घरबसल्या मतदान कार्ड ऑनलाईन कसे काढायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !
भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार दिला आहे. हा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत निवडणूक (Voting Card) ओळखपत्र दिले जाते. अनेक सरकारी कामांसाठी हे ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. हे ओळखपत्र मिळवण्यासाठी आपल्याला आता कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. आपण घरबसल्या (Voting Card Apply Online) ऑनलाईन पद्धतीने ते मिळवू शकता.
मतदान कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस – Voting Card Apply Online:
राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन (Voting Card Apply Online) अर्ज करण्यासाठी वेबसाइट सुरु केली आहे. ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी https://voters.eci.gov.in/ या वेबसाइट वर जायचे आहे.
- Login and Sign-Up यावरती क्लिक करायचे आहे.
- नंतर तुमचा User Name व Password टाकायचा आहे. व Captcha Code भरायचा आहे. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केले नसेल तर आपला मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करून घ्यायचे आहे.
- Login वरती क्लिक करायचे आहे.
- Login वरती क्लिक केल्यावर New registration for general electors वर क्लिक करा.
- राज्य, जिल्हा आणि विधानसभा/संसदीय मतदारसंघ निवडा.
- वैयक्तिक माहिती, नातेवाईकांपैकी कोणत्याही एकाचे नाव आणि आडनाव, संपर्काची माहिती, आधार तपशील, लिंग, जन्मतारीख तपशील, सध्याचा पत्ता तपशील, अपंगत्वाची श्रेणी, कुटुंब सदस्य तपशील, घोषणा फॉर्म (Declaration) भरा.
आवश्यक कागदपत्रे:
तुम्हाला Address Proof मध्ये आपल्याला खालील पैकी एक Documents अपलोड करायचा आहे,त्यामध्ये
- बँक/किसान/पोस्ट ऑफीस करंट पास बुक
- रेशन कार्ड
- इनकम टॅक्स पावती
- रेंट अग्रीमेंट
- पाण्याचे बिल
- टेलिफोन बिल
- इलेक्ट्रिसिटी बिल
- गॅस बिल
- EPIC नंबर:
वयाचा पुरावा:
Age Proof Documents अपलोड करायची आहेत व त्यासाठी लागणारे कागदपत्रे पुढीलप्रमाणे,खालील पैकी एक Documents अपलोड करायचा आहे.
- जन्म प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- Driving लाइन्सन्स
त्यानंतर मग Preview या पर्यायाअंतर्गत नवीन मतदान कार्डासाठी (Voting Card) तुम्ही आता भरलेला फॉर्म-6 तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. त्याखालील सबमिट या बटनावर क्लिक केलं की तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि तुम्हाला एक रेफरन्स आयडी दिला जाईल.
हा आयडी वापरून तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करू शकता.
https://voters.eci.gov.in/home/track या वेबसाईटच्या होमपेजवर आलात की तुम्हाला तिथं Track application Status हा पर्याय दिसेल.
त्यावर क्लिक केलं की, रेफरन्स आयडी टाकून Track status या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
एकदा का फॉर्म सबमिट झाला की त्याची स्थानिक Booth level officer छाननी करतात. त्यानंतर तो Electoral Registration officer (उपजिल्हाधिकारी) यांच्याकडे पाठवला जातो.
सगळी माहिती आणि कागदपत्रं व्यवस्थित असल्यास तो फॉर्म Accept केला जातो आणि जवळपास 2 महिन्यांत तुमच्या पत्त्यावर मतदान (Voting Card) कार्ड पाठवलं जातं.
खालील लेख वाचा !
- डिजिटल मतदान कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसे करायचे? सविस्तर प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
- अंतिम मतदार यादी 2024 वार्डनुसार PDF फाईल मध्ये ऑनलाईन कशी डाउनलोड करायची? सविस्तर प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
- निवडणूक आयोगामार्फत मतदारांसाठी विविध उपयोगी प्रणाली पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
- मतदार यादीत नाव नसेल तर पात्र व्यक्तींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!