आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी कामे

जातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !

आपण ज्या जातीचे आहोत ती प्रमाणित करणारा सरकारी दस्त ऐवज म्हणजे जातीचा दाखला Caste Certificate – (Jaticha Dakhala). जेव्हा नागरिक विशीष्ट प्रवर्गातील असेल तेव्हा जातीचे प्रमाणपत्र महत्व्याचे ठरते.महाराष्ट्र मध्ये एस.टी./एस.सी./एन.टी./एस.बी.सी./ओ.बी.सी.या प्रवर्गातील जाती प्रमाणपत्र दिले जाते.परंतु केंद्रात एस.टी./एस.सी./ ओ.बी.सी.याच प्रवर्गासाठी जाती प्रमाणपत्र दिले जाते.केंद्रात एन.टी./एस.बी.सी./ओ.बी.सी. यासाठी सेन्ट्रल ओ.बी.सी प्रमाणपत्र दिले जाते. ज्या अंतर्गत विशिष्ट जाती समूहाला विविध सेवा सवलतीचा लाभ घेता येणे शक्य होते.त्यात प्रामुख्याने

विशिष्ट जाती समूहाला खालील सवलतीचा लाभ:

  • सरकारी नोकरीत आरक्षण
  • शाळा महाविद्यालयात प्रवेश शुल्कामध्ये पूर्ण किंवा ठराविक सूट
  • शैषणिक संस्थेत प्रवेश कोटा.
  • काही सरकारी नोकरीत वयोमर्यादेत अतिरिक्त वयाची सूट
  • शैक्षणिक शिष्यवृत्ती इ.

आशा विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला Caste Certificate – (Jaticha Dakhala) सोबतच जात पडताळणी प्रमाणपत्र असणे हि आवश्यक असते.जर विद्यार्थी किंवा नागरिक एस.टी.व एस.सी प्रवर्गातील असेल तर असे जर पडताळणी प्रमाणपत्र असणे बंधनकारक असते.

जातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया – Caste Certificate:

जातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी “आपले सरकारची” https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ हि वेबसाईट ओपन करायची आहे.

त्यानंतर नवीन यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन रजिस्ट्रेशन करावे लागेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी (युजर प्रोफाईल) कशी करायची? हे आपण मागील लेखामध्ये पाहिले आहे. रजिस्ट्रेशन झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे व लॉगिन करायचे आहे.

लॉगिन - Caste Certificate - (Jaticha Dakhala) जातीचा दाखला
लॉगिन

आता तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर इंग्लिश वर सिलेक्ट करून त्याखाली मराठी भाषेचा पर्याय निवडा.

त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, तिथे तुम्हाला “महसूल विभाग” हा पर्याय निवडायचा आहे.

महसूल विभाग - Caste Certificate - (Jaticha Dakhala) जातीचा दाखला
महसूल विभाग

त्यानंतर उप विभाग यामध्ये “महसूल सेवा “या पर्यायावर क्लिक करा.

हा विभाग निवडल्यानंतर त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल यामध्ये जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचा दाखला,नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र असे बरेच पर्याय दिसतील. त्यातील जातीचे प्रमाणपत्र या पर्यायावर क्लिक करायचे आहे, नंतर पुढे जा वर क्लिक करायचे आहे.

जातीचे प्रमाणपत्र - Caste Certificate - (Jaticha Dakhala) जातीचा दाखला
जातीचे प्रमाणपत्र

नंतर महाऑनलाईन विभागाची वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये “जातीचे प्रमाणपत्र” या पर्यायावर क्लिक करायचे आहे, यानंतर जातीच्या प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे हे पेज ओपन होईल.

जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:

ओळखीचा पुरावा (किमान -1)

  1. पॅन कार्ड
  2. पासपोर्ट
  3. आरएसबीवाय कार्ड
  4. मनरेगा जॉब कार्ड
  5. चालकाचा परवाना
  6. अर्जदाराचा फोटो
  7. शासकीय किंवा निम शासकीय संस्थांनी जारी केलेले ओळखपत्र

पत्त्याचा पुरावा (किमान -1)

  1. पासपोर्ट
  2. पाण्याचे बिल
  3. रेशन कार्ड
  4. आधार कार्ड
  5. मतदार ओळखपत्र
  6. टेलिफोन बिल
  7. ड्रायव्हिंग लायसन्स
  8. वीज बिल
  9. मालमत्ता कराची पावती
  10. 7/12 आणि 8 ए / भाड्याची पावती

