विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन कसे काढावे? जाणून घ्या सविस्तर (Marriage Certificate)
या लेखामध्ये आपण “विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन कसे काढावे?” याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. लग्नानंतर महिलांना अनेक कागदपत्रांमध्ये बदल करावे लागतात. त्यामध्ये आपले आधार कार्ड वरील नाव बदलण्यासाठी, बँकेमध्ये जॉइंट खात उघडण्यासाठी किंवा जीवन विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच इतर शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी व इतर कामासाठी आपल्याला विवाह प्रमाणपत्राची आपल्याला गरज भासते.
विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया:
विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी “आपले सरकार” ची खालील वेबसाईट ओपन करायची आहे.
https://aaplesarkar.mahaonline.gov.in
त्यानंतर नवीन यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन नोंदणी करावी लागेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी (युजर प्रोफाईल) कशी करायची? हे आपण मागील लेखामध्ये पाहिले आहे. रजिस्ट्रेशन झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकून लॉगिन करायचे आहे.

आता तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर इंग्लिश वर सिलेक्ट करून त्याखाली मराठी भाषेचा पर्याय निवडा. त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, तिथे तुम्हाला “ग्राम विकास व पंचायत राज” हा पर्याय निवडायचा आहे.

हा विभाग निवडल्यानंतर त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल यामध्ये दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मृत्यूचा दाखला, जन्म नोंद दाखला असे बरेच पर्याय दिसतील. त्यातील विवाह नोंद दाखला या पर्यायावर क्लिक करायचे आहे, नंतर पुढे जा वर क्लिक करायचे आहे.

पुढे ग्रामविकास विभागाची वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये विवाह नोंद दाखला या पर्यायावर क्लिक करायचे आहे,
अर्जदाराची माहिती:
- तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, व गावाचे नाव टाकायचे आहे.
- त्यापुढील रकान्यामध्ये वराचे संपूर्ण नाव, विवाह दिनांक आणि विवाहाचे ठिकाण टाकायचे आहे.
- पुढे तुम्हाला वराचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.
- तसेच वधूचे नाव व वधुचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. (वधूचे नाव टाकताना सासरचे नाव व शाळेच्या दाखल्यावर जे नाव असेल ते नाव टाकायचे आहे.)
- यानंतर समावेश करा या पर्यायावर क्लिक करा.

पुढे तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक दिसेल तिथे Ok या पर्यायावर क्लिक करा.
तुमचा अर्ज यशस्वीरीत्या जतन करण्यात आला आहे. कृपया दस्ताऐवज अपलोड करा आणि सेवा प्राप्तीसाठी शुल्क भरा.
खाली Upload Documents हा पर्याय निवडल्यानंतर तिथे तुम्हाला पासपोर्ट साईज फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज भरल्याचा तपशील दिसेल.
नंतर Upload Documents या पर्यायावरती क्लिक करा, व नंतर येणाऱ्या मेसेज वर ok या पर्यायावरती क्लिक करा.यानंतर तुमची सर्व कागदपत्रे सेव्ह होतील.
यानंतर शासनाचे चलन भरायचे आहे, त्यासाठी पेटीएम किंवा एटीएम डेबिट कार्ड ,क्रेडिट कार्डचा वापर करू शकता.
चलन भरल्यानंतर दोन किंवा तीन दिवसांनी आपले सरकार या पेजवर लॉगिन करून मुखपृष्ठ तपासा, त्यामध्ये भरलेल्या अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर त्याबद्दल तुम्हाला काही सांगण्यात आले आहे का? असे असल्यास तुमचा अर्ज नाकारला जाईल.
विवाह प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर तुमचं नाव, अर्ज क्रमांक तसेच प्रमाणपत्र डाउनलोड करा असे पर्याय दिसतील तिथून तुम्ही प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकता.
हे प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी पाच दिवसांचा आहे. हे प्रमाणपत्र ग्रामसेवक तुम्हाला देत असतो. या कागदपत्रांवरती कुठेही सही शिक्का घेण्याची गरज नसते कारण यावर आधीच तुमचे जे ग्रामसेवक आहेत त्यांची डिजिटल सही असते.
हेही वाचा – जातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
Mala vivah nondni karaychi ahe
विवाह नोंदणी ची माहिती दा
http://msdhulap.com/how-to-get-marriage-registration-certificate-online/
पैसे कट झाले पण डॉक्युमेंट क्लिक पर्याय open होत नाही पर्याय सांगा आता काय करू
error स्नॅपशॉट शेअर करा