वृत्त विशेषमहाराष्ट्र ग्रामपंचायतसरकारी कामे

ग्रामपंचायत निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवाराची संपूर्ण माहिती कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर

आज आपण ग्रामपंचायत निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवाराची संपूर्ण माहिती कशी पाहायची? ते सविस्तर जाणून घेणार आहोत. कुठे नाव, कुठे काम तर कुठे केवळ पक्षाचा झेंडा दाखवित मतदारांकडे मतांची मागणी करण्यात उमेदवार व्यस्त आहेत. मतांचा हा जोगवा मागताना तोंडभरून आश्वासने देताना उमेदवार थकत नाहीत. निवडणुकांच्या रणधुमाळीचे बिगुल वाजताच सर्वत्र जोरदार प्रचाराची नांदी होते, मात्र या प्रचाराचा प्रत्यक्ष तरुण मतदारावर परिणाम कितपत होतो, आश्वासनांच्या फैरी झाडणारे उमेदवार तरुणांना आदर्श वाटतो का, काम, नाव, पक्ष की जाहीरनामा, नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरून मतदार मत देतो.

आपल्या समस्या सोडवण्यासाठी किंबहुना जनसामान्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्यातीलच कोणीतरी उमेदवार म्हणून पुढाकार घ्यायला हवा. उमेदवार निवडताना त्या व्यक्तीला ज्या परिसरातून आपण निवडणूक लढवणार आहोत निदान त्याची माहिती आहे का, हे तपासून घेणे हा प्राथमिक निकष असायला हवा. जर उमेदवार आपल्यापासून अलिप्त राहत असेल तर त्याला आपल्या समस्यांची जाणीव असणे शक्य नाही. परिणामी त्यांवर तोडगा काढतानाही त्या उमेदवाराची तटस्थ भूमिका असू शकते. त्यामुळे आपल्यात राहणारा, नागरिकांच्या समस्यांचा प्रत्यक्ष अनुभव असलेला उमेदवार निवडण्यावर मी भर देईन. अनेकदा निवडणूक तोंडावर आली की वर्षानुवर्षे आपल्या कार्यालयाच्या वातानुकूलित जागेत लपलेले राजकारणी गल्लोगल्ली फिरू लागतात. या अचानक वाटलेल्या काळजीच्या ढोंगाला न भुलता आपण एक सूज्ञ नागरिक म्हणून सारासार विचार करणे गरजेचे आहे. आपण योग्य उमेदवाराची निवड करताना त्या व्यक्तीची पूर्वकामगिरी तसेच आपल्या परिसरात केलेली कामे यांचा आढावा घ्यावा.

ग्रामपंचायत निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवाराची संपूर्ण माहिती ऑनलाईन पहा:

ग्रामपंचायत निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवाराची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी सर्व प्रथम राज्य निवडणूक आयोगा ची वेबसाईट ओपन करा.

https://panchayatelection.maharashtra.gov.in/

राज्य निवडणूक आयोगा ची वेबसाईट ओपन झाल्यावर “Affidavit by the final contesting candidates” या पर्यायावर क्लिक करा.

Affidavit by the final contesting candid
Affidavit by the final contesting candid

आता आपल्याला उमेदवाराची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील पर्याय निवडायचे आहेत.

  • LocalBody: या ऑप्शन मध्ये आपली ग्राम पंचायत निवडा.
  • Division: या ऑप्शन मध्ये आपला विभाग निवडा.
  • District: या ऑप्शन मध्ये आपला जिल्हा निवडा.
  • Taluka: या ऑप्शन मध्ये आपला तालुका निवडा.
  • Village Name: या ऑप्शन मध्ये गावाचे नाव निवडा.
  • Election Programe Name: या ऑप्शन मध्ये निवडणूक कार्यक्रमाचे नाव निवडा.
  • Ward: या ऑप्शन मध्ये वॉर्ड नंबर निवडा.
Search
Search

वरील सर्व पर्याय निवडून झाल्यावर (Search) सर्च बटन वर क्लिक करा.

उमेदवारांची यादी:

सर्च बटन वर क्लिक केल्यावर, निवडलेल्या वॉर्ड मधून कोण कोण उमेदवार उभे आहेत त्यांचे नोंदणी क्रमांक आणि पूर्ण नाव तुम्हाला दिसेल.

पुढे आपल्याला डाऊनलोड या पर्यायामध्ये View Affidavit ऑप्शन वर क्लिक करून त्याचे प्रतिज्ञापत्र पाहायचे आहे.

ज्या ठिकाणी “NA” हा पर्याय आहे, त्या व्यक्तीचा उमेदवार अर्ज रद्द झाला आहे म्हणून त्याची माहिती आपण हिथे पाहू शकत नाही.

ग्रामपंचायत निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी, व्यवसाय किंवा कामधंदा याचा तपशील, मत्ता व दायित्व यांचा तपशील, जंगम मालमत्‍तेचा तपशील, स्थावर मालमत्तेचा तपशील आणि सार्वजनिक वित्तीय संस्था यांच्याकडील व शासकीय / निमशासकीय संस्थांकडील दायित्वे/ थकीत रकमा तपशील, इत्यादी आपण पाहू शकतो.

हेही वाचा – ग्रामपंचायत सरपंच निवडुनिकीसाठी उमेदवारी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता काय लागते ते सविस्तर पाहूया !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.