इतर कागदपत्रे (किमान -1)

1.प्रतिज्ञापत्र
2.8 अ उतारा
3.7/12 उतारा
4.जातीची वैधता
5.खसाराची प्रत
6.ठेव पावती
7.अधिकारांची नोंद
8.मतदार यादीची प्रत
9.बेनिफिशियरीचा फोटो
10सेवा पुस्तकाची प्रत
11.मंडळ चौकशी अहवाल
12.अर्जदाराचा फोटो आयडी
13.लाभार्थीचा फोटो आयडी
14.तलाठी पुस्तकाचा उतारा
15.गॅझेट नोटिफिकेशन कॉपी
16.मृत्यू प्रमाणपत्राची प्रत
17.शाळा सोडल्याचा दाखला
18.पगार प्रमाणपत्र किंवा फॉर्म 16
19.कोतवाल काकांच्या पुस्तकाची प्रत
20.कोतवाल बुक ऑफ फादरची प्रत
21.दि. च्या बी मध्ये अर्ज
22.वडिलांचे जात प्रमाणपत्र
23.नातेवाईकाचे जात प्रमाणपत्र
24.ग्रामपंचायतीचे निवासी पुरावे
25.भावाच्या जातीच्या वैधतेची प्रत
26.नगरपरिषदेचा रहिवासी पुरावा
27.आजोबांच्या कोतवाल पुस्तकाची प्रत
28.टीसी बोनाफाईड प्रमाणपत्र (टीसी क्रमांक)
29.आजीच्या कोतवाल पुस्तकाची प्रत
30.इतर संबंधित कागदोपत्री पुरावे
31.3 वर्षासाठी नियोक्ता फॉर्म 16
32.रिलेशन सर्टिफिकेट (रिलेशन सेल्फ)
33.आजोबा यांनी दत्तक विलची प्रत
34.जात प्रमाणपत्र अर्जदाराची प्रत
35.अर्जदाराने सादर केलेले प्रतिज्ञापत्र
36.तलाठी कडून 3 वर्षांचा उत्पन्नाचा पुरावा
37.नोंदणीचा​​उतारा दर्शवित आहे प्रविष्टी
38.विशेष कार्यकारी अधिकारी प्रमाणपत्र
39.मृत्यू प्रमाणपत्र दादाची प्रत
40.अर्जदाराने सादर केलेला अर्ज
41.रेशन कार्ड आणि निवडणूक फोटो आयडीची प्रत
42.जात प्रमाणपत्राच्या समर्थनार्थ पुरावा
43.महानगरपालिकेचा रहिवासी पुरावा
44.उत्पन्नाचा पुरावा – 3 वर्षांचे पगार प्रमाणपत्र
45.वडिलांचे शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत
46.अर्जदाराचे मूळ गाव / गाव याचा पुरावा
47.आजोबांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत
48.प्रतिज्ञापत्र जाती प्रमाणपत्र (फॉर्म -२) आणि (फॉर्म-3)
49.लाभार्थीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत
50.तलाठी / सरपंच / पोलिस पाटील यांचा चौकशी अहवाल
51.महसूल नोंदी किंवा ग्रामपंचायत रेकॉर्डची प्रत
52.एसटी जातीसाठी प्रतिज्ञापत्र जाती प्रमाणपत्र (फॉर्म-ए -१)
53.ग्रामपंचायत रजिस्टर मध्ये जन्म / मृत्यू उतारा
54.राजपात्राच्या अनेक ठिकाणांचा पुरावा
55.स्थानिक सक्षम प्राधिकरणाकडून जात प्रमाणपत्र जारी
56.अर्जदाराचे / वडिलांचे / किंवा नातेवाईकांचे जन्म नोंदणी उतारा
57.तहसीलदारांनी मागील issued वर्षाचे मिळकत प्रमाणपत्र
58.प्राथमिक शाळा अर्जदाराचे किंवा त्याच्या वडिलांचे प्रमाणपत्र
59.नगरसेवक / नगरपालिका सभासद यांचे प्रमाणपत्र
60.छाननी समितीद्वारे जारी केलेले कोणतेही वडील किंवा नातेवाईक असल्यास वैधता प्रमाणपत्र
61.अर्जदार, त्याचे वडील किंवा आजोबा यांचे प्राथमिक शाळा प्रवेश रजिस्टर काढणे
62.अर्जदारांचे वडील किंवा नातेवाईक यांच्या जाती/समुदाय प्रकाराचा उल्लेख केलेला सरकारी सेवा रेकॉर्डचा एक उतारा (पुस्तक)
63.जातीच्या अधिसूचनेच्या तारखेच्या अगोदरची जात आणि सामान्य निवासस्थानासंबंधी कागदोपत्री पुरावे
वरील आवश्यक कागदपत्रे पहा आणि नंतर पुढे जा या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर जात प्रमाणपत्र हे पेज ओपन होईल, त्या पेजमध्ये तुम्हाला अर्जामध्ये दाखविल्याप्रमाणे माहिती भरायची आहे.

