi Awas” Gharkul Scheme
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!