वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईनसरकारी कामे

पासपोर्टसाठी असा करा ऑनलाईन अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती!

आपण या लेखात पासपोर्ट (Passport) कसा काढतात? अर्ज कसा करावा? आवश्यक कागदपत्रे काय आहेत? याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. परदेशवारी करायची झाल्यास पासपोर्ट हा अत्यंत गरजेचा दस्तावेज. तो नसल्यास व्हिसाही मिळत नाही. बरेचजण पासपोर्ट काढण्याबाबत निरुत्साही दिसून येतात; पण कधीतरी आयत्यावेळी परदेशात जायची संधी येते आणि केवळ पासपोर्ट नसल्यामुळे ती हुकते. अशावेळी होणारे दुःख हे भावनांपलीकडचे असते. तुमच्यासोबत असा प्रकार घडू नये असे वाटत असेल, तर आजच पासपोर्टसाठी अर्ज करा.

पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस – Apply Online for Passport:

सर्वप्रथम खालील  पासपोर्ट सेवेच्या (Passport Seva Portal) अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

https://www.passportindia.gov.in/AppOnlineProject/welcomeLink#

नवीन पासपोर्ट (New Passport) काढण्यासाठी सर्वप्रथम अकाउंट ओपन करावे लागेल त्यासाठी New User Registration या पर्यायावर क्लिक करा.

New User Registration for Passport
New User Registration for Passport

आता नवीन पेज ओपन होईल तिथे माहिती भरून घ्यायची आहे त्यामध्ये, Register to apply at या पर्यायामध्ये Passport Office या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

त्याखाली Given Name या पर्यायामध्ये आपले नाव टाकायचे आहे, नाव टाकत असताना आपले नाव + वडिलांचे नाव असं लिहणे गरजेचे आहे. खाली आपले आडनाव, जन्मतारीख, E-mail Id टाकायचा आहे, त्यानंतर Do you want your Login Id to be same as E-mail Id? इथे Yes सिलेक्ट करायचं आहे. Yes पर्यायावर क्लिक केल्यानंतर Login Id आपोआप येईल. त्याखाली नवीन पासवर्ड टाकायचा आहे व Hint Question टाकून Hint Question चे Answer टाकायचे आहे. त्यानंतर कॅप्चा टाकून Register पर्यायावर क्लिक करायचे आहे.

Register पर्यायावर क्लिक केल्यानंतर Registration Confirmation मेसेज आपल्या E-mail Id वरती येईल. तर E-mail Id ओपन करून जी लिंक आली असेल त्यावरती क्लिक करा. लिंक वरती क्लिक केल्यानंतर Enter User ID मध्ये आपला E-mail Id टाकायचा आहे व Submit बटनावरती क्लिक करायचे आहे, त्यानंतर Account Activated चा मेसेज येईल.

यानंतर पुन्हा वेबसाईट वर यायचं आहे व दुसरा पर्याय Existing user Login हा पर्यायावरती क्लिक करायचे आहे व पुन्हा Login ID मध्ये आपला E-mail Id टाकून, पासवर्ड व कॅप्चा टाकून Login बटनावरती क्लिक करायचे आहे.

त्यानंतर नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये Applicant Home मध्ये Apply For Fresh Passport / Re- issue Passport या पर्यायावरती क्लिक करा, नंतर नवीन पेज वरील सर्व वाचून खालील Click Here to fill the application form या पर्यायावर क्लिक करायचे आहे, नंतर नवीन पेज वर आपले राज्य व जिल्हा निवडायचा आहे.

Apply for Fresh Passport/Re-issue of PassportApply for Fresh Passport/Re-issue of Passport
Apply for Fresh Passport/Re-issue of Passport

पासपोर्ट प्रकार – Passport Type:

जिल्हा निवडल्यानंतर नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये Applying for या पर्यायामध्ये Fresh Passport सिलेक्ट करा. त्याखाली Type of Application मध्ये Normal किंवा Tatkal निवडून Booklet Type मध्ये 36 pages निवडून Next पर्यायावरती क्लिक करा.

टीप: फ्रेश इश्युअन्स श्रेणी अंतर्गत अर्ज करताना – कृपया तुम्ही यापूर्वी कधीही लागू केलेल्या श्रेणीचा (Passport) पासपोर्ट (उदा. सामान्य पासपोर्ट, डिप्लोमॅटिक पासपोर्ट किंवा अधिकृत पासपोर्ट) धारण केला नसल्याचे सुनिश्चित करा.

अर्जदाराचे तपशील – Applicant Details:

त्यानंतर Applicant Details हे पेज ओपन होईल त्यामध्ये जसे अगोदर नाव टाकले आहे तसेच नाव टाका. त्याखाली आडनाव, लिंग टाका. त्याखाली तुमचं अजून कोणते नाव आहे का ? असेल तर Yes वर क्लिक करा. अन्यथा No वरती क्लिक करा. त्याखाली तुम्ही तुमचं नाव बदललेलं आहे का ? असेल तर Yes वर क्लिक करा. अन्यथा No वरती क्लिक करा. त्यानंतर जन्मतारीख टाका.