जात प्रमाणपत्र : यामध्ये हिथे तुमच्या जातीचे प्रमाणपत्र निवडायचे आहे.

जात प्रमाणपत्र - Jaticha Dakhala
जात प्रमाणपत्र – Caste Certificate

अर्जदाराचे तपशील: यामध्ये अर्जदाराचे पूर्ण नाव,वडिलांचे नाव,जन्मतारीख इत्यादी माहिती भरायची आहे.

अर्जदाराचे लाभार्थीशी संबंध: यामध्ये जो अर्ज करणार आहे त्याचा लाभार्थीशी संबंध टाकायचा आहे.

लाभार्थीचे तपशील: यामध्ये लाभार्थीची माहिती भरायची आहे.

लाभार्थीच्या वडिलांचे तपशील: यामध्ये लाभार्थीच्या वडिलांची पूर्ण माहिती भरायची आहे.

लाभार्थीच्या वडिलांचे पत्ताचे तपशील: यामध्ये लाभार्थीच्या वडिलांचा पूर्ण पत्ता टाकायचा आहे.

लाभार्थीच्या जाति / वर्ग माहिती: यामध्ये लाभार्थीची जात कोणती याची माहिती भरायची आहे.

Applicant Other Details: यामध्ये टपाल कार्यालयाचे नाव व वंशपरंपरागत व्यवसाय टाकायचा आहे.

Father Other Details: यामध्ये वडिलांच्या व्यवसायाचे नाव टाकायचे आहे.

Beneficiary Other Details: यामध्ये लाभार्त्याचे जिल्हा, तालुका व गाव याची माहिती भरायची आहे.

यानंतर जोडावयाचे दस्तऐवज यामध्ये दिलेले पर्याय वाचून होय /नाही पैकी योग्य पर्यायावरती क्लिक करा.

अतिरिक्त माहिती या पर्यायामध्ये अर्जदाराची माहिती पर्याय वाचून होय /नाही या योग्य पर्यायावरती क्लिक करा.

Additional Information: या पर्यायामध्ये जातीचा दाखला Caste Certificate – (Jaticha Dakhala) कोणत्या कारणासाठी पाहिजे ते कारण लिहा.

त्यानंतर जर तुम्हाला प्रतिज्ञापत्र हवे असेल तर होय या पर्यायावरती क्लिक करा.

त्यानंतर कराराचा तपशील वाचून “मला मंजूर” या पर्यायावरती क्लिक करून save यावरती क्लिक करा.

सेव्ह वर क्लिक केल्यावर तुम्हाला अर्ज नंबर मिळेल. पुढे तुम्हाला फोटो आणि आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करायची आहेत.

त्यानंतर पैसे भरणे हा ऑपशन येईल. यासाठी तुम्ही कोणत्याही (Online Banking/ Credit Card/ Debit Card/ PayTm / ATM / BHIM App / UPI) पद्धतीने पैसे भरू शकता. पैसे भरल्यानंतरच तुमचा अर्ज तत्सम अधिकाऱ्याकडे जाईल. अर्ज केल्यापासून 45 दिवसात तुम्हाला तुमचा जातीचा दाखला Caste Certificate – (Jaticha Dakhala) मिळेल.

पुढील लेख देखील वाचा!

  1. जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस – Caste Validity Certificate
  2. जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आता ऑफलाईनही अर्ज करता येणार! जात वैधता ऑफलाइन अर्ज PDF फाईल.
  3. जातीचे व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी!
  4. मंडणगड पॅटर्न शालेय स्तरावर मिळणार जात प्रमाणपत्र ! – Mandangad Pattern Caste Certificate

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

5 thoughts on “जातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !

  • AKSHAY BHOSALE

    respected sir , Here it is not stated how to submit the original document to the concerned office

    Reply
    • Vedika Vikas Ranbhise

      I don’t understand what to do

      Reply
  • Mohan Padwal

    जी इतर कागदपत्रे option आहे, त्यामध्ये कोणतेही एकच कागदपत्र असेल तर चालेल का ?

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.