आयुष्मान कार्ड ऑनलाईन डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
आयुष्मान (Ayushman Card) भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हा भारत सरकारचा राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य विमा निधी आहे ज्याचा हेतू देशातील कमी उत्पन्न असलेल्यांना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना (बीपीएल धारकांना) आरोग्य विमा संरक्षण मोफत उपलब्ध करून देणे आहे. साधारणपणे, देशातील तळाचा 50% भाग या योजनेसाठी पात्र आहे.
आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना – Ayushman Bharath PMJAY-MJPJAY:
प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थ्यांची निवड सामाजिक-आर्थिक जात गणना (एसईसीसी -2011) च्या आधारे या योजनेतर्गत लाभार्थ्यांची निवड केली जाते. जे व्यक्ती या योजनेत पात्र असतील अशा व्यक्तींना शासकीय खासगी रुग्णालयात ५ लाखांपर्यंत मोफत उपचार केला जाऊ शकतो. आपण या लेखात आयुष्मान भारत जन आरोग्य योजना हेल्थ कार्ड (PMJAY-MJPJAY Ayushman Card) ऑनलाईन डाऊनलोड कसे करायचे ते सविस्तर पाहणार आहोत.
आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे फायदे:
AB PM-JAY सूचीबद्ध दुय्यम आणि तृतीयक काळजी अटींसाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वार्षिक ₹ 5,00,000 पर्यंतचे कॅशलेस कव्हर प्रदान करते. योजनेतील कव्हरमध्ये उपचाराच्या खालील घटकांवर झालेला सर्व खर्च समाविष्ट आहे:
1) वैद्यकीय तपासणी, उपचार आणि सल्लामसलत
2) रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी
3) औषधी आणि वैद्यकीय उपभोग्य वस्तू
4) नॉन-इंटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह केअर सेवा
5) निदान आणि प्रयोगशाळा तपासणी
६) वैद्यकीय रोपण सेवा (आवश्यक असेल तेथे)
7) निवास लाभ
8) अन्न सेवा
9) उपचारादरम्यान उद्भवणाऱ्या गुंतागुंत
10) रुग्णालयात दाखल केल्यानंतर 15 दिवसांपर्यंत फॉलो-अप काळजी.
₹ 5,00,000 चे फायदे फॅमिली फ्लोटर आधारावर आहेत म्हणजेच ते कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य वापरू शकतात. AB PM-JAY अंतर्गत, कुटुंबाच्या आकारावर किंवा सदस्यांच्या वयावर कोणतीही मर्यादा नाही. शिवाय, पहिल्या दिवसापासून आधीच अस्तित्वात असलेले रोग कव्हर केले जातात. PM-JAY मध्ये समाविष्ट होण्यापूर्वी कोणत्याही वैद्यकीय स्थितीमुळे ग्रस्त असलेली कोणतीही पात्र व्यक्ती आता नोंदणी केल्याच्या दिवसापासूनच या योजनेअंतर्गत त्या सर्व वैद्यकीय परिस्थितींसाठी उपचार घेऊ शकेल.
आयुष्मान कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करण्याची प्रोसेस! Ayushman Card Download:
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हेल्थ (Ayushman Card) कार्ड ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी खालील आयुष्मान भारत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
https://beneficiary.nha.gov.in/
आयुष्मान भारत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची अधिकृत वेबसाईट ओपन केल्यानंतर Beneficiary वर क्लिक करून Captcha कोड, मोबाईल नंबर व ओटीपी टाकून लॉगिन करा.
लॉगिन केल्यानंतर Scheme मध्ये PMJAY, आपले महाराष्ट्र राज्य निवडा, Sub Scheme मध्ये PMJAY-MJPJAY वर क्लिक करा.
तसेच आपला जिल्हा निवडून Search By मध्ये Family Id, Aadhaar Number, किंवा PMJAY ID टाकून Captcha कोड टाका व सर्च आयकॉन वर क्लिक करा.
पुढे आपल्या कुटुंबातली सदस्यांची यादी येईल, त्यामध्ये eKYC Status हे Verified असेल व Card Status मध्ये Approved असेल तर Action मध्ये डाउनलोड आयकॉन वर क्लिक करून हेल्थ कार्ड (PMJAY-MJPJAY Ayushman Card) डाउनलोड करू शकता.
डाउनलोड आयकॉन वर क्लिक केल्यानंतर Download Card मध्ये Select All वर क्लिक करून कुटूंबातील सर्व Approved/Verify सदस्यांची कार्ड Aadhaar OTP टाकून PDF फाईल मध्ये आयुष्मान कार्ड (Ayushman Card) डाउनलोड करू शकता.
आयुष्मान भारत हेल्पलाईन – 14555 / 104 / 1800110770
अधिकृत वेबसाईट : https://pmjay.gov.in/
आयुष्मान भारत मोबाईलॲप (Ayushman App) : मोबाईलॲप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
खालील लेख देखील वाचा!
- आयुष्मान कार्ड ऑनलाईन डिजिलॉकर मधून डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना – CM Medical Assistance Fund Scheme.
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्सॲप हेल्पलाईन !
- महाराष्ट्र “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” योजना – CM Relief Fund Scheme
- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ योजना : रुग्णांना मिळणार विविध आरोग्य सेवा !
- ई-संजीवनी ॲप रुग्णांसाठी संजीवनी!
- वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना आता मिळणार २५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य !
- CGHS लाभार्थी आयडी आयुष्मान भारत हेल्थ आयडीला लिंक करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
- प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांवर औषधे माफक दरात उपलब्ध !
- ई-श्रम यूएएन कार्डसाठी अशी करा ऑनलाईन नोंदणी!
- MJPJAY : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना – Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY)
- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आता राज्यातील सर्व कुटुंबांना लागू !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!