ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी ऑनलाईन कशी भरायची? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !
ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी ऑनलाईन (Gram Panchayat Gharpatti Panipatti Online) कशी भरायची? सविस्तर याची प्रोसेस आपण या लेखात पाहणार आहोत. ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आणि घरपट्टी, पाणीपट्टी, व इतर कर हे ग्रामपंचायतचे उत्पनाचे प्रमुख साधन आहे. ग्रामपंचायतीस शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत निधी जरी मिळत असला तरी तो निधी संबंधित योजनेच्या कामासाठीच खर्च करावा लागतो.
गावाला दैनंदिन पाणीपुरवठा करणे, पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती व देखभाल करणे, ब्लिचिंग पावडर खरेदी, वीजबिल भरणे, कर्मचारी पगार करणे, गावातील स्वच्छता, किरकोळ रस्ते दुरुस्ती, गटार दुरुस्ती, रस्त्यावरील दिवाबत्तीची सोय करणे, कार्यालयीन खर्च यासारखी अनेक नित्याची कामे ग्रामपंचायतीला करावी लागतात. ही कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणे आवश्यक असते. घरपट्टी आणि पाणीपट्टी यातून जमा होणाऱ्या निधीतून वरील व इतर आवश्यक कामे ग्रामपंचतीस करणे शक्य होते. त्यामुळे प्रत्येक मालमत्ताधारक यांनी आपला घरपट्टी, पाणीपट्टी कर,व इतर करांचा भरणा त्या त्या आर्थिक वर्षात करणे आवश्यक आहे.
ग्रामपंचायत ही एखाद्या कुटुंबाप्रमाणे असते, जसे ज्या कुटुंबात पैसा येईल ते कुटुंब त्याच्या आवश्यक गरजा भागवू शकते, तसेच जर ग्रामपंचायतला घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करातून जर पैसा जमा झाला तरच ग्रामपंचायत गावातील अत्यावश्यक कामे व गरजा पूर्ण करू शकते.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व ग्रामपंचायत कर व फी नियम (सुधारणा) २०१५ यामधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीचा कर हा प्रत्येक मालमत्ता धारकाला भरावाच लागतो, तो कधीही माफ होत नाही. तसेच थकबाकी रकमेवर दरवर्षी ५% व्याजसुद्धा भरावे लागते.
ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी, ऑनलाईन भरण्याची प्रोसेस – Gram Panchayat Gharpatti Panipatti Online Process:
घरबसल्या ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी, ऑनलाईन (Gram Panchayat Gharpatti Panipatti Online) भरण्यासाठी खालील राज्य सरकारची पोर्टल ओपन करा.
तुम्ही पहिल्यांदा नोंदणी करणार असल्यामुळे “Register” वर क्लिक करा.
नागरिक नोंदणी (Citizen Registration):
आता इथे नागरिक नोंदणी करण्यासाठी तुमचे नाव, लिंग, ई – मेल आयडी, आणि मोबाईल क्रमांक टाका. नोंदणी केल्यानंतर मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी वर युजरनेम आणि पासवर्ड येईल.
वापरकर्ता लॉगिन (User Login):
आता इथे युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
पोर्टलवर लॉगिन झाल्यानंतर तिथे विविध सेवा दिसतील त्यामध्ये “कर भरणा” या सेवा पर्यायावर क्लिक करा.
आता पुढे मालमत्ता आणि पाणी कर तपशील शोधा. आपला जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, प्रॉपर्टी आणि पाणी मिळकत नंबर select करून आपली माहिती search करा.
पुढे मालमत्ता आणि पाणी कर तपशील कनेक्शन पहा आणि Add Connection करा.
पुढे “If information is correct then add connection” असा मॅसेज येईल, जर माहिती बरोबर असेल तर ओके वर क्लिक करा.
आता आपण पाहू शकतो मिळकत नंबर ऍड झाला असल्याचा मेसेज दिसेल. पुढे “Click here to make a payment” या पर्यायावर क्लिक करा.
पुढे “Pay Now” हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि तुमची ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टीचे (Gram Panchayat Gharpatti Panipatti Online) पेमेंट ऑनलाईन भरा.
खालील लेख देखील वाचा!
- एका ग्रामपंचायतीला दरवर्षी किती निधी मिळतो? सरपंच गावाच्या विकासासाठी किती निधी गावात आणू शकतो? जाणून घ्या सविस्तर.
- ग्रामपंचायतीचे दाखले पहा “महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट ॲप” वर !
- ग्रामपंचायतीचा मागील तीन वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) साठी असा करा माहिती अधिकार अर्ज !
- ग्रामपंचायत कर आकारणी व दाव्यांच्या रकमांची वसुली (महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १२४ ते १३० नुसार)
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
Good
Ghatpendhari
Good