वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईनसरकारी योजनासार्वजनिक आरोग्य विभाग

आयुष्मान कार्ड ऑनलाईन डिजिलॉकर मधून डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!

आपण या लेखात आयुष्मान कार्ड (Ayushman Bharath Card) ऑनलाईन डिजिलॉकर मधून डाऊनलोड कसे करायचे? त्याची सविस्तर प्रोसेस पाहणार आहोत.

देशातील 40% लोकांना आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी भारत सरकारची आयुष्मान भारत जन आरोग्य योजना. प्रोग्राम वापरणारे लोक कौटुंबिक डॉक्टरांकडून त्यांच्या स्वतःच्या प्राथमिक काळजी सेवांमध्ये प्रवेश करतात.  आपण कोणत्याही सरकारी रुग्णालयात आणि खासगी रुग्णालयात 5 लाखांपर्यंत विनामूल्य उपचार करू शकता.

आयुष्मान कार्ड ऑनलाईन डिजिलॉकर मधून डाउनलोड करण्याची प्रोसेस – Download Ayushman Bharath Card from DigiLocker:

आयुष्मान कार्ड (Ayushman Bharath Card) ऑनलाईन डिजिलॉकर मध्ये डाउनलोड करण्यासाठी सर्व प्रथम खालील भारत सरकारची DigiLocker वेबसाईट ओपन करा.

https://digilocker.gov.in/

DigiLocker ही एक भारतीय डिजिटलायझेशन ऑनलाइन सेवा आहे जी तिच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे प्रदान केली जाते. डिजीलॉकरवर आता 8 कोटींपेक्षा जास्त पीएम-जेवाय (Ayushman Bharath Card) ई-कार्ड उपलब्ध आहेत. जारी कागदपत्र विभागाअंतर्गत संबंधित डिजीलोकर खात्यावर पीएमजेवाय (Ayushman Bharath Card) ई-कार्ड मिळू शकतात.

DigiLocker वेबसाईट ओपन झाल्यावर आधार नंबर किंवा मोबाईल नंबर आणि ६ नंबर पिन टाकून अकाउंट Sign up करा. जर तुमच्याकडे  DigiLocker चे अकाउंट नसेल तर Sign up वर क्लिक करून अकाउंट बनवा.

DigiLocker वेबसाईट वर Sign केल्यानंतर, पुढे आपल्याला “Central Government” च्या योजना मध्ये उजव्या बाजूला View All ऑप्शन वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्व योजना दिसतील त्यामध्ये “National Health Authority” वर क्लिक करा.

National Health Authority
National Health Authority

आता “Pradhan Mantri Jan Arogya Yojana” वर क्लिक करा.

Pradhan Mantri Jan Arogya Yojana
Pradhan Mantri Jan Arogya Yojana

इथे तुमच्या आयुष्मान भारत जन आरोग्य योजना हेल्थ (Ayushman Bharath Card) कार्डचा “PMJAY ID” टाका आणि आपला राज्याचे नाव निवडा. त्यानंतर ” I provide my consent to DigiLocker to share my Aadhaar Number, Name, Date of Birth and Photograph from my Aadhaar e-KYC information with the Issuer for the purpose of fetching my certificate into DigiLocker.” बॉक्स मध्ये क्लिक करा आणि “Get Document” वर क्लिक करा.

सूचना: आपल्या गावातील या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी यादी मध्ये आपले नाव आहे का ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा आणि PMJAY ID साठी जवळच्या CSC सेंटरला भेट द्या.

Get Document (Ayushman Bharath Card)
Get Document

Get Document” वर क्लिक केल्यावर तुम्ही पाहू शकता DigiLocker त्याच्या मूळ स्त्रोतामधून आपले हेल्थ (Ayushman Bharath Card) कार्ड आणत आहे ती प्रोसेस इथे चालू आहे, या प्रोसेसला थोडा वेळ लागू शकतॊ.

खाली सक्सेफुल मॅसेज आल्यावर डाव्या बाजूला “Issued Documents” मध्ये तुम्ही पाहू शकता “Pradhan Mantri Jan Arogya Yojana” म्हणून एक कार्ड (Ayushman Bharath Card) दिसेल तिथे तुम्ही PDF वर क्लिक करून डाऊनलोड करा.

आयुष्मान भारत हेल्पलाईन – 14555 / 104 / 1800110770

अधिकृत वेबसाईट : https://pmjay.gov.in/

आयुष्मान भारत मोबाईलॲप (Ayushman App) : मोबाईलॲप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

खालील लेख देखील वाचा!

  1. आयुष्मान कार्ड (Ayushman Bharath Card) ऑनलाईन डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
  2. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना – CM Medical Assistance Fund Scheme.
  3. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्सॲप हेल्पलाईन !
  4. महाराष्ट्र “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” योजना – CM Relief Fund Scheme
  5. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ योजना : रुग्णांना मिळणार विविध आरोग्य सेवा !
  6. ई-संजीवनी ॲप रुग्णांसाठी संजीवनी!
  7. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना आता मिळणार २५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य !
  8. CGHS लाभार्थी आयडी आयुष्मान भारत हेल्थ आयडीला लिंक करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
  9. प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांवर औषधे माफक दरात उपलब्ध !
  10. ई-श्रम यूएएन कार्डसाठी अशी करा ऑनलाईन नोंदणी!
  11. MJPJAY : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
  12. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
  13. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
  14. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना – Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY)
  15. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आता राज्यातील सर्व कुटुंबांना लागू !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.