आपला जन्म भारताबाहेर झाला असेल तर Yes वर क्लिक करा. अन्यथा No वरती क्लिक करा. त्याखाली जन्मस्थळ, राज्य, जिल्हा, वैवाहिक माहिती टाकायची आहे,

नंतर Citizenship of india by या पर्यायामध्ये Birth हा पर्याय निवडा. खाली पॅनकार्ड नंबर, Voter ID असेल तर टाका.

त्याखाली Employment Type मध्ये आपण कोणतं काम करता ते सिलेक्ट करा. त्याखाली आपण सरकारी कर्मचारी असाल तर Yes वरती क्लिक करा. अन्यथा No वरती क्लिक करा. त्याखाली आपली शैक्षणिक माहिती सिलेक्ट करा. त्याखाली Is Applicant eligible for Non – ECR category या पर्यायामध्ये जर तुमच शिक्षण सातवीपेक्षा कमी झाले असेल त्यांनी तसे वरती सिलेक्ट करून खालील No पर्याय निवडा. व ज्यांच शिक्षण दहावी किंवा त्यापेक्षा जास्त झालं असेल त्यांनी Yes वर क्लिक करा. ( त्यासाठी दहावीचे प्रमाणपत्र येथे जोडावे लागेल. ) त्यानंतर आधार नंबर टाका व Validate Aadhaar Number वरती क्लिक करून खालील I Agree वर क्लिक करून Save My Details वरती क्लिक करून Next पर्यायावरती क्लिक करा.

कौटुंबिक तपशील – Family Details:

त्यानंतर Family Details हे पेज ओपन होईल त्यामध्ये वडिलांचं नाव, आडनाव, आईचे नाव, आडनाव, लग्न झाल असेल तर त्याचे नाव टाकून खालील Save My Details वरती क्लिक करून Next पर्यायावरती क्लिक करा.

सध्याचा निवासी पत्ता – Present Residential Address:

त्यानंतर Present Residential Address हे पेज ओपन होईल त्यामध्ये आपण इंडिया मध्ये राहतो म्हणून No पर्याय सिलेक्ट करा. त्याखाली घराचा नंबर, गाव, जिल्हा, राज्य, जवळील पोलीस स्टेशन, पिन कोड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाका. त्याखाली स्वतःच घर असेल तर Yes वर क्लिक करून Save My Details वरती क्लिक करून Next पर्यायावरती क्लिक करा.

आपत्कालीन संपर्क – Emergency Contact:

यानंतर Emergency Contact हे पेज ओपन होईल त्यामध्ये कोणत्याही एका ओळखीच्या व्यक्तीच नाव आणि पत्ता टाकायच आहे, खाली मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकून Save My Details वरती क्लिक करून Next पर्यायावरती क्लिक करा.

ओळख प्रमाणपत्र/पासपोर्ट तपशील – Identity Certificate/Passport Details:

यानंतर Identify Certificate /Passport Details या पेजवर सगळ्या पर्यायामध्ये No/Details Not Available सिलेक्ट करून Save My Details वरती क्लिक करून Next पर्यायावरती क्लिक करा.

इतर तपशील – Other Details:

यानंतर Other Details या पेजवर तुमच्या वर कोणती कोर्ट केस झाली आहे का ? अशी सर्व माहिती विचारली जाईल तर असेल तर Yes वर क्लिक करा अन्यथा No वरती क्लिक करा, व Save My Details वरती क्लिक करून Next पर्यायावरती क्लिक करा.

त्यानंतर आपल्याला आपलं पासपोर्ट (Passport) कसं असेल हे दाखवलं जाईल ते चेक करून Next पर्यायावरती क्लिक करा.

स्व-घोषणा पत्र – Self Declaration:

यानंतर Self Declaration या पेजवर जन्म पुरावा कोणता देणार आहेत ते निवडा, खाली Address Proof साठी जो पुरावा देणार ते सिलेक्ट करा. त्यानंतर Place, तारीख, व I Agree वर क्लिक करून Save My Details वरती क्लिक करून Preview Application Form वरती क्लिक करायचे आहे. यानंतर अगोदर भरलेली सर्व माहिती दिसेल ती सर्व माहिती चेक करायची आहे कारण नंतर ती एडिट करता येणार नाही व Submit पर्यायावरती क्लिक करा.

Submit केल्यानंतर एक Application Reference नंबर create झाला असेल. त्यानंतर आपल्याला पासपोर्ट बनवण्यासाठी पेमेंट करावं लागेल त्यासाठी पुन्हा लॉगिन करावं लागेल, लॉगिन केल्यानंतर View Saved / Submitted Application या पहिल्या पर्यायावर क्लिक करा. तिथे आपलं Application Draft झालेलं दिसेल, ते Application सिलेक्ट करायचं आहे व खाली Payment and Appointment या पर्यायावर क्लिक करून Pay and Schedule Appointment यावर क्लिक करा, नंतर ऑनलाईन payment साठी SBI चा पर्याय सिलेक्ट करायचा आहे व Next पर्यायावरती क्लिक करा. यानंतर तुमचं नाव व बाकीची माहिती दाखविली जाईल ते वाचून Next पर्यायावरती क्लिक करा.

अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी विचारणा होईल, तेथे आपल्या सोयीची तारीख, वेळ व लोकेशन निवडा.

पुढे ऑनलाइन पेमेंट करा व फॉर्मची पावती प्रिंट करून घ्यावी व पासपोर्ट (Passport Seva Office) कार्यालयात जाताना ती आवश्यक असते.

पासपोर्ट काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

खालील निवासी पत्ता व जन्म पुरावा बाबत कागदपत्रे अपलोड करा.

  1. निवासी पत्ता – आधार कार्ड, पाणी बिल, टेलिफोन बिल (लँडलाईन किंवा पोस्टपेड मोबाइल बिल), वीज बिल, बँक अकाऊंट पासबुक, आयकर प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, गॅस कनेक्शन कार्ड, घरभाडे करार, लहान मुलांच्या पासपोर्टसाठी पालकांचा पासपोर्ट (पहिले आणि शेवटचे पान). (कोणतेही एक)
  2. जन्म पुरावा – जन्मदाखला, शाळा सोडल्याचा किंवा शाळा बदली केल्याचा दाखला, जन्म दिनांक नमूद केलेले जीवन विमा निगम प्राधिकरणाचे कागदपत्र, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्व्हिस रेकॉर्डची कॉपी, आधारकार्ड/ई – आधार, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, अनाथ असल्यास अनाथालयाकडून जन्म दिनांक नमूद केलेले प्रमाणपत्र. (कोणतेही एक)
पासपोर्ट कार्यालयात जाऊन काय करावे लागते? (Passport Seva Office):

१) अपॉइंटमेंटच्या दिवशी ठरलेल्या वेळेत पासपोर्ट (Passport) कार्यालयात पोहोचणे आवश्यक आहे. मोबाइलवर आलेला मेसेज वा फॉर्मची पावती दाखविल्यानंतर आत प्रवेश दिला जातो.

२) तेथे प्राथमिक कागदपत्रे तपासून टोकन नंबर जारी केला जातो. आपला टोकन नंबर ज्या खिडकीवर येईल, तेथे सर्व कागदपत्रे (ओरिजिनल आणि झेरॉक्स) सादर करावी लागतील.

३) कागदपत्रांची सखोल पडताळणी केल्यानंतर संगणकीकृत छायाचित्र घेतले जाते. तेच आपल्या पासपोर्टवर छापले जाते. त्यांनतर अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जातो.

४) ते पुनर्पडताळणी करून सही करतात. त्यानंतर अर्ज पोलीस व्हेरिफिकेशनसाठी पाठविला जातो.

पासपोर्टचा अर्ज जमा केल्यानंतर साधारण १५ दिवसांपर्यंत तो आपल्या स्थानिक पोलीस ठाण्यात पाठवतात. पोलीस फोन करून घरी चौकशीला येतात. आठ ते दहा दिवसांत अर्ज पोलिसांच्या शिफारशीने पासपोर्ट कार्यालयात परत जातो. पोलिसांनी प्रमाणपत्र दिल्यानंतर पासपोर्ट पोस्टाने घरी येतो.

पासपोर्ट काढण्यासाठी किती पैसे लागतात?

प्रकार वय पाने किंमत 
नवीन / नूतनीकरण१५ वर्षावर३६१५००
नवीन / नूतनीकरण१५ वर्षावर६०२५००
तत्काळ१५ वर्षावर३६३५००
तत्काळ१५ वर्षावर६०४०००
नवीन / नूतनीकरण१५ वर्षांखालील_१०००
तत्काळ१५ वर्षांखालील_३०००

मुंबई महानगर प्रदेशातील सेवा केंद्रे:

अंधेरी, लोअर परळ, मालाड, सांताक्रूझ (पोस्ट ऑफिस), सायन (पोस्ट ऑफिस), विक्रोळी (पोस्ट ऑफिस), ठाणे, भिवंडी (पोस्ट ऑफिस), डोंबिवली (पोस्ट ऑफिस), वाशी (पोस्ट ऑफिस). पासपोर्ट (Passport) कार्यालयांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

टोलफ्री नंबर: 1800-258-1800

खालील लेख देखील वाचा!

  1. पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र (चारित्र्य दाखला) ऑनलाईन काढण्याची प्रोसेस पहा ! (Police Clearance Certificate)
  2. आधारकार्ड PDF फाईल मध्ये डाउनलोड करण्याची प्रोसेस ! Download Aadhaar Card in PDF File
  3. 5 मिनिटात मोफत पॅन कार्ड काढा – Instant e-PAN
  4. डिजिटल मतदान कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर !
  5. परदेशात कार चालवायची असेल तर इथेच काढा परवाना !
  6. लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढा फक्त आधार कार्डने, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.