जमिनीची सरकारी किंमत ऑनलाईन कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर
जमिनीच्या व्यवहारातील प्रत्यक्षातील किमती आणि सरकारदरबारी त्या व्यवहाराच्या नोंदलेल्या किमती यात प्रचंड फरक असतो, तरी हि आपण एक माहिती म्हणून आपण जमिनीची सरकारी किंमत ऑनलाईन पाहू शकतो. जमीन ही एक दुर्मीळ संसाधन आहे. जमीन निर्माण होत नाही. त्यामुळे अशा दुर्मीळ संसाधनाच्या धारकाला त्या संसाधनाची बाजारात चढी किंमत मिळणे हा खुल्या बाजारपेठेचा नियम आहे. पण दुर्दैवाने आपल्या जमिनीची खुली बाजारपेठच अस्तित्वात नाही.
जमिनीच्या व्यवहारातील प्रत्यक्षातील किमती आणि सरकारदरबारी त्या व्यवहाराच्या नोंदलेल्या किमती यात प्रचंड फरक असतो. कारण जमिनीच्या खरेदीविक्रीचे व्यवहार हे मुद्रांक शुल्क चुकवण्यासाठी नेहमीच काळ्या पैशात होतात. म्हणूनच, या किंमतींचा बाजारभाव म्हणून विचार करणे आवश्यक आहे. याला कोणताच शास्त्रीय आधार नाही. क्षणभर आपण असे गृहीत धरू की, देशात जमिनीची खुली बाजारपेठ अस्तित्वात आहे. मग प्रश्न सोपा होता.
जमिनीची किंमत सरकारने म्हणजे एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने ठरवण्याचा प्रश्नच नव्हता. कारण बाजारपेठ (मार्केट) किंमत ‘शोधून काढत’ असते (Price Discovery). उद्योगांनी अनेक शेतकऱ्यांशी वाटाघाटी करणे व्यवहार्य नसल्यामुळे सरकारची भूमिका ही उद्योगसमूह आणि शेतकरी यांच्यामधील ‘Price Discovery’साठीचा दुवा इतकीच राहिली असती. या लेखात आपण ऑनलाईन जमिनीची सरकारी किंमत कशी पाहायची ते पाहणार आहोत.
जमिनीची सरकारी किंमत ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस:
दरांचे वार्षिक विवरण पाहण्यासाठी, खालील नोंदणी व मुद्रांक विभागाची वेबसाईट ओपन करा.
http://igrmaharashtra.gov.in/eASR/frmMap.aspx
नोंदणी व मुद्रांक विभागाची वेबसाईट ओपन केल्यावर नकाशा स्क्रीनवर प्रदर्शित होईल, दर पाहण्यासाठी तुमच्या जिल्हावर क्लिक करा. जिल्हा निवडल्यानंतर एक वेबपेज ओपन होईल.

आता चालू वर्ष डाव्या कोपर्यात दर्शविले जाईल,आणि आपण निवडलेला जिल्हा आपोआप आला असेल. पुढे आता ड्रॉपडाउन वरून तालुका निवडा, तालुका निवडल्यानंतर गाव निवडा.

आता आपण पाहू शकता गाव निवडीवर, स्थानानुसार दर ग्रीडमध्ये दर्शविले जातात. दर युनिटसह दर्शविले जातात.

काही शहरी भागात, झोन मधील संबंधित स्थान व सर्वेक्षण क्रमांका नुसार हे दर दाखवले जातात.
सुचना –
1) या प्रणालीद्वारे आपणास सर्व जागेच्या दराची साधारण माहिती मिळू शकेल.
2) दर बघण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती अचूकरित्या नमूद करावी.
3) आपल्या दराची खातरजमा माहिती साठी तुमच्या विभागातल्या सहाय्यक रचनाकार यांचेशी संपर्क साधावा.
हेही वाचा – गